प्रीव्ह्यू वापर अटी

प्रीव्ह्यू वापर अटी

24 सप्टेंबर 2024 पासून लागू. शेवटचे 24 सप्टेंबर 2024 सुधारित केले

स्वागत आहे! या प्रीव्ह्यू अटी (“प्रीव्ह्यू अटी”) सेवांच्या काही नवीन वैशिष्ट्यांचा (प्रत्येक, एक “वैशिष्ट्य”) तुमच्याकडून अ‍ॅक्सेस आणि वापर यांना लागू होतात आणि त्यांचे नियमन करतात. प्रीव्ह्यू अटी तुम्ही आधीच मान्य केलेल्या आमच्या वापरकर्ता करार आणि इकॉन अटी यांना (एकत्रितपणे, “Reddit अटी”) पूरक म्हणून लागू होतात आणि यामध्ये Reddit अटींमध्ये परिभाषित केलेल्या काही अटींचा समावेश आहे.

1. स्वीकृती

कोणतेही वैशिष्ट्य ॲक्सेस करून किंवा वापरून, तुम्ही प्रीव्ह्यू अटींशी बांधील राहण्यास सहमत आहात.

तुम्ही एखाद्या तृतीय पक्षाच्या (उदा., तुमचा नियोक्ता) वतीने प्रीव्ह्यू अटींना सहमती दर्शवत असल्यास, तुम्ही आम्हाला असे प्रतिपादन आणि हमी देता की, तुम्ही त्या तृतीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी आहात आणि त्या तृतीय पक्षाला प्रीव्ह्यू अटींनी बांधील करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तसेच, प्रीव्ह्यू अटींमध्ये सर्वत्र वापरण्यात आलेला “तुम्ही” हा शब्द त्या तृतीय पक्षासाठीदेखील लागू होईल.

तुम्ही हे मान्य करता आणि समजून घेता की, आमच्या पूर्ण विवेकानुसार, कोणत्याही कारणास्तव किंवा कोणतेही कारण न देता, प्रीव्ह्यू अटी आणि कोणतेही वैशिष्ट्य कोणत्याही वेळी बदलले जाऊ शकते, त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना देण्याची किंवा Reddit वर कोणतेही दायित्व ठेवण्याची आवश्यकता नाही (लागू कायद्याच्या अधीन राहून). कृपया कोणत्याही बदलांसाठी प्रीव्ह्यू अटींचे पुनरावलोकन करा; तसे करणे ही तुमची जबाबदारी आहे.

तुम्ही प्रीव्ह्यू अटींशी सहमत नसल्यास, तुम्हाला कोणत्याही वैशिष्ट्याचा अ‍ॅक्सेस करण्याची किंवा त्याचा वापर करण्याची परवानगी नाही.

2. पात्रता

तुम्ही खालील परिस्थितीत असल्यास, कोणतेही वैशिष्ट्य अ‍ॅक्सेस करण्यास किंवा त्याचा वापर करण्यास पात्र नाही:

  • तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे किंवा बंधनकारक करार करण्यासाठी तुमच्या निवासाच्या देशाच्या कायद्यांनुसार आवश्यक असलेल्या किमान वयापेक्षा तुमचे वय कमी आहे;

  • तुम्ही अशी व्यक्ती आहात जिच्यासोबत आर्थिक किंवा व्यापारविषयक निर्बंध, प्रतिबंध, निर्यात निर्बंध किंवा अन्यथा प्रतिबंधित किंवा निर्बंधित पक्षांच्या कोणत्याही यादीअंतर्गत व्यवहार करण्यास मनाई आहे, किंवा तुम्ही वरीलप्रमाणे निर्बंध किंवा प्रतिबंध लागू असलेल्या देशात स्थित आहात (किंवा त्या देशाचे नागरिक आहात);

  • तुमचे खाते (तुमच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पर्यायी खात्यासह) निलंबित केलेले किंवा समाप्त केलेले असल्यास, Reddit अटींचे उल्लंघन केले असल्यास किंवा अन्यथा खाते सुस्थितीत नसल्यास; किंवा

  • अन्यथा, लागू असलेल्या कायद्यांनुसार तुम्हाला कोणतेही वैशिष्ट्य अ‍ॅक्सेस करण्यास किंवा त्याचा वापर करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

कोणतेही वैशिष्ट्य ॲक्सेस करून किंवा त्याचा वापर करून, तुम्ही Reddit ला असे प्रतिनिधित्व करता आणि हमी देता, की तुम्ही तसे करण्यास पात्र आहात आणि प्रीव्ह्यू अटी, Reddit च्या अटी तसेच ते वैशिष्ट्य ॲक्सेस करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी लागू असलेले सर्व कायदे, नियम आणि विनियम यांचे अन्यथा पालन करण्यास सक्षम आहात.

Reddit स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा Reddit वर कोणतेही दायित्व न येता, कधीही, कोणत्याही कारणासाठी किंवा कोणतेही कारण नसतानाही, कमाई कार्यक्रमाच्या संदर्भातील सेवांचा ॲक्सेस ब्लॉक करणे, निलंबित करणे, मर्यादित करणे किंवा समाप्त करणे याचा अधिकारदेखील राखून ठेवते (लागू कायद्याच्या अधीन). Reddit ने कोणत्याही वैशिष्ट्याचा ॲक्सेस ब्लॉक करणे, निलंबित करणे, मर्यादित करणे किंवा समाप्त करणे निवडल्यास, कायद्याने अनुमती दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, त्या वैशिष्ट्यामध्ये तुमचे असलेले कोणतेही हितसंबंध तुम्ही गमवाल आणि त्या वैशिष्ट्याचा पुढे वापर सुरू ठेवण्याबाबत तुमचा असलेला कोणताही दावा तुम्ही गमवाल.

3. Reddit व्हॉल्ट

3.1 अवलोकन

Reddit व्हॉल्ट हे सेवांमध्ये (“व्हॉल्ट”) एंबेड केलेले डिजिटल वॉलेट आहे, जे तुम्हाला प्रीव्ह्यू अटी आणि Reddit च्या अटींनुसार, सेवांद्वारे तुमच्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) स्टोअर करणे, व्यवस्थापित करणे आणि त्यांची स्वतःकडे सुरक्षित ठेवणे यासाठी सक्षम करते.

3.2 तुमचा व्हॉल्ट तयार करा

सेवांच्या माध्यमातून व्हॉल्ट तयार करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत:

  • तुम्ही सेवांचा वापर करून काही विशिष्ट पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंवर दावा केल्यास किंवा त्या खरेदी केल्यास, त्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू स्टोअर करण्यासाठी Reddit तुमच्या खात्यासाठी आपोआप व्हॉल्ट तयार करेल; किंवा

  • तुम्ही सेवांचा वापर करून व्हॉल्ट तयार करू शकता.

तुमचा व्हॉल्ट तयार झाल्यावर, तुम्हाला सार्वजनिक पत्ता आणि खाजगी की मिळेल. सार्वजनिक पत्ता हा इथेरियमशी कंपॅटिबल ब्लॉकचेनवरील तुमचा पत्ता आहे, जिथे तुमच्या व्हॉल्टमधील पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंवरील तुमची मालकी आणि त्यांवरील तुमचे हक्क यांची नोंद स्टोअर केली जाते.

तुमच्या व्हॉल्टमधील पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू अ‍ॅक्सेस करण्याचा आणि त्यांचा वापर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खाजगी की. Reddit तुमची खाजगी की आपोआप स्वीकारत नाही किंवा स्टोअर करत नाही. खाजगी की तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केली जाते आणि तिच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी तुमचीच आहे.

तुमचा व्हॉल्ट तयार केला जातो, तेव्हा तुमच्या व्हॉल्टच्या खाजगी कीसाठी १२ शब्दांचा रिकव्हरी वाक्यांश देखील आपोआप तयार केला जातो (तुमचा “रिकव्हरी वाक्यांश”). तुम्ही तुमच्या रिकव्हरी वाक्यांशाचा वापर करून साइन इन करू शकता आणि तुमचा व्हॉल्ट अ‍ॅक्सेस करू शकता किंवा व्हॉल्टमध्ये किंवा MetaMask सारख्या इतर वॉलेटमध्ये तुमची खाजगी की अन्यथा पुन्हा तयार करू शकता.

तुमची खाजगी की आणि रिकव्हरी वाक्यांश गमावल्यास आणि तुम्ही तुमचा व्हॉल्ट सुरक्षित केला नसल्यास, तुमच्या व्हॉल्टमध्ये असलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचा अ‍ॅक्सेस कायमचा गमावला जाईल.

3.3 तुमचा व्हॉल्ट सुरक्षा करणे

तुमचा व्हॉल्ट तयार झाल्यानंतर, तुम्ही त्याचा अ‍ॅक्सेस सुरक्षित करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या व्हॉल्टचा अ‍ॅक्सेस खालीलप्रमाणे सुरक्षित करू शकता:

  • सेवांद्वारे तुमच्या क्लाउड स्टोरेज सेवा पुरवठादाराकडे तुमच्या रिकव्हरी वाक्यांशाचा बॅकअप तयार करणे (तुमचा “क्लाउड बॅकअप”);

  • सेवांद्वारे तुमच्या व्हॉल्टसाठी नवीन आणि युनिक पासवर्ड तयार करणे (तुमचा “व्हॉल्ट पासवर्ड”); किंवा

  • तुमची खाजगी की आणि रिकव्हरी वाक्यांश मॅन्युअली सेव्ह करून ते सुरक्षित ठिकाणी संग्रहित करणे.

तुमच्या व्हॉल्टचा अ‍ॅक्सेस सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे; Reddit त्याचा अ‍ॅक्सेस स्वतःकडे ठेवत नाही. तुमच्या व्हॉल्टची खाजगी की, पुनर्प्राप्ती वाक्यांश, क्लाउड बॅकअप आणि व्हॉल्ट पासवर्ड (एकत्रितपणे, तुमची “व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती”) हरवल्यास किंवा विसरल्यास, Reddit तुम्हाला तुमचा व्हॉल्ट (त्यामध्ये असलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंसह) रिकव्हर करण्यात मदत करू शकत नाही.

तुमची व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला (यामध्ये Reddit चा देखील समावेश आहे) कधीही देऊ नये, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचा व्हॉल्ट आणि व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त तुमची आहे. तुमचा व्हॉल्ट आणि व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती पुन्हा मिळवणे, रीसेट करणे किंवा रिकव्हर करणे यासाठी Reddit तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही.

तुमची व्हॉल्ट ॲक्सेस माहिती किंवा तुम्ही नियंत्रित करत असलेल्या इतर कोणत्याही ब्लॉकचेन खात्याची खाजगी की किंवा रिकव्हरी वाक्यांश आम्हाला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कधीही देऊ नका. कोणताही Reddit कर्मचारी तुमच्याकडून तुमची व्हॉल्ट प्रवेश माहिती कधीही मागणार नाही.

तुमचा व्हॉल्ट आणि व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती सुरक्षित करण्याबाबत अधिक माहिती येथे मिळू शकते.

3.4 व्हॉल्टचा ॲक्सेस गमवणे

तुमचा व्हॉल्ट किंवा तुमची व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती रिकव्हर करण्यासाठी किंवा त्यामध्ये असलेल्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू रिकव्हर करण्यासाठी Reddit ला तुमच्या व्हॉल्टचा किंवा व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहितीचा अ‍ॅक्सेस नाही. तुमचा व्हॉल्ट तुमच्या कोणत्याही मोबाइल डिव्हाइसवर संग्रहित केलेला नाही आणि तुमच्या कोणत्याही व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहितीचा तुम्हाला अ‍ॅक्सेस नाही, याची तुम्हाला पूर्ण खात्री असल्यास, तुमचा व्हॉल्ट अनलॉक करण्यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही आणि तुम्हाला नवीन व्हॉल्ट तयार करावा लागेल.

तुमच्या खात्याशी केवळ एक सक्रिय व्हॉल्ट संलग्न असू शकतो. आधीपासून व्हॉल्ट असलेल्या खात्यावर तुम्ही दुसरा व्हॉल्ट तयार केल्यास, तो दुसरा व्हॉल्ट त्या खात्याशी संलग्न असलेला व्हॉल्ट बनेल. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची मूळ व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहिती जतन करून ठेवली नसेल, तर मूळ व्हॉल्ट आणि त्यामध्ये असलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू रिकव्हर करता येणार नाहीत.

तुम्ही तुमच्या व्हॉल्ट अ‍ॅक्सेस माहितीच्या माध्यमातून तुमच्या व्हॉल्टवर नियंत्रण ठेवता, तर आमच्या सेवांवर Reddit चे नियंत्रण असते. आम्ही तुमच्याकडून तुमचा व्हॉल्ट काढून घेऊ शकत नसलो, तरीही सेवांच्या माध्यमातून तुमच्या व्हॉल्टशी (आणि त्यामध्ये संग्रहित असलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंशी) परस्परसंवाद साधण्याची तुमची क्षमता आम्ही मर्यादित करू शकतो. उदाहरणार्थ, तुमचे खाते निलंबित केल्यास किंवा त्यावर बंदी घातली गेल्यास, Reddit च्या विवेकबुद्धीनुसार, निलंबनाचा कालावधी समाप्त होईपर्यंत किंवा अनिश्चित कालावधीसाठी, तुम्हाला सेवांच्या माध्यमातून तुमच्या व्हॉल्टमध्ये आणि पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू अ‍ॅक्सेस करता येणार नाही.

3.5 गोपनीयतेविषयक बाबी

लक्षात ठेवा, की इथेरियम ब्लॉकचेनसारखी सार्वजनिक ब्लॉकचेन ही सार्वजनिक आणि कोणालाही ॲक्सेस करण्यायोग्य असते. तुमचे व्हॉल्ट किंवा पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू तृतीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मशी लिंक करताना सावधगिरी बाळगा, कारण तृतीय पक्ष त्या प्लॅटफॉर्मवरील तुमच्या ॲक्टिव्हिटी आणि सार्वजनिक ब्लॉकचेनवरील तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या आधारे तुमची ओळख पटवू शकतात. Reddit सेवांवरील व्यवहार इतिहास दाखवत नसले, तरीही लक्षात ठेवा, की सार्वजनिक ब्लॉकचेनवरील व्यवहार (पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंची खरेदी, हस्तांतरण आणि विक्रीसह) देखील सार्वजनिक आणि कोणालाही ॲक्सेस करण्यायोग्य असतात. ब्लॉकचेनवरील गोपनीयतेविषयी अधिक जाणून घ्या.

4. पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू

4.1 अवलोकन

तुम्ही प्रीव्ह्यू अटी आणि Reddit अटींनुसार (एकत्रितपणे, “पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू”), सेवांद्वारे सार्वजनिक ब्लॉकचेनवर क्रिप्टोग्राफिक पद्धतीने पडताळणी करता येणाऱ्या काही विशिष्ट डिजिटल वस्तू मिळवू, दावा करू, खरेदी करू, विकू किंवा देऊ शकता.

4.2 Reddit कलेक्टिबल अवतार

Reddit कलेक्टिबल अवतार हे मर्यादित आवृत्तीचे अवतार आणि पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचा एक प्रकार आहेत, जे तुम्ही: (a)  Reddit क्रिएटर अटीं अंतर्गत विकू शकता; किंवा (b) प्रीव्ह्यू अटी आणि Reddit अटींनुसार सेवांद्वारे दावा किंवा खरेदी करू शकता (“कलेक्टिबल अवतार”). कलेक्टिबल अवतार त्यांच्या मालकांना सेवांवर (आणि सेवांबाहेर) अद्वितीय लाभ देतात, ज्यांचे वर्णन प्रीव्ह्यू अटींमध्ये आणि तुम्ही कलेक्टिबल अवतारावर दावा करता किंवा खरेदी करता, तेव्हा तुम्हाला दिलेल्या इतर कोणत्याही अटींमध्ये केलेले असते, यामध्ये तृतीय पक्ष हक्कधारकांनी दिलेल्या अटींचाही समावेश आहे.

प्रत्येक कलेक्टिबल अवताराशी विशिष्ट आणि युनिक अवतार आर्ट जोडलेली असते, जी एका समर्पित गेटवेद्वारे किंवा पर्यायी सेवेवर इंटरप्लॅनेटरी फाइल सिस्टीमवर पिन केलेली असते. तुम्ही कलेक्टिबल अवतार मिळवता, तेव्हा तुम्ही त्याचे मालक बनता. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कलेक्टिबल अवतारावर नियंत्रण ठेवू शकता, त्याचा वापर करू शकता, त्याला हस्तांतरित करू शकता, विकू शकता किंवा इतर प्रकारे त्याची विल्हेवाट लावू शकता. तथापि, याचा अर्थ असा नाही, की अवतार आर्टमधील बौद्धिक संपदेचे हक्क तुमच्या मालकीचे आहेत. अवतार आर्टचा परवाना दिला जातो, त्याची विक्री केली जात नाही. प्रीव्ह्यू अटींमध्ये स्पष्टपणे नमूद न केलेल्या अवतार आर्टमधील सर्व हक्क Reddit आणि आमच्या परवानाधारकांनी राखून ठेवले आहेत.

तुमच्या मालकीचा कलेक्टिबल अवतार असल्यास आणि तुम्ही प्रीव्ह्यू अटींचे सातत्याने पालन करत असल्यास, Reddit तुम्हाला जगभर लागू होणारा, कायमस्वरूपी, अनन्य नसलेला आणि उपपरवाना देण्याची अनुमती असलेला परवाना देते. या परवान्याअंतर्गत, तुमच्या कलेक्टिबल अवताराशी संबंधित संपूर्ण किंवा काही अवतार आर्ट वापरणे, त्याच्या प्रती तयार करणे आणि ते प्रदर्शित करणे, तसेच सेवांद्वारे Reddit आणि त्याच्या परवानादात्यांनी उपलब्ध करून दिलेल्या इतर अवतार आर्टसोबत त्या अवतार आर्टचे मिश्रण व जुळवणी करणे तुम्हाला करता येईल. हे सर्व, प्रत्येक बाबतीत, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आणि गैर-व्यावसायिक वापरासाठी असेल (याला “परवानाधारित हक्क” असे म्हटले आहे). परवानाधारित हक्क प्रदान करताना, Reddit स्वतःच्या वतीने किंवा आमच्या परवानादात्यांच्या वतीने, त्यांचा परवानाधारक किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य करू शकते.

कलेक्टिबल अवतारांमुळे तुम्ही सेवांवरील अतिरिक्त वैशिष्ट्येदेखील अनलॉक करू शकता. तुमच्या क्लेक्टिबल अवताराशी संबंधित अवतार आर्ट सेवांवर तुमचा अवतार म्हणून प्रदर्शित केल्यास, तुमच्या अवतारामध्ये विशेष व्हिज्युअल इफेक्ट असतील आणि तुम्हाला तुमच्या क्लेक्टिबल अवताराचा समावेश असलेल्या अ‍ॅनिमेटेड प्रतिसाद देण्याची सुविधा मिळू शकते. याव्यतिरिक्त, क्लेक्टिबल अवतार तुम्हाला Reddit च्या अवतारांसाठीच्या बिल्डर टूलचा वापर करून अवतार आर्टचे अनेक घटकांमध्ये विभाजन करण्यास आणि त्या घटकांपैकी काही किंवा सर्व घटकांचा वापर करून तुमचा अवतार तयार करण्यास सक्षम करतो. ही अतिरिक्त वैशिष्ट्ये फक्त तुमचा क्लेक्टिबल अवतार तुमच्या व्हॉल्टमध्ये असेल, तर लागू होतात. तुम्ही तुमचा क्लेक्टिबल अवतार तुमचा अवतार म्हणून सेट न केल्यास (तुमची त्यावर अद्याप मालकी असली तरीही), विशेष व्हिज्युअल इफेक्ट लागू केले जाणार नाहीत आणि तुम्हाला अतिरिक्त वैशिष्ट्यांचा वापर करता येणार नाही. तुम्ही तुमचा क्लेक्टिबल अवतार विकल्यास, हस्तांतरित केल्यास किंवा अन्यथा त्याची विल्हेवाट लावल्यास, तुम्हाला या अतिरिक्त वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस यापुढे मिळणार नाही.

तुम्हाला तुमचे परवानाधारक हक्क हस्तांतरित करण्याचा मर्यादित अधिकार देखील आहे, पण तो केवळ प्रीव्ह्यू अटी आणि Reddit अटींनुसार तुमच्या कलेक्टिबल अवताराची विल्हेवाट लावण्याच्या किंवा विक्री करण्याच्या संदर्भातच वापरता येईल. प्रीव्ह्यू अटी किंवा Reddit अटींनुसार तुमचे परवानाधारक हक्क समाप्त झाल्यास किंवा तुम्ही अन्यथा प्रीव्ह्यू अटी किंवा Reddit अटींचे उल्लंघन केल्यास, तुम्ही हा हस्तांतरणाचा अधिकार गमवाल. तुमच्याकडून कलेक्टिबल अवतार मिळवणाऱ्या कोणत्याही हस्तांतरण स्वीकारणाऱ्या व्यक्तीने प्रीव्ह्यू अटी आणि Reddit अटी स्वीकारणे आवश्यक आहे. तुमच्या कलेक्टिबल अवतारच्या कोणत्याही विक्रीच्या किंवा विक्रीच्या प्रयत्नाच्या संदर्भात, तुम्ही तुमच्या कलेक्टिबल अवतारशी संबंधित अवतार कला तृतीय पक्ष प्लॅटफॉर्मवर किंवा बाजारपेठांवर प्रदर्शित करू शकता, परंतु त्या प्लॅटफॉर्म आणि बाजारपेठांनी कलेक्टिबल अवतारवरील तुमच्या मालकीची क्रिप्टोग्राफिक पद्धतीने पडताळणी करणे आणि खाली नमूद केलेल्या रॉयल्टीच्या अटींचे पालन करणे किंवा त्यांचे पालन करण्याचे साधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

तुम्ही Reddit आणि लागू असल्यास, क्रिएटरकडून, सेवांद्वारे कलेक्टिबल अवतार खरेदी केल्यास, तुम्ही सूचीबद्ध किंमत द्याल आणि Reddit कडून व तुमच्याकडून कोणतेही शुल्क (क्रिएटरचे किंवा रॉयल्टी शुल्क यांसह) आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे, तुम्ही Reddit कडून कलेक्टिबल अवतार मिळवल्यास, Reddit तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. तथापि, तुम्ही त्यानंतर तुमचा कलेक्टिबल अवतार विकल्यास, तुमच्याकडून कलेक्टिबल अवतार खरेदी करणाऱ्या पक्षाला त्या त्यानंतरच्या विक्री व्यवहारातील विक्री किमतीच्या 5% इतके रॉयल्टी शुल्क Reddit ला आणि लागू असल्यास, क्रिएटरना आणि आमच्या परवानाधारकांना द्यावे लागेल, जोपर्यंत संबंधित कलेक्टिबल अवताराच्या तपशील पृष्ठावर रॉयल्टी शुल्काची वेगळी टक्केवारी लागू असल्याचे नमूद केलेले नसेल.

या आवश्यकतांची पूर्तता न करणारे तुमचे परवानाधारित हक्क हस्तांतरित करण्याचे कोणतेही रद्दबातल ठरतील आणि ते प्रीव्ह्यू अटी तसेच Reddit च्या अटींचे गंभीर उल्लंघन मानले जाईल. तुम्ही तुमचा कलेक्टिबल अवतार एखाद्या तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करता किंवा विकता, तेव्हा अवतार आर्टसाठी तुम्हाला दिलेला परवाना समाप्त होतो आणि तुमच्या ताब्यात किंवा नियंत्रणाखाली असलेल्या अवतार आर्टच्या कोणत्याही डिजिटल किंवा भौतिक प्रती तुम्ही त्वरित हटवणे आवश्यक आहे.

काही कलेक्टिबल अवतार त्यांच्या सुरुवातीच्या खरेदीदाराला तृतीय पक्षाकडून देण्यात येणाऱ्या काही लाभासाठी (“तृतीय पक्ष लाभ”) पात्र ठरवू शकतात. तुमच्या कलेक्टिबल अवतारसाठी विशेष असलेला तृतीय पक्ष लाभ मिळवण्यासाठी किंवा त्याची पूर्तता करण्यासाठी तुम्ही सेवांचा वापर करू शकता. तुमच्या कोणत्याही तृतीय पक्ष वॉलेटच्या वापरावर स्वतंत्र कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरणे लागू होऊ शकतात. तृतीय पक्ष लाभ पुरवठादारांसोबतच्या तुमच्या कोणत्याही करारामध्ये Reddit हा पक्ष नाही आणि अशा करारांचे पालन करण्याची जबाबदारी त्या पुरवठादारांची आहे. त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही सेवा वापरण्यापूर्वी, तुम्ही तृतीय पक्ष वॉलेट पुरवठादाराच्या कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचावे. Reddit चे तृतीय पक्ष लाभ पुरवठादारांवर कोणतेही नियंत्रण नसले, तरीही तृतीय पक्ष लाभांची पूर्तता करणे तुम्हाला सोपे जावे यासाठी असलेल्या सेवांच्या वैशिष्ट्यांवर Reddit चे नियंत्रण असते. Reddit ला स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार या वैशिष्ट्यांवर देखरेख ठेवण्याचा, त्यांच्यावर मर्यादा घालण्याचा, त्यात बदल करण्याचा किंवा ती काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे, हे तुम्हाला समजते आणि तुम्ही त्यास सहमत आहात.

4.3 पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचे हस्तांतरण

प्रीव्ह्यू अटीच्या अटी व नियमांच्या अधीन राहून, तुम्ही सेवांचा वापर करून तुमच्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू दुसऱ्या व्हॉल्टमध्ये किंवा इथेरियमशी कंपॅटिबल ब्लॉकचेनला समर्थन देणाऱ्या तृतीय पक्षाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही डिजिटल पाकिटात (“तृतीय पक्ष वॉलेट”) हस्तांतरित करू शकता. तुमच्या कोणत्याही तृतीय पक्ष वॉलेटच्या वापरावर स्वतंत्र कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरणे लागू होऊ शकतात. तृतीय पक्ष वॉलेटच्या कोणत्याही पुरवठादारासोबतच्या तुमच्या करारांमध्ये Reddit हा पक्ष नाही आणि तुम्ही त्यांचे तृतीय पक्ष वॉलेट वापरताना लागू होणाऱ्या सर्व नियामक आवश्यकतांचे पालन करण्याची जबाबदारी त्या पुरवठादारांची आहे. त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही सेवा वापरण्यापूर्वी, तुम्ही तृतीय पक्ष वॉलेट पुरवठादाराच्या कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचावे.

सार्वजनिक ब्लॉकचेन किंवा तुमच्या व्हॉल्टवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही आणि प्रीव्ह्यू अटीनुसार पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचे अनुमत हस्तांतरण किंवा तुम्ही तुमच्या व्हॉल्टद्वारे सादर केलेल्या इतर व्यवहारांच्या तपशीलांची पूर्तता केली जाईल, याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. तुमच्या व्हॉल्टद्वारे सार्वजनिक ब्लॉकचेनवर हस्तांतरण किंवा इतर व्यवहारांचे तपशील सबमिट केल्यानंतर, तुमचे हस्तांतरण किंवा व्यवहारांचे इतर तपशील रद्द करण्यास, पूर्ववत करण्यास किंवा अन्यथा त्यामध्ये फेरबदल करण्यास आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. तुम्ही ती पुनरावलोकन करण्यापूर्वी तुमच्या हस्तांतरणाची माहिती आणि इतर व्यवहारांचे तपशील काळजीपूर्वक तपासावेत, अशी आम्ही तुम्हाला आग्रहाने शिफारस करतो.

Reddit चे सार्वजनिक ब्लॉकचेन किंवा तुमच्या व्हॉल्टवर कोणतेही नियंत्रण नसले तरी, Reddit कडे व्हॉल्टशी संबंधित सेवांमधील अशा वैशिष्ट्यांवर नियंत्रण असते, ज्यामुळे सेवांचा वापर करून तुमच्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचे व्यवस्थापन आणि हस्तांतरण करणे तुम्हाला सुलभ होते (“व्हॉल्ट वैशिष्ट्ये”). Reddit ने स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार या वैशिष्ट्यांवर देखरेख ठेवण्याचा, त्यांच्यावर मर्यादा घालण्याचा, त्यात बदल करण्याचा किंवा ती काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे, हे तुम्हाला समजते आणि तुम्ही त्याला सहमती दर्शवता. उदाहरणार्थ, Reddit तुमच्याकडून व्हॉल्ट वैशिष्ट्यांचा वापर करून हस्तांतरित करता येणाऱ्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंच्या हस्तांतरणाची वारंवारता आणि संख्या यावर मर्यादा घालू शकते किंवा तुम्ही प्रीव्ह्यू अटींचे उल्लंघन केले आहे किंवा त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहात, असा Reddit ला वाजवी विश्वास असल्यास, तत्सम व्हॉल्ट वैशिष्ट्यांचा तुमचा अ‍ॅक्सेस तात्पुरता मर्यादित करू शकते.

व्हॉल्ट वैशिष्ट्यांचा वापर करून पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला ब्लॉकचेन नेटवर्क शुल्क भरण्यासाठी किंवा इतर सशुल्क सेवा खरेदी करण्यासाठी सूचित केले जाऊ शकते. Reddit ब्लॉकचेन नेटवर्क शुल्के नियंत्रित करत नाहीत. ब्लॉकचेन नेटवर्क शुल्क भरणे तुम्हाला सोपे जावे यासाठी Reddit व्हॉल्ट वैशिष्ट्यांद्वारे विनामूल्य सेवा किंवा सशुल्क सेवा देऊ शकते, ज्याद्वारे तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ब्लॉकचेन नेटवर्क शुल्क भरू शकता. तथापि, सेवांद्वारे तुमच्याकडून ब्लॉकचेन नेटवर्क शुल्क किंवा इतर सशुल्क सेवांसाठी केलेल्या कोणत्याही पेमेंटवर तृतीय पक्ष सेवा पुरवठादारामार्फत प्रक्रिया केली जाते आणि त्यांच्याकडून ऑफर केल्या जाणाऱ्या सेवांचा तुमचा वापर स्वतंत्र कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरणांच्या अधीन असू शकतो. Reddit हा कोणत्याही तृतीय पक्ष सेवा पुरवठादारासोबतच्या तुमच्या करारांचा पक्षकार नाही आणि तुमच्याकडून ब्लॉकचेन नेटवर्क शुल्क भरताना सर्व नियामक आवश्यकतांचे पालन करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्याकडून ऑफर केल्या जाणाऱ्या कोणत्याही सेवांचा वापर करण्यापूर्वी तुम्ही त्यांच्या कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरणे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

4.4 पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंमधील तृतीय पक्षाचे हक्क

काही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू या Reddit आणि तृतीय पक्ष परवानादात्यांमधील सहयोगांचा परिणाम असू शकतात आणि इकॉन अटी च्या कलम 4 मधील अटी व नियम पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंशी संबंधित डिजिटल वस्तूंच्या आर्टमधील तृतीय पक्षाच्या हक्कांनाही समानपणे लागू होतात.

तुमच्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूशी संबंधित कोणत्याही डिजिटल गुड आर्टमध्ये तृतीय पक्षाचे हक्क असल्यास, तुम्ही हे समजून घेता आणि मान्य करता की:

  • डिजिटल वस्तू आर्टमध्ये समाविष्ट केलेले आणि या प्रीव्ह्यू अटींमध्ये नमूद केलेल्या परवान्याच्या आणि निर्बंधांच्या अधीन असलेले तृतीय पक्ष हक्क वगळता, तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणतेही तृतीय पक्ष हक्क वापरण्याचा अधिकार असणार नाही;

  • त्या तृतीय पक्ष हक्कांच्या धारकास प्रीव्ह्यू अटींचा अभिप्रेत लाभार्थी मानले जाते;

  • तुम्ही कोणतीही पडताळणी केलेली डिजिटल वस्तू मिळवताना किंवा खरेदी करताना त्या तृतीय पक्ष हक्कांच्या धारकाशी संबंधित कोणत्याही अतिरिक्त अटी तुमच्यासमोर मांडल्या गेल्यास, त्या अटी (प्रीव्ह्यू अटीसह) पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूच्या तुमच्या वापरावर लागू होतील आणि त्याचे नियमन करतील;

  • तृतीय पक्ष हक्कांच्या धारकाने दिलेल्या परवान्याच्या स्वरूपानुसार, Reddit ला डिजिटल वस्तू आर्ट वापरण्याच्या तुमच्या क्षमतेवर अतिरिक्त निर्बंध लागू करावे लागू शकतात; आणि

  • तृतीय पक्ष हक्कांमुळे डिजिटल वस्तू आर्टच्या वापरावर अतिरिक्त निर्बंध लागू असल्याचे Reddit ने तुम्हाला सूचित केल्यास, तुम्ही त्या निर्बंधांचे पालन कराल.

डिजिटल वस्तूची कलाकृती उल्लंघनाच्या दाव्याचा विषय बनल्यास (किंवा तशी शक्यता असल्याचे Reddit ठरवल्यास), Reddit ला डिजिटल वस्तूची कलाकृती बदलण्याचा, डिजिटल वस्तूची कलाकृती वापरणे सुरू ठेवण्याचा अधिकार मिळवण्याचा किंवा डिजिटल वस्तूच्या कलाकृतीसाठी तुमचे परवानाधारक हक्क (लागू असल्यास, अवतार कलाकृतीसाठी तुमचे परवानाधारक हक्क यांसह) समाप्त करण्याचा अधिकार असेल.

5. Devvit ॲप्स

5.1 अवलोकन

तुम्ही Reddit च्या डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या अ‍ॅपशी (Reddit च्या डेव्हलपर अटी यांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) सेवांद्वारे संवाद साधू शकता (एकत्रितपणे, “Devvit ॲप्स”). Devvit ॲप्स Reddit द्वारे किंवा तृतीय पक्षाद्वारे (“डेव्हलपर”) तयार केले जाऊ शकते आणि सामान्यतः समुदायांमध्ये मॉडरेटरद्वारे स्थापित केले जाते तसेच त्यांना डेव्हविट अ‍ॅप म्हणून चिन्हांकित केले जाते.

तुम्ही एखाद्या समुदायाचे मॉडरेटर म्हणून Devvit ॲप इंस्टॉल करत असल्यास, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की Reddit अटी (आमच्या मॉडरेटर आचारसंहिता) यासह कोणतेही Devvit ॲप इंस्टॉल करण्यासाठी आणि वापरण्यासाठी तुम्हाला लागू होत राहतील. Devvit ॲप्स कशी इंस्टॉल करावी आणि वापरण्यास सुरुवात करावी याविषयीची अधिक माहिती तुम्ही येथे पाहू शकता.

काही Devvit ॲप्स तुम्हाला Devvit ॲपमध्ये संवाद साधण्याची आणि आशय तयार करण्याची अनुमती देऊ शकतात. Devvit ॲप सोबत तुम्ही साधलेला कोणताही संवाद आणि तुम्ही तयार केलेला कोणताही आशय आमच्या Reddit अटींच्या (यामध्ये आमचे  गोपनीयता धोरण  आणि Reddit चे नियम यांचा समावेश आहे) अधीन राहतो.

तुम्ही Reddit च्या डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि Devvit ॲप्स यांविषयी येथे अधिक माहिती मिळवू शकता.

5.2 Devvit वस्तू

तुम्ही गोल्डचा वापर करून Reddit किंवा Devvit ॲप्सद्वारे डेव्हलपरनी ऑफर केलेल्या काही विशिष्ट डिजिटल वस्तू, उत्पादने किंवा वैशिष्ट्ये मिळवू शकता (एकत्रितपणे, “Devvit वस्तू”). Reddit Devvit वस्तू ऑफर करते, तेव्हा तुम्ही Devvit वस्तू थेट Reddit कडून मिळवत असता आणि त्यांच्याशी संबंधित कोणताही वाद Reddit शी येथे संपर्क साधून सोडवला पाहिजे.

डेव्हलपरकडून मिळणाऱ्या Devvit वस्तू या आमच्या  इकॉन अटी  अंतर्गत तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवा आहेत आणि त्या Devvit वस्तूंसाठी डेव्हलपरनी घालून दिलेल्या वापराच्या कोणत्याही अटींच्या अधीन आहेत. एखादा डेव्हलपर Devvit वस्तू ऑफर करतो, तेव्हा Reddit त्या डेव्हलपरच्या वतीने किंवा त्याचा एजंट म्हणून काम करत असू शकते आणि तुम्ही Devvit वस्तू थेट त्या डेव्हलपरकडून मिळवत असता. Devvit वस्तूंशी संबंधित तुमच्यात आणि डेव्हलपरमध्ये उद्भवणारे कोणतेही वाद थेट डेव्हलपरशी संपर्क साधून सोडवले पाहिजेत, आणि तो वाद सोडवण्यासाठी डेव्हलपर जबाबदार आहे. लागू असलेल्या Devvit अ‍ॅपचा  येथे शोध घेऊन तुम्ही Devvit वस्तूंच्या वापराच्या अटी आणि डेव्हलपरची संपर्क माहिती मिळवू शकता.

Devvit वस्तू मिळवण्यासाठी गोल्डचा तुमचा वापर आमच्या  इकॉन अटी  च्या (आमच्या परतावा धोरणासह) अधीन आहे.

5.3 Devvit ॲपच्या गोपनीयतेविषयक बाबी

Devvit ॲप्स Reddit च्या डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जातात आणि ते तुमचा सार्वजनिक आशय (Reddit च्या सार्वजनिक आशय धोरण यामध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) तसेच Devvit ॲप्स सोबतचे तुमचे संवाद संकलित आणि संग्रहित करू शकतात. काही Devvit ॲप्स त्यांच्या गोपनीयता धोरणानुसार तुमचा सार्वजनिक आशय आणि तुमचे संवाद बाह्य वेबसाइटसोबतदेखील शेअर करू शकतात. याव्यतिरिक्त, Devvit वस्तू ऑफर करणारे Devvit ॲप्स कोणत्याही Devvit वस्तूंवरील अतिरिक्त माहिती संकलित, शेअर आणि संग्रहित करू शकतात.

गोपनीयता धोरण वापरकर्त्यांचा डेटा संकलित करताना, सामायिक करताना आणि संग्रहित करताना Reddit चे  गोपनीयता धोरण  याचे पालन करणे आवश्यक आहे. तथापि, Devvit ॲप्सशी संवाद साधण्यापूर्वी त्यांच्या गोपनीयता धोरणांचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते वापरकर्त्यांच्या डेटाचे कशा प्रकारे हाताळणी करतात याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. लागू असलेल्या Devvit ॲपचा शोध  येथे घेऊन, तुम्ही त्या Devvit ॲपचे गोपनीयता धोरण आणि वापरकर्ता डेटासंदर्भातील परवानग्या पाहू शकता. Devvit ॲपच्या गोपनीयतेसंदर्भातील सर्वसाधारण अधिक माहितीसाठी  येथे पहा.

6.Reddit प्रोग्राम

आम्ही वेळोवेळी वैशिष्ट्यांशी संबंधित काही कार्यक्रम उपलब्ध करून देऊ शकतो, ज्यामुळे पात्र reddit वापरकर्त्यांना आणि तृतीय पक्षांना त्यांच्या डिजिटल वस्तू, पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू, Devvit ॲप्स, Devvit वस्तू, सेवा किंवा Reddit, सेवा, समुदाय किंवा इतर Reddit वापरकर्त्यांना दिलेल्या इतर योगदानांसाठी लाभ मिळू शकतील किंवा अन्यथा त्यांना मोबदला मिळू शकेल (एकत्रितपणे, “Reddit कार्यक्रम”). Reddit कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी मिळण्यापूर्वी तुम्हाला अतिरिक्त अटी, धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियम मान्य करण्यास सांगितले जाऊ शकते (“Reddit कार्यक्रम अटी”). उदाहरणार्थ, तुम्हाला पैसे कमावण्याची अनुमती देणाऱ्या कोणत्याही Reddit कार्यक्रमातील सहभाग हा आमच्या कमाईच्या अटी, कमाई धोरण आणि त्या Reddit कार्यक्रमाला लागू असलेल्या इतर कोणत्याही अटींच्या अधीन असेल. Reddit कार्यक्रम अटींचा प्रीव्ह्यू अटी किंवा Reddit अटींशी संघर्ष होत असल्यास, लागू असलेल्या Reddit कार्यक्रमातील तुमच्या सहभागाच्या संदर्भात Reddit कार्यक्रम अटी प्रचलित राहतील.

7. खाते निलंबन किंवा समाप्ती

 वापरकर्ता करार आणि आमच्या Reddit चे नियम यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही आमच्या सेवांसाठी असलेल्या नियमांचे तसेच तुम्ही सहभागी होत असलेल्या प्रत्येक subreddit चे नियम फॉलो करणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी ठरल्यास ते प्रीव्ह्यू अटींचे उल्लंघन ठरू शकते आणि त्याचा परिणाम सेवांमधून किंवा काही विशिष्ट Subreddit मधून तात्पुरती किंवा कायमची बंदी घालण्यात येणे किंवा तुमच्या पोस्ट आणि टिप्पण्या काढून टाकण्यात येणे असा होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्यांचा प्रवेश असलेल्या Subreddit चाही समावेश आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही वैशिष्ट्यांचे लाभ गमावू शकता. यामध्ये सशुल्क सेवा, सदस्यता, डिजिटल वस्तू, डेव्हविट वस्तू, व्हॉल्ट किंवा पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असू शकतो आणि या नुकसानीची आम्ही तुम्हाला कोणतीही भरपाई देणार नाही.

8. तुमच्या स्वीकृती

कोणत्याही वैशिष्ट्याचा अ‍ॅक्सेस आणि वापर करण्याच्या संदर्भात — यामध्ये वैशिष्ट्य म्हणून सेवांद्वारे उपलब्ध करून दिलेली कोणतीही डिजिटल वस्तू, पडताळणी केलेली डिजिटल वस्तू, व्हॉल्ट वैशिष्ट्ये, सदस्यता किंवा इतर Reddit इकॉन वस्तू यांचा समावेश आहे (एकत्रितपणे, “Reddit इकॉन वैशिष्ट्ये”) — तुम्ही असे प्रतिपादन करता, हमी देता, मान्य करता आणि सहमत होता की:

  • तुमच्या Reddit इकॉन वस्तूंसंबंधीच्या मान्यतांचा Reddit इकॉन वैशिष्ट्यांनाही लागू होतो – इकॉन अटी  च्या कलम 6 मध्ये नमूद केलेल्या तुमच्या Reddit इकॉन वस्तूंसंबंधीच्या मान्यता Reddit इकॉन वैशिष्ट्यांनाही समानपणे लागू होतात;
  • Reddit इकॉन वैशिष्ट्ये मनोरंजन आणि करमणुकीसाठी आहेत  – तुम्ही Reddit इकॉन वैशिष्ट्ये सेवांच्या संदर्भात मनोरंजनाच्या उद्देशाने आणि वापरासाठी घेत आहात;
  • तुम्ही Reddit इकॉन वैशिष्ट्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने संपादन करत नाही, –ती इतरांसमोर गुंतवणुकीची संधी म्हणून सादर करणार नाही, ती धारक म्हणून त्यातून कोणताही आर्थिक लाभ किंवा नफा मिळण्याची अपेक्षा ठेवत नाही आणि ती इतरांसमोर आर्थिक लाभ किंवा नफा मिळवण्याची संधी किंवा Reddit मधील कोणतेही हितसंबंध संपादन करण्याची संधी म्हणून सबमिट करणार नाही. तसेच, ती संपादन केल्यामुळे Reddit मधील कोणताही समभाग किंवा इतर मालकीहक्क किंवा कायदेशीर हक्क तुम्हाला प्राप्त होत नाही; तसेच आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्यांमधील अंशतः मालकीचे हक्क विकण्याचा प्रयत्न करणार नाही, कोणत्याही व्यक्तीला Reddit इकॉन वैशिष्ट्यांवर तारणहक्क, धारणाधिकार किंवा इतर कोणताही भार निर्माण करण्याचा किंवा निर्माण करून घेण्याचा अधिकार देणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला तसा अधिकार घेण्याची किंवा प्राप्त करण्याची परवानगी देणार नाही, तसेच कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी सदस्यत्वे, परवाने किंवा इतर हक्क विकणार नाही;
  • तुम्ही बहुतांश Reddit इकॉन वैशिष्ट्ये हस्तांतरित करू किंवा विकू शकत नाही – प्रीव्ह्यू अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या मर्यादित अपवादांच्या अधीन राहून, तुमची Reddit आर्थिक वैशिष्ट्ये (तुमच्या परवानाधारक हक्कांसह) आमच्या परवानगीशिवाय विकता, व्यापार करता, वस्तूंची अदलाबदल करता, हस्तांतरित करता, विनिमय करता, विक्रीसाठी देऊ करता किंवा सेवा किंवा तुमच्या खात्याच्या बाहेर इतर कोणत्याही प्रकारे वापरता येणार नाहीत;
  • तुम्ही कायद्याचे पालन कराल आणि सारासार विचार कराल – फसवणुकीने मिळवलेल्या, चोरी केलेल्या, परवानगीशिवाय घेतलेल्या किंवा अन्यथा बेकायदेशीररीत्या मिळवलेल्या कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्यांचे संपादन किंवा विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांचा वापर करणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही; कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्याचा, सेवांच्या आत किंवा बाहेर, कोणत्याही बेकायदेशीर उद्देशासाठी (यामध्ये बाजारपेठेतील हेराफेरी, पैशांचे गैरव्यवहार, फसवणूक किंवा इतर कोणताही गुन्हा यांचा समावेश आहे), कोणत्याही प्रकारच्या पैज, सट्टेबाजी किंवा जुगारासाठी किंवा प्रतिबंधित वस्तू किंवा सेवांशी संबंधित व्यवहारांविरुद्ध  Reddit च्या धोरण अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या वस्तू किंवा सेवांशी संबंधित कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भात वापर करणार नाही; पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंशी संबंधित कोणतीही महत्त्वपूर्ण, सार्वजनिक न केलेली माहिती तुमच्याकडे असताना, तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू संपादित किंवा विक्री करणार नाही; आणि Reddit इकॉन वैशिष्ट्यांचे संपादन किंवा विल्हेवाट लावल्यामुळे लागू होणाऱ्या कायद्यांचे, करासंबंधीच्या दायित्वांसह, पालन कराल; आणि
  • तुम्ही इतर कोणालाही प्रीव्ह्यू अटींचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहित करणार नाही – तुम्ही इतर कोणत्याही तृतीय पक्षाकडून वरीलप्रमाणे किंवा अन्यथा प्रीव्ह्यू अटींमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही निवेदनांचे, हमींचे, स्वीकृतींचे आणि करारांचे उल्लंघन घडवून आणणार नाही किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणार नाही.

वरील नियमांचे पालन करण्यात आणि त्यांचे अनुपालन करण्यात अपयश आल्यास, ते प्रीव्ह्यू अटींचे उल्लंघन ठरू शकते आणि त्याचा परिणाम Reddit किंवा विशिष्ट Subreddit वर तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी घालण्यात किंवा Reddit इकॉन वैशिष्ट्यांचा तुमचा अ‍ॅक्सेस काढून घेण्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही Reddit इकॉन वैशिष्ट्यांचे लाभ गमावू शकता आणि या नुकसानीसाठी आम्ही तुम्हाला कोणतीही भरपाई देणार नाही.

9. तुम्ही या जोखमी स्वीकारता

कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्याचा अ‍ॅक्सेस आणि वापर करण्याच्या संदर्भात, तुम्ही खालील जोखमींची जाणीव असल्याचे मान्य करता आणि त्या जोखमींची जबाबदारी स्वीकारता, तसेच त्यातून होणाऱ्या किंवा त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही दायित्वापासून Reddit ला जबाबदार धरणार नाही:

  • Reddit इकॉन वस्तूंशी संबंधित जोखीम Reddit इकॉन वैशिष्ट्यांना लागू होतात – इकॉन अटी च्या कलम 7 मध्ये नमूद केलेल्या Reddit इकॉन वस्तूंशी संबंधित जोखीम Reddit इकॉन वैशिष्ट्यांनाही समान रीतीने लागू होतात;
  • तुमचे व्हॉल्ट सुरक्षित करण्यात अपयश (अधिक जाणून घ्या) – तुमचे डिव्हाइस हरवल्यास किंवा तुमची व्हॉल्ट ॲक्सेस माहिती विसरल्यास, किंवा एरर किंवा उणिवांमुळे, तुम्ही तुमच्या व्हॉल्टचा ॲक्सेस (त्यामधील कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंसह) गमवू शकता. त्यामुळे, तुमचा व्हॉल्ट तयार केल्यानंतर शक्य तितक्या लवकर तो सुरक्षित करण्यास तुम्ही सहमत आहात (उदा. व्हॉल्टचा पासवर्ड तयार करून, तुमचा रिकव्हरी वाक्यांश आणि खाजगी की सेव्ह करून किंवा व्हॉल्टची इतर वैशिष्ट्ये वापरून); अन्यथा, त्यामध्ये तुम्ही स्टोअर केलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचा ॲक्सेस गमावण्याचा धोका आहे. तसेच, तुम्ही हे समजता की, तुम्ही तुमचा व्हॉल्ट सुरक्षित करण्यात अपयशी ठरलात आणि त्याचा ॲक्सेस गमावला, तर Reddit तुम्हाला तुमच्या व्हॉल्टचा ॲक्सेस (तुमच्या व्हॉल्ट ॲक्सेस माहितीसह आणि तुमच्या व्हॉल्टमध्ये स्टोअर केलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंसह) परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकत नाही आणि तुमच्या पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू स्वतःच्या ताब्यात सुरक्षित न ठेवल्याबद्दल Reddit तुमच्याप्रती जबाबदार राहणार नाही;
  • ब्लॉकचेनशी संबंधित समस्या – व्हॉल्ट, व्हॉल्ट वैशिष्ट्ये आणि पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंच्या वापरासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे आणि व्हॉल्ट वैशिष्ट्यांद्वारे पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंचे हस्तांतरण करण्यापूर्वी ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच व्हॉल्ट आणि पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंची कार्यक्षमता आणि वैशिष्ट्ये याबद्दल अधिक माहिती करून घेण्यास तुम्ही सहमत आहात; आम्ही सार्वजनिक ब्लॉकचेनवर (त्यावर संग्रहित केलेल्या नोंदींसह) नियंत्रण ठेवत नाही आणि सार्वजनिक ब्लॉकचेन कार्यरत राहतील किंवा तुमच्या व्हॉल्टला (त्यामध्ये असलेल्या कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंसह) समर्थन देत राहतील याची हमी देऊ शकत नाही, तसेच कोणत्याही बिघाडासाठी, खंडित होण्यासाठी, मायनिंगसाठी, मालवेअरसाठी, सेवा नाकारण्याच्या हल्ल्यांसाठी किंवा हॅकर्स किंवा तृतीय पक्षांकडून होणाऱ्या इतर हल्ल्यांसाठी किंवा सार्वजनिक ब्लॉकचेनच्या कोणत्याही हार्ड फोर्कसाठी अथवा व्हॉल्ट किंवा कोणत्याही पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तूंमध्ये सार्वजनिक ब्लॉकचेनसह होणाऱ्या अपडेटसाठी, अपग्रेडसाठी किंवा विसंगतीसाठी आम्ही जबाबदार नाही;
  • हस्तांतरामधील समस्या (अधिक जाणून घ्या)  – Reddit आर्थिक वैशिष्ट्यांचे प्रयत्न केलेले कोणतेही प्रतिबंधित हस्तांतर अवैध आणि अमान्य असले तरीही, प्रीव्ह्यू अटींनुसार तुम्हाला काही Reddit इकॉन वैशिष्ट्ये हस्तांतर करण्याची परवानगी असू शकते. मात्र, तुमच्याकडून Reddit आर्थिक वैशिष्ट्यांचे केलेले कोणतेही हस्तांतर अंतिम असेल आणि ते परत करता येणार नाही. एकदा तुम्ही ते हस्तांतर केल्यानंतर, तुमचे Reddit इकॉन वैशिष्ट्य परत मिळवून देण्यासाठी Reddit तुम्हाला मदत करू शकत नाही आणि करणारही नाही, तसेच कथित नुकसानीसाठी तुम्हाला परतावा किंवा इतर कोणतीही भरपाई देणार नाही. याशिवाय, तुमच्याकडून केलेल्या Reddit इकॉन वैशिष्ट्यांच्या कोणत्याही हस्तांतराबाबत, हस्तांतर स्वीकारणाऱ्या व्यक्तीची ओळख, हस्तांतराचे कारण किंवा कोणतेही हस्तांतर स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे कोणत्याही Reddit आर्थिक वैशिष्ट्याबाबत समाधान यासंबंधी Reddit कोणतेही आश्वासन किंवा हमी देत नाही आणि त्यासाठी जबाबदार राहणार नाही;
  • डेव्हलपरशी संबंधित समस्या – एखादा डेव्हलपर Devvit वस्तू ऑफर करतो, तेव्हा तुम्ही Devvit वस्तू थेट डेव्हलपरकडून प्राप्त करता आणि तुमच्यात व डेव्हलपरमध्ये होणाऱ्या कोणत्याही व्यवहारांशी संबंधित (यामध्ये Devvit वस्तूच्या व्यवहाराशी संबंधित कोणत्याही वादाचा समावेश आहे) कोणतेही आश्वासन किंवा हमी Reddit देत नाही आणि त्यासाठी Reddit जबाबदार नाही; तसेच तुमच्या व्यवहाराचे कारण निश्चित करण्यासाठी किंवा कोणत्याही Devvit वस्तू, Devvit अ‍ॅप किंवा डेव्हलपरबाबत तुम्ही समाधानी आहात की नाही याची खात्री करण्यासाठीही Reddit जबाबदार नाही (तुम्ही Devvit अ‍ॅप्सशी संवाद साधता आणि Devvit वस्तूच्या व्यवहारात सहभागी होता ते फक्त तुमच्या स्वतःच्या जोखमीवर);
  • Reddit कार्यक्रमांसाठी पात्रता – Reddit पात्र Reddit वापरकर्ता आणि तृतीय पक्षांना Reddit आर्थिक वस्तू आणि Reddit आर्थिक वैशिष्ट्यांमधून निर्माण होणाऱ्या महसुलात वाटा घेण्याची परवानगी देऊ शकते; तथापि, कोणत्याही Reddit वापरकर्ता किंवा तृतीय पक्षाला Reddit कडून कोणतीही भरपाई किंवा आर्थिक सहाय्य मिळेल, याची Reddit हमी देत नाही. तसेच, Reddit कार्यक्रमांमधून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या Reddit आर्थिक वस्तू किंवा Reddit आर्थिक वैशिष्ट्यांची संख्या Reddit वाढवू शकते किंवा काही Reddit कार्यक्रमांमधून आर्थिक लाभ मिळवण्याची संभाव्यता पूर्णपणे मागे घेऊ शकते; आणि
  • कर अनुपालन, कायदेशीर कारवाई आणि बदलते कायदे – तुम्ही Reddit कडून Reddit आर्थिक वैशिष्ट्ये खरेदी केल्यानंतर किंवा मिळवल्यानंतर, Reddit आर्थिक वैशिष्ट्यांमधील तुमच्या त्यानंतरच्या कोणत्याही व्यवहारांमुळे देय होणाऱ्या करांसाठी किंवा त्यांच्याशी संबंधित कर परिणामांसाठी Reddit जबाबदार राहणार नाही. तसेच, कोणत्याही कायदेशीर किंवा नियामक कारवाईसाठी (Reddit आर्थिक वैशिष्ट्यांच्या तुमच्या वापरासंदर्भात नियामकांकडून तुमच्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या कोणत्याही चौकशीसह) किंवा कायद्यांमधील बदलांसाठी (कर कायद्यांसह), ज्यांचा Reddit आर्थिक वैशिष्ट्ये, व्हॉल्ट, सार्वजनिक ब्लॉकचेन आणि संबंधित तंत्रज्ञान तसेच त्यांची उपलब्धता सुरू राहण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, Reddit जबाबदार राहणार नाही.

वरील जोखमींची जबाबदारी स्वीकारणे ही Reddit इकॉन वैशिष्ट्य अ‍ॅक्सेस करण्याची आणि त्यांचा वापर करण्याची एक अट आहे, हे तुम्हाला समजते. तुम्ही या जोखमींची जबाबदारी स्वीकारण्यास सहमत नसल्यास, तुम्हाला Reddit इकॉन वैशिष्ट्यांचा वापर करण्याची आमची परवानगी नाही.

10. अस्वीकरणे आणि दायित्वाची मर्यादा

कायद्याने ज्या कमाल मर्यादेपर्यंत परवानगी दिली आहे, त्या मर्यादेपर्यंत, सर्व Reddit इकॉन वैशिष्ट्ये (यामध्ये कोणतीही डिजिटल वस्तू आर्ट तसेच तुमचा व्हॉल्ट आणि कोणत्याही व्हॉल्ट वैशिष्ट्यांचा वापर यांचा समावेश आहे) “जशी आहे,” “ज्या स्वरूपात उपलब्ध आहे,” आणि “सर्व दोषांसह” या तत्त्वावर प्रदान केली जातात; आणि Reddit संबंधित घटक त्यांच्याबाबत किंवा सेवांबाबत (यामध्ये व्हॉल्ट आणि व्हॉल्ट वैशिष्ट्ये तसेच त्यांचे कार्य, उपलब्धता आणि सुरक्षितता यांचा समावेश आहे) कोणत्याही प्रकारची, स्पष्ट किंवा अभिप्रेत, कोणतीही विधाने, हमी किंवा समर्थन देत नाहीत (यामध्ये विशिष्ट उद्देशासाठी योग्यतेची, उल्लंघन न करण्याची, व्यापारीयोग्यतेची किंवा मालकी हक्काची कोणतीही हमी समाविष्ट आहे).

11. फेरबदल करणे किंवा बंद करणे

कोणतेही Reddit इकॉन वैशिष्ट्य वापरून, तुम्हाला हे समजते की ही वैशिष्ट्ये आमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कोणत्याही कारणास्तव किंवा कोणतेही कारण नसतानाही, Reddit वर कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा Reddit वर कोणतेही दायित्व न येता, कधीही बंद केली जाऊ शकतात. आम्ही कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्यात (संपूर्णपणे किंवा अंशतः), कोणत्याही वेळी, तुम्हाला पूर्वसूचना देऊन किंवा पूर्वसूचना न देता, बदल करण्याचा, ते निलंबित करण्याचा किंवा ते बंद करण्याचा अधिकार राखून ठेवतो. Reddit इकॉन वैशिष्ट्याच्या कार्यक्षमतेमध्ये भविष्यात करण्यात येणारे कोणतेही प्रकाशन, अपडेट किंवा इतर कोणतीही भर ही प्रीव्ह्यू अटींच्या अधीन असेल, ज्यामध्ये वेळोवेळी अपडेट केले जाऊ शकते. कोणत्याही Reddit इकॉन वैशिष्ट्यात (संपूर्णपणे किंवा अंशतः) करण्यात आलेल्या कोणत्याही बदलासाठी, निलंबनासाठी किंवा बंद करण्यासाठी आम्ही तुमच्याप्रती किंवा कोणत्याही तृतीय पक्षाप्रती जबाबदार राहणार नाही, याला तुम्ही सहमती दर्शवता. कोणतेही Reddit इकॉन वैशिष्ट्य सेवांवर किंवा सेवांच्या माध्यमातून यापुढे वापरता येत नसल्यास, कोणताही परतावा दिला जाणार नाही.

12. परतावा धोरण

सेवांद्वारे तुम्ही खरेदी केलेल्या सशुल्क सेवा असलेल्या Reddit इकॉन वैशिष्ट्यांचा तुम्हाला त्वरित प्रवेश आणि वापर करता येतो. त्यामुळे, कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, सर्व खरेदी अंतिम असून त्यासाठी परतावा मिळणार नाही आणि खरेदी केलेल्या वस्तू परत करता येणार नाहीत. अंशतः वापरलेल्या बिलिंग कालावधीसाठी आम्ही परतावा देण्यास किंवा जमा रक्कम देण्यास बांधील नाही.

तुम्ही EEA, युनायटेड किंगडम किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहत असल्यास, तुम्हाला कोणतेही कारण न देता या प्रीव्ह्यू अटींमधून 14 कॅलेंडर दिवसांच्या आत माघार घेण्याचा अधिकार आहे. माघार घेण्याचा कालावधी या प्रीव्ह्यू अटींचा निष्कर्ष काढल्याच्या तारखेपासून 14 कॅलेंडर दिवसांचा आहे. माघार घेण्याचा तुमचा अधिकार वापरण्यासाठी, तुम्ही Reddit कडे  विनंती सबमिट करणे  आवश्यक आहे.

तथापि, कृपया लक्षात घ्या की, तुम्ही अशा Reddit इकॉन वैशिष्ट्यांची खरेदी करता तेव्हा तुमचा माघार घेण्याचा अधिकार संपुष्टात येतो, जी सशुल्क सेवा किंवा तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवा आहेत आणि ज्यामध्ये: (a) डिजिटल वस्तू, पडताळणी केलेल्या डिजिटल वस्तू किंवा Devvit वस्तू वापरण्यासाठीचा परवाना; किंवा (b) सदस्यत्व यांचा समावेश आहे. या सशुल्क सेवा आणि तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवा तुम्हाला डिजिटल वस्तू, पडताळणी केलेली डिजिटल वस्तू किंवा Devvit वस्तू तुमच्या खात्यात किंवा व्हॉल्टमध्ये जमा झाल्यानंतर किंवा सदस्यता सुरू झाल्यानंतर प्रदान केल्या जातात आणि तुम्ही या सशुल्क सेवा आणि तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवा खरेदी केल्यानंतर त्याच प्रकारे तुम्हाला तात्काळ प्रदान करण्याची विनंती करता आणि त्यास संमती देता, ज्या वेळी तुमचा माघार घेण्याचा अधिकार संपुष्टात येतो.

13. संकीर्ण

Reddit अटी (आमचा  वापरकर्ता करार आणि  इकॉन अटी) सह या संदर्भाद्वारे या प्रीव्ह्यू अटींमध्ये समाविष्ट करण्यात येत असून, त्यांचा या प्रीव्ह्यू अटीचा भाग बनवण्यात येत आहे. कोणत्याही Reddit अटी आणि या प्रीव्ह्यू अटीमध्ये विसंगती असल्यास, Reddit आर्थिक वैशिष्ट्यांमध्ये तुमचा प्रवेश तसेच त्यांची खरेदी आणि वापर यांच्याशी संबंधित बाबींमध्ये या प्रीव्ह्यू अटी लागू होतील.

⌂ 换网址