Reddit चा वापरकर्ता करार

Reddit चा वापरकर्ता करार

लागू होण्याची तारीख: 1 जुलै 2026. शेवटची सुधारणा केली: 26 मे 2026

 

Reddit लाखो वेगवेगळ्या ऑनलाइन समुदायांना चालना देते. हा वापरकर्ता करार आणि तुमचे वर्तन यामुळे हे शक्य होते.

  • तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये किंवा युरोपियन इकॉनॉमिक एरिया (“EEA”), युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंडच्या बाहेर राहत असाल, तर तुमच्या अटी येथे आहेत.

  • तुम्ही EEA, युनायटेड किंगडम किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहत असाल, तर तुमच्या अटी येथे आहेत.


 

तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये किंवा EEA, युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंडच्या बाहेर राहत असल्यास, Reddit वापरकर्ता करार लागू होईल

नमस्कार, Reddit वापरकर्त्यांनो आणि इंटरनेटवरील लोकांनो! हा Reddit वापरकर्ता करार(“अटी”) तुमच्या वेबसाइट, मोबाइल ॲप्स, विजेट, API, ईमेल आणि इतर ऑनलाइन उत्पादने व सेवांचा ॲक्सेस आणि त्यांचा वापर (एकत्रितपणे, “सेवा”) यांना लागू होतो, ज्या Reddit, Inc. (“Reddit,” “आम्ही,” “आम्ही,” किंवा “आमचे”) याद्वारे पुरवल्या जातात.

लक्षात ठेवा, Reddit हे मनोरंजनासाठी असून ते तुमच्या करमणुकीचे ठिकाण म्हणून बनवले गेलेले आहे, तरीही आपण काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आमच्या सेवा ॲक्सेस करून किंवा वापरून, तुम्ही या अटींशी बांधील राहण्यास सहमत आहात. तुम्ही या अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही आमच्या सेवा ॲक्सेस करू किंवा वापरू शकत नाही

1. सेवांचा तुमचा ॲक्सेस

13 वर्षांखालील कोणालाही सेवा वापरण्याची किंवा त्या ॲक्सेस करण्याची अनुमती नाही. आमच्या काही सेवांसाठी तुमचे वय जास्त असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, Reddit वर प्रौढांसाठीचा आशय पाहण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही सेवा ॲक्सेस करताना, कृपया सर्व सूचना आणि कोणत्याही अतिरिक्त अटी काळजीपूर्वक वाचा.

सेवांचा वापर करून, तुम्ही असे नमूद करता की:

तुम्ही व्यवसाय किंवा सरकारी संस्था यांसारख्या अन्य कायदेशीर संस्थेच्या वतीने या अटी स्वीकारत असल्यास, तुम्ही असे घोषित करता की, त्या संस्थेला या अटींशी बांधील ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण कायदेशीर अधिकार आहे.

2. गोपनीयता

Reddit चे गोपनीयता धोरण तुम्ही आमच्या सेवा अ‍ॅक्सेस करताना किंवा त्यांचा वापर करताना आम्ही तुमच्याबद्दलची माहिती कशी आणि का गोळा करतो, वापरतो आणि शेअर करतो, हे यात स्पष्ट केले आहे. तुम्ही आमच्या सेवांचा वापर करता तेव्हा, गोपनीयता धोरण. नमूद केल्याप्रमाणे ही माहितीच्या गोळा करण्यास आणि वापरण्यास तुम्ही सहमती देत आहात, हे तुम्ही समजता.

3. तुमचा सेवांचा वापर

या अटींचे तुम्ही पूर्ण आणि सतत पालन करण्याच्या अधीन राहून, Reddit तुम्हाला खालील गोष्टींसाठी वैयक्तिक, ट्रान्सफर करता न येणारा, विशेष नसलेला, रद्द करण्यायोग्य, मर्यादित परवाना देते: (a) तुमच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली असलेल्या मोबाइल डिव्हाइसवर, कायदेशीर मार्केटप्लेसमधून मिळवलेल्या आमच्या सेवांशी संबंधित मोबाइल ॲप्लिकेशनची कॉपी इंस्टॉल करणे आणि वापरणे; आणि (b) सेवा ॲक्सेस करणे आणि त्यांचा वापर करणे. या अटींद्वारे तुम्हाला स्पष्टपणे न दिलेले सर्व अधिकार आम्ही राखून ठेवतो.

लागू कायद्यानुसार असे निर्बंध अस्वीकार्य असतील त्या मर्यादेव्यतिरिक्त आणि फक्त त्या मर्यादेपर्यंत, आमच्या लेखी संमतीशिवाय तुम्ही असे करू शकत नाही:

  • सेवा किंवा आशयाचा परवाना देणे, त्याची विक्री करणे, ट्रान्सफर करणे, असाइन करणे, होस्ट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांचा व्यावसायिक वापर करणे;
  • सेवा किंवा आशयाच्या कोणत्याही भागामध्ये बदल करणे, त्यापासून साधित कामे तयार करणे, तो डिसअसेंबल करणे, डीकंपाइल करणे किंवा रिव्हर्स इंजिनिअर करणे; किंवा
  • कोणत्याही अतिरिक्त अटींअंतर्गत (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) परवानगी असल्याशिवाय, समान किंवा स्पर्धात्मक वेबसाइट, उत्पादन किंवा सेवा तयार करण्याच्या उद्देशाने सेवा किंवा आशयाचा वापर करणे.

आम्ही आमच्या सेवांमध्ये सतत सुधारणा करत असतो. याचा अर्थ असा की आम्ही वैशिष्ट्ये, उत्पादने किंवा कार्यक्षमता जोडू किंवा काढून टाकू शकतो; आम्ही तुम्हाला आधीच सूचित करण्याचा प्रयत्न करू, पण ते नेहमीच शक्य होणार नाही. तुम्हाला सूचना देऊन किंवा न देता, कोणत्याही वेळी सेवांमध्ये (पूर्ण किंवा अंशतः) बदल करण्याचा, त्या निलंबित करण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. सेवांच्या संदर्भात भविष्यात येणारी कोणतीही आवृत्ती, अपडेट किंवा कार्यक्षमतेमध्ये केलेली इतर कोणतीही भर ही या अटींच्या अधीन असेल; या अटी वेळोवेळी अपडेट केल्या जाऊ शकतात. तुम्ही हे मान्य करता की, सेवांमध्ये किंवा त्यांच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही बदल केल्यास, त्या निलंबित केल्यास किंवा बंद केल्यास, त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जबाबदार राहणार नाही.

आम्ही सेवांवरील तुमचा अनुभव विविध घटकांच्या आधारावर पर्सनलाइझ करतो, ज्यामध्ये सेवांवरील तुमची ॲक्टिव्हिटी, तुम्ही सदस्यत्व घेतलेले समुदाय आणि तुमच्या सेटिंग्जमध्ये तुम्ही नमूद केलेल्या प्राधान्यांचा समावेश आहे. या आणि इतर घटकांच्या आधारे, आम्ही तुम्हाला काही शिफारशी करू शकतो, ज्यामुळे Reddit वरील तुमचा अनुभव अधिक सुसंबद्ध होईल. तुमच्यासाठी असलेल्या आशय शिफारशींबद्दल अधिक माहितीसाठी, तसेच काही पर्सनलायझेशन पर्यायांवर तुम्ही कशा प्रकारे नियंत्रण ठेवू शकता, याच्या वर्णनासाठी, कृपया आमचे मदत केंद्रपहा.

4. तुमचे Reddit खाते आणि खात्याची सुरक्षा

आमच्या सेवांमधील काही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुम्हाला Reddit खाते (“खाते”) तयार करावे लागेल आणि गोपनीयता धोरण यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि तुमच्याबद्दलची इतर काही माहिती आम्हाला द्यावी लागेल.

तुमच्या खात्याशी संबंधित माहितीसाठी आणि तुमच्या खात्याच्या संदर्भात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. तुम्ही तुमच्या खात्याची सुरक्षा राखणे आवश्यक आहे. तुमच्या परवानगीशिवाय कोणीतरी तुमचे खाते ॲक्सेस केले आहे, असे तुम्हाला आढळले किंवा संशय आला, तर लगेच Reddit ला सूचित करा. आम्ही शिफारस करतो की तुम्ही फक्त तुमच्या खात्यासाठीच वापरला जाणारा मजबूत पासवर्ड वापरावा आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करावे. तुम्ही तुमच्या खात्यात तुमचा फोन नंबर जोडल्यास आणि नंतर तो बदलल्यास किंवा डीॲक्टिव्हेट केल्यास, तुमच्या खात्याची माहिती अपडेट केल्याची खात्री करा.

आमच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या खात्याचा परवाना कोणालाही देऊ शकत नाही, ते विकू शकत नाही किंवा ट्रान्सफर करू शकत नाही.

5. तुमचा आशय

सेवांमध्ये माहिती, मजकूर, लिंक, ग्राफिक, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, स्ट्रीम, सॉफ्टवेअर, टूल किंवा इतर साहित्य (“आशय”) असू शकते, ज्यामध्ये तुमच्याद्वारे किंवा तुमच्या खात्याद्वारे सेवांवर तयार केलेला किंवा सादर केलेला आशय(“तुमचा आशय”) समाविष्ट आहे. आम्ही तुमच्या कोणत्याही आशयाच्या पूर्णतेची, सत्यतेची, अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि आम्ही त्याला स्पष्टपणे किंवा अप्रत्यक्षपणे मान्यता, समर्थन किंवा हमी देत नाही.

तुमचा आशय सेवांना सादर करून, तुम्ही हे दर्शवता आणि हमी देता की, या अटींमध्ये नमूद केलेले तुमच्या आशयाचे अधिकार देण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक अधिकार, शक्ती आणि अधिकरण आहे. तुमच्या आशयासाठी फक्त तुम्हीच जबाबदार असल्यामुळे, सर्व आवश्यक हक्कांशिवाय आशय पोस्ट किंवा शेअर केल्यास तुम्ही कायदेशीर जबाबदारीस पात्र ठरू शकता.

तुमच्या आशयावरील तुमचे कोणतेही मालकी हक्क तुमच्याकडेच राहतील, पण तुम्ही Reddit ला तो आशय वापरण्याचा खालील परवाना देता:

जेव्हा तुमचा आशय सेवांद्वारे तयार किंवा सादर केला जातो, तेव्हा तुम्ही आम्हाला तुमचा आशय आणि त्याशी संबंधित दिलेले कोणतेही नाव, वापरकर्ता नाव, आवाज किंवा जुळणी, आता ज्ञात असलेल्या किंवा नंतर विकसित होणाऱ्या सर्व मीडिया फॉरमॅट आणि चॅनलमध्ये, जगभरात कुठेही वापरण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, फेरबदल करण्यासाठी, अनुकूलित करण्यासाठी, त्यातून साधित कामे तयार करण्यासाठी, वितरित करण्यासाठी, संग्रहित करण्यासाठी, सादर करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी जागतिक, रॉयल्टी-मुक्त, कायमस्वरूपी, अपरिवर्तनीय, अनन्य नसलेला, ट्रान्सफर न करता येणारा आणि उप-परवानायोग्य परवाना प्रदान करता. या परवान्यामध्ये, Reddit सोबत भागीदारी करणाऱ्या इतर कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींद्वारे तुमचा आशय सिंडिकेशन, प्रसारण, वितरण किंवा प्रकाशनासाठी उपलब्ध करून देण्याचा अधिकार आम्हाला मिळतो. उदाहरणार्थ, आमचे सार्वजनिक आशय धोरण यामध्ये अधिक तपशीलवार वर्णन केल्यानुसार, AI आणि मशीन लर्निंग मॉडेलना प्रशिक्षित करण्यासाठी तुमचा आशय वापरण्याचा अधिकार या परवान्यामध्ये समाविष्ट आहे . तुम्ही हेदेखील मान्य करता की आम्ही तुमच्या आशयाशी संबंधित मेटाडेटा काढून टाकू शकतो आणि तुम्ही तुमच्या आशयासंदर्भात नैतिक हक्क किंवा श्रेयवादाचे कोणतेही दावे आणि प्रतिपादने रद्द करता आणि नंतर त्यावर कधीही दावे करणार नाही.

Reddit किंवा आमच्या सेवांबद्दल तुम्ही आम्हाला देत असलेल्या कोणत्याही कल्पना, सूचना आणि फीडबॅक पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि तुम्ही सहमत आहात की Reddit अशा कल्पना, सूचना आणि फीडबॅकचा वापर तुम्हाला कोणताही मोबदला न देता किंवा तुमच्यावर कोणतेही बंधन न घालता करू शकते.

तुमच्या आशयाची तपासणी करणे, संपादन करणे किंवा त्यावर देखरेख ठेवणे आमच्यावर बंधनकारक नसले तरी, आम्ही आमच्या पूर्ण विवेकानुसार, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कारणास्तव, तुमचा आशय हटवू शकतो, कमाईसाठी अपात्र ठरवू शकतो किंवा काढून टाकू शकतो; यामध्ये या अटींचे, आमचे Reddit चे नियमकिंवा आमच्या इतर अटी आणि धोरणे यांचे उल्लंघन केल्यास किंवा तुम्ही अन्यथा आमच्यासाठी दायित्व निर्माण केल्यास किंवा निर्माण करण्याची शक्यता असल्यास, अशा कारणांचा समावेश होतो.

Reddit च्या आशय मॉडरेशनच्या पद्धतीबद्दल अधिक माहितीसाठी, ज्यामध्ये आम्ही आमचे Reddit चे नियमकसे लागू करतो आणि आशय मॉडरेशनच्या निर्णयांविरुद्ध अपील कसे करावे याचा समावेश आहे, कृपया आमचे मदत केंद्रभेट द्या.

6. तृतीय पक्ष आशय, जाहिराती आणि प्रसिद्धी

या सेवांमध्ये तृतीय पक्ष वेबसाइट, उत्पादने किंवा सेवांच्या लिंक असू शकतात, ज्या जाहिरातदार, आमचे सहयोगी, आमचे भागीदार किंवा इतर वापरकर्त्यांद्वारे पोस्ट केल्या जाऊ शकतात (“तृतीय पक्ष आशय”). तृतीय पक्ष आशय आमच्या नियंत्रणाखाली नाही आणि आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाच्या वेबसाइट, उत्पादने किंवा सेवांसाठी जबाबदार नाही. तृतीय पक्ष आशयाचा तुमचा वापर तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आहे आणि अशा तृतीय पक्ष आशयाच्या संबंधात कोणताही व्यवहार करण्यापूर्वी, तुम्हाला आवश्यक वाटेल ती कोणतीही चौकशी तुम्ही करावी.

सेवांमध्ये प्रायोजित तृतीय पक्ष आशय किंवा जाहिराती देखील असू शकतात. जाहिरातींचा प्रकार, व्याप्ती आणि लक्ष्यीकरण बदलू शकते, आणि तुम्ही हे मान्य करता व सहमत आहात की आम्ही सेवांवरील कोणत्याहीआशयाच्या किंवा माहितीच्या प्रदर्शनासंदर्भात, तुमच्या सामग्रीसह, जाहिराती ठेवू शकतो.

तुम्ही एखादी स्पर्धा किंवा स्वीपस्टेक्स (“प्रमोशन”) यासह एखादे प्रमोशन आयोजित करण्यासाठी सेवांचा वापर करण्याचे निवडल्यास, सर्व लागू कायदे आणि नियमांनुसार प्रमोशन आयोजित करण्याची जबाबदारी फक्त तुमची असेल. यामध्ये अधिकृत नियम, ऑफरच्या अटी, पात्रतेच्या आवश्यकता तयार करणे आणि प्रमोशन नियंत्रित करणारे लागू कायदे, अटी आणि नियमांचे (जसे की परवाने, नोंदणी, बंधपत्रे आणि नियामक मान्यता) पालन करणे यांचा समावेश आहे. तुमच्या प्रमोशनमध्ये हे नमूद करणे आवश्यक आहे की हे प्रमोशन Reddit द्वारे प्रायोजित, समर्थित किंवा त्याच्याशी संबंधित नाही आणि तुमच्या प्रमोशनच्या नियमांनुसार प्रत्येक प्रवेशकर्ता किंवा सहभागी व्यक्तीने प्रमोशनशी संबंधित कोणत्याही दायित्वातून Reddit ला मुक्त करणे आवश्यक आहे. तुम्ही हे मान्य करता आणि सहमत आहात की आम्ही तुमच्या प्रमोशनमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला मदत करणार नाही आणि तुम्ही तुमचे प्रमोशन स्वतःच्या जोखमीवर आयोजित करण्यास सहमत आहात.

7. तुम्हाला न करता येणाऱ्या गोष्टी

सेवांचा वापर करताना किंवा त्या ॲक्सेस करताना, तुम्ही या अटी आणि सर्व लागू कायदे, नियम आणि अधिनियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कृपया Reddit चे नियम यांचे पुनरावलोकन करा, जे या संदर्भाद्वारे या अटींमध्ये समाविष्ट केले आहेत आणि त्यांचा भाग बनले आहेत आणि त्यामध्ये प्रतिबंधित आशय आणि वर्तनाबद्दलचे आमचे नियम आहेत.Reddit चे नियम यांमध्ये प्रतिबंधित असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त, तुम्ही खालीलपैकी कोणतेही कृत्य करू शकत नाही:

  • सेवांचा वापर अशा कोणत्याही प्रकारे (ऑटोमेटेड, बॉटच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही मार्गाने) करणे, ज्यामुळे सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्या निकामी होऊ शकतात, विस्कळीत होऊ शकतात, त्यांच्यावर अतिभार पडू शकतो किंवा त्या कोणत्याही प्रकारे बाधित होऊ शकतात;
  • दुसऱ्या वापरकर्त्याच्या खात्यामध्ये किंवा सेवांच्या कोणत्याही अप्रकाशित भागांमध्ये, सेवांशी जोडलेल्या किंवा सेवांसोबत वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर सिस्टीम किंवा नेटवर्कसह, ॲक्सेस मिळवणे (किंवा ॲक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करणे);
  • सेवांमध्ये किंवा सेवांद्वारे कोणतेही व्हायरस, वर्म, दुर्भावनापूर्ण कोड किंवा सेवांमध्ये, त्याच्या सुरक्षेसंबंधित वैशिष्ट्यांसह, व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने असलेले इतर सॉफ्टवेअर अपलोड, प्रसारित किंवा वितरित करणे;
  • लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या बौद्धिक संपदा हक्कांचे किंवा इतर कोणत्याही मालकी हक्कांचे उल्लंघन करण्यासाठी सेवांचा वापर करणे;
  • या अटींमध्ये किंवा Reddit सोबतच्या स्वतंत्र करारामध्ये परवानगी दिल्याखेरीज, कोणत्याही मार्गाने (ऑटोमेटेड किंवा अन्यथा) सेवांमधून डेटा ॲक्सेस करणे, शोधणे किंवा गोळा करणे (आम्ही आमच्या robots.txt फाइलमध्ये नमूद केलेल्या पॅरामीटरनुसार सेवा क्रॉल करण्याची सशर्त परवानगी देतो, पण Reddit च्या पूर्व लेखी संमतीशिवाय सेवा स्क्रॅप करण्यास मनाई आहे); किंवा
  • सेवांचा वापर अशा कोणत्याही प्रकारे करणे, ज्याला आम्ही वाजवीपणे Reddit किंवा कोणत्याही पेमेंट सिस्टीमचा गैरवापर किंवा फसवणूक मानतो.

एखादा आशय किंवा कृती या अटींचे किंवा आमचे Reddit चे नियम यांचे उल्लंघन करत आहे, तुम्हाला असे वाटत असल्यास तुम्ही त्याची तक्रार करणे हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो. आम्ही सुरक्षा त्रुटींची जबाबदारीने तक्रार करण्यासही समर्थन देतो. सुरक्षा समस्येची तक्रार करण्यासाठी, कृपया security@reddit.com वर ईमेल पाठवा.

8. मॉडरेटर

Subreddit मॉडरेट करणे ही अनौपचारिक आणि ऐच्छिक भूमिका आहे, जी सेवेच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असू शकते. मॉडरेटरनी केलेल्या कृतींसाठी आम्ही जबाबदार नाही. या अटींचे उल्लंघन करण्याच्या समावेशासह, कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाशिवाय, कोणत्याही वेळी वापरकर्त्याची नियंत्रण करण्याची क्षमता रद्द किंवा मर्यादित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

तुम्ही Subreddit मॉडरेट करण्याचे ठरवल्यास:

  • तुम्ही मॉडरेटर आचारसंहिता याचे पालन करण्यास सहमती दर्शवता;
  • तुम्ही सहमत आहात की, तुम्ही नियंत्रित करत असलेल्या Subreddit शी संबंधित तक्रारी मिळाल्यावर, तुम्ही योग्य ती कृती कराल, ज्यामध्ये धोरणाचे उल्लंघन करणारा आशय काढून टाकणे आणि/किंवा पुनरावलोकनासाठी त्वरित Reddit कडे एस्कलेट करणे यांचा समावेश असू शकतो;
  • तुम्ही Reddit च्या वतीने काम करण्यास अधिकृत नाही आणि तुम्ही तसे अधिकृत असल्याचे दर्शवूही शकत नाही;
  • आमच्या लेखी मंजुरीशिवाय, तुम्ही Reddit च्या वतीने किंवा तुम्ही मॉडरेट करत असलेल्या कोणत्याही Subreddit च्या वतीने तिसऱ्या पक्षासोबत कोणताही करार करू शकत नाही;
  • तुम्ही तृतीय पक्षांकडून कोणत्याही स्वरूपातील भरपाई, मोबदला, भेटवस्तू किंवा उपकार मिळवून त्या बदल्यात मॉडरेशन कृती करू शकत नाही;
  • तुम्हाला Subreddit मॉडरेट केल्यामुळे अप्रकाशित माहिती उपलब्ध झाली, तर तुम्ही अशा माहितीचा वापर केवळ मॉडरेटर म्हणून तुमच्या कामगिरीच्या संदर्भातच कराल; आणि
  • तुम्ही मॉडरेट करत असलेल्या Subreddit साठी नियम तयार करून लागू करू शकता, परंतु असे नियम या अटी, Reddit चे नियम किंवा मॉडरेटर आचारसंहिता यांच्याशी विसंगत नसावेत.

एखाद्या मॉडरेटरची कोणतीही कृती किंवा निर्णय Reddit च्या किंवा Reddit समुदायाच्या हिताची नाही, असे Reddit ला स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार वाटल्यास, Reddit ती कृती किंवा निर्णय रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते, पण असे करणे त्यांच्यासाठी बंधनकारक नाही.

9. कॉपीराइट, ट्रेडमार्क, DMCA आणि काढून टाकणे

Reddit इतरांच्या बौद्धिक संपदेचा आदर करते आणि आमच्या सेवांच्या वापरकर्त्यांनीही तसेच करावे अशी अपेक्षा करते. आमच्याकडे हे धोरण आहे, ज्यामध्ये उल्लंघन करणारा कोणताही आशय सेवांमधून काढून टाकणे आणि योग्य परिस्थितीत, वारंवार उल्लंघन करणाऱ्या आमच्या सेवांच्या वापरकर्त्यांची सेवा समाप्त करणे समाविष्ट आहे. आमच्या सेवांवरील कोणतीही गोष्ट तुमच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली असलेल्या कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन करत आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आमचा कॉपीराइटची तक्रार करण्याचा फॉर्म किंवा ट्रेडमार्कची तक्रार करण्याचा फॉर्मभरून किंवा खालील पत्त्यावर संपर्क साधून Reddit च्या नियुक्त एजंटला सूचित करू शकता:

कॉपीराइट एजंट
Reddit, Inc.
303 2nd Street, Suite 500S,
San Francisco, CA 94107
copyright@reddit.com

योग्य नोटिफिकेशनच्या आवश्यकतांसाठी 17 USC § 512(c)(3) पहा. तसेच, कृपया लक्षात घ्या की तुम्ही आमच्या सेवांवरील कोणतीही ॲक्टिव्हिटी किंवा साहित्य उल्लंघन करणारे आहे, अशी जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला Reddit ला काही खर्च आणि नुकसानभरपाई द्यावी लागू शकते.

कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क सूचनेला प्रतिसाद म्हणून आम्ही तुमचा आशय काढून टाकल्यास, आम्ही तुम्हाला सूचित करू. कॉपीराइट सूचनेतील चुकीमुळे किंवा चुकीच्या ओळखीमुळे तुमचा आशय चुकीने काढून टाकला गेल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आमच्या कॉपीराइट प्रतिसूचना फॉर्मयाद्वारे किंवा आमच्या कॉपीराइट एजंटकडे (संपर्क माहिती वर दिली आहे) प्रतिसूचना पाठवू शकता. योग्य प्रतिसूचनेच्या आवश्यकतांसाठी कृपया 17 USC § 512(g)(3) पहा.

10. सशुल्क सेवा

सेवांच्या अनेक पैलूंच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तथापि, काही सेवा, वैशिष्ट्ये आणि उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध असू शकतात (“सशुल्क सेवा”). या अटींव्यतिरिक्त, Reddit इकॉन अटी यादेखील सशुल्क सेवांना लागू होतात. सशुल्क सेवा खरेदी करून किंवा वापरून, तुम्ही इकॉन अटी आणि, लागू असल्यास प्रीव्ह्यू अटी यांनादेखील सहमती दर्शवता.

11. बौद्धिक संपदा

या सेवांची मालकी Reddit कडे असून, त्यांचे संचालनही Reddit द्वारे केले जाते. Reddit ने पुरवलेले व्हिज्युअल इंटरफेस, ग्राफिक, डिझाइन, संकलन, माहिती, डेटा, कॉम्प्युटर कोड, उत्पादने, सेवा, ट्रेडमार्क आणि सेवांचे इतर सर्व घटक (“साहित्य”) हे बौद्धिक संपदा आणि इतर कायद्यांद्वारे संरक्षित आहेत. सेवांमध्ये समाविष्ट असलेले सर्व साहित्य हे Reddit किंवा त्याच्या तृतीय पक्ष परवानाधारकांची मालमत्ता आहे. तुम्ही हे मान्य करता आणि सहमत आहात की, साहित्य डाउनलोड करून किंवा सशुल्क सेवा खरेदी करून तुम्हाला कोणतेही मालकी अधिकार प्राप्त होणार नाहीत. Reddit ने स्पष्टपणे अधिकृत केल्याशिवाय आणि Reddit ची ब्रँड मार्गदर्शक तत्त्वे यांच्या अधीन राहून , तुम्ही साहित्याचा वापर करू शकत नाही. या अटींमध्ये स्पष्टपणे व्यक्त न केलेले साहित्यावरील सर्व अधिकार Reddit ने राखून ठेवले आहेत.

12. नुकसानभरपाई

कायद्याने प्रतिबंधित केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त, तुम्ही Reddit, त्याचे संलग्नक, आणि त्यांचे संबंधित संचालक, अधिकारी, कर्मचारी, एजंट, कंत्राटदार, तृतीय पक्ष सेवा पुरवठादार आणि परवानाधारक ("Reddit संस्था") यांना कोणत्याही तृतीय पक्षाने केलेल्या कोणत्याही दाव्यापासून किंवा मागणीपासून, आणि खालील कारणांमुळे, त्यातून उद्भवलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही दायित्व, नुकसान, तोटा आणि खर्चापासून (खर्च आणि वकिलांच्या शुल्कासह) सुरक्षित ठेवण्यास, नुकसान भरपाई देण्यास आणि त्यांचे संरक्षण करण्यास सहमत आहात: (a) तुमचा सेवांचा वापर; (b) तुमचे या अटींचे उल्लंघन; (c) तुमचे लागू कायदे किंवा नियमांचे उल्लंघन; किंवा (d) तुमचा आशय. ज्या कोणत्याही बाबीसाठी तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे, त्या बाबीच्या बचावावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो आणि तुम्ही या दाव्यांच्या आमच्या बचावासाठी सहकार्य करण्यास सहमत आहात.

13. डिस्क्लेमर आणि दायित्वाची मर्यादा

या अटींमधील कोणतीही गोष्ट, सेवांचे वापरकर्ता म्हणून तुम्हाला प्राप्त असलेले वैधानिक अधिकार बाधित करत नाही. काही देश, राज्ये, प्रांत किंवा इतर अधिकारक्षेत्रे या विभागात नमूद केल्याप्रमाणे विशिष्ट हमी वगळण्यास किंवा दायित्व मर्यादित करण्यास परवानगी देत नाहीत, त्यामुळे खालील अटी तुम्हाला पूर्णपणे लागू होणार नाहीत. त्याऐवजी, अशा अधिकारक्षेत्रांमध्ये, खालील अपवाद आणि मर्यादा केवळ त्या अधिकारक्षेत्रांच्या कायद्यांनी परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंतच लागू होतील.

या सेवा "जशा आहेत तशा" आणि "ज्या स्वरूपात उपलब्ध आहेत तशा" पुरवल्या जातात. यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्ट, गर्भित, कायदेशीर किंवा वैधानिक हमी, आश्वासन किंवा अटी समाविष्ट नाहीत; ज्यामध्ये व्यापारी योग्यता, मालकी हक्क, विशिष्ट उद्देशासाठी उपयुक्तता आणि उल्लंघन न करणे यांसारख्या गर्भित हमींचाही समावेश होतो. Reddit संस्था या सेवा अचूक, पूर्ण, विश्वासार्ह, अद्ययावत किंवा त्रुटीमुक्त असल्याची कोणतीही हमी देत नाहीत. Reddit सेवांवर उपलब्ध असलेल्या किंवा त्यांच्याशी लिंक केलेल्या कोणत्याही आशयाचे, तसेच मॉडरेटरसह कोणत्याही तृतीय पक्षाच्या किंवा वापरकर्त्याच्या कृतींचे Reddit नियंत्रण करत नाही, त्यांना समर्थन देत नाही किंवा त्यांची जबाबदारी घेत नाही. Reddit आमच्या सेवांचा तुमचा ॲक्सेस आणि वापर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असले, तरी आमच्या सेवा किंवा सर्व्हरमध्ये व्हायरस किंवा इतर हानिकारक घटक नाहीत, अशी कोणतीही हमी किंवा आश्वासन Reddit देत नाही.

कोणत्याही परिस्थितीत, Reddit ची कोणतीही संस्था तुम्हाला या अटी किंवा सेवांशी संबंधित कोणत्याही अप्रत्यक्ष, परिणामी, जरबदार, आकस्मिक, विशेष किंवा दंडात्मक नुकसानासाठी किंवा गमावलेल्या नफ्यासाठी जबाबदार राहणार नाही, ज्यामध्ये सेवांवर उपलब्ध केलेल्या अशा आशयाचा समावेश आहे जो बदनामीकारक, आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. सेवा ॲक्सेस करणे आणि त्यांचा वापर करणे हे तुमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीवर आणि जोखमीवर अवलंबून आहे आणि तुमच्या डिव्हाइस किंवा कॉम्प्युटर सिस्टीमचे कोणतेही नुकसान झाल्यास किंवा परिणामी डेटा गमवल्यास, तुम्हीच पूर्णपणे जबाबदार असाल. कोणत्याही परिस्थितीत Reddit संस्थांचे एकूण दायित्व शंभर अमेरिकन डॉलर ($100) किंवा दाव्यास कारणीभूत असलेल्या सेवांसाठी तुम्ही मागील सहा महिन्यांत Reddit ला दिलेल्या रकमेपैकी जी रक्कम जास्त असेल, त्यापेक्षा जास्त असणार नाही. या विभागातील मर्यादा दायित्वाच्या कोणत्याही सिद्धांताला लागू होतील, मग तो हमी, करार, कायदा, अपकृत्य, निष्काळजीपणा, कठोर दायित्व किंवा इतर कशावरही आधारित असो, Reddit संस्थांना अशा प्रकारच्या नुकसानाच्या शक्यतेबद्दल पूर्वकल्पना दिली गेली असली, तरीही; आणि या अटींमध्ये नमूद केलेला कोणताही उपाय त्याच्या मूळ उद्देशाला साध्य करण्यात अयशस्वी ठरला असल्याचे आढळले, तरीही या मर्यादा लागू राहतील.

14. लागू कायदा आणि कार्यक्षेत्र

तुम्ही Reddit चा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे तुम्हाला काही समस्या किंवा वाद असल्यास, तुम्ही तो आमच्यासमोर मांडून अनौपचारिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्यास सहमती दर्शवता. तुम्ही तुमचा फीडबॅक आणि समस्या यांच्यासाठी येथे आमच्याशी संपर्क साधू शकता .

लागू कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, या अटी किंवा सेवांमधून उद्भवणारे किंवा त्यांच्याशी संबंधित असलेले तुमचे कोणतेही दावे कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्यांनुसार नियंत्रित केले जातील, तेथील कायद्यांच्या संघर्षाच्या नियमांचा विचार न करता; या अटी किंवा सेवांशी संबंधित सर्व विवाद केवळ सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे असलेल्या संघीय किंवा राज्य न्यायालयांमध्ये दाखल केले जातील आणि तुम्ही व Reddit या न्यायालयांच्या वैयक्तिक अधिकारक्षेत्राला संमती देता.

तुम्ही अमेरिकेतील शहर, काउंटी किंवा राज्य सरकारी संस्था असल्यास, हे कलम 14 तुम्हाला लागू होत नाही. तुम्ही अमेरिकेतील संघीय सरकारी संस्था असल्यास, या अटी किंवा सेवांमधून उद्भवणारे किंवा त्यांच्याशी संबंधित कोणतेही दावे, अमेरिकेच्या कायद्यांच्या नियमांच्या विसंगतीचा विचार न करता, अमेरिकेच्या कायद्यांनुसार नियंत्रित केले जातील. संघीय कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, लागू संघीय कायद्याच्या अनुपस्थितीत कॅलिफोर्नियाचे कायदे (त्याच्या कायद्यांच्या नियमांच्या विसंगतीशिवाय) लागू होतील. या अटी किंवा सेवांशी संबंधित सर्व विवाद केवळ सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे असलेल्या संघीय किंवा राज्य न्यायालयांमध्येच दाखल केले जातील.

15. या अटींमधील बदल

आम्ही वेळोवेळी कमाईच्या अटींमध्ये बदल करू शकतो. आम्ही बदल केल्यास, आम्ही सुधारित अटी प्रसिद्ध करू आणि वरील प्रभावी तारीख अपडेट करू. आमच्या पूर्ण विवेकाधिकारानुसार हे बदल महत्त्वपूर्ण असतील, तर आम्ही तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित असलेल्या ॲड्रेसवर ईमेल पाठवून (तुम्ही पडताळणी केलेला ईमेल ॲड्रेस देण्याचा पर्याय निवडला असल्यास) किंवा आमच्या सेवांद्वारे अन्य प्रकारे सूचना पाठवू शकतो. सुधारित अटी लागू होण्याच्या तारखेला किंवा त्यानंतर सेवा ॲक्सेस करणे किंवा वापरणे सुरू ठेवून, तुम्ही सुधारित अटींचे पालन करण्यास सहमती दर्शवता. तुम्ही सुधारित अटींशी सहमत नसल्यास, बदल लागू होण्यापूर्वी तुम्ही आमच्या सेवांचा वापर थांबवला पाहिजे.

16. अतिरिक्त अटी

आम्ही विविध प्रकारच्या सेवा देत असल्यामुळे, Reddit ने ऑफर केलेले एखादे विशिष्ट उत्पादन किंवा सेवा वापरण्यापूर्वी तुम्हाला अतिरिक्त अटी, धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियमांना (एकत्रितपणे, “अतिरिक्त अटी”) सहमती दर्शवण्यास सांगितले जाऊ शकते. सर्व अतिरिक्त अटी या संदर्भाद्वारे या अटींमध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि त्यांचा भाग बनवल्या आहेत आणि ज्या मर्यादेपर्यंत कोणत्याही अतिरिक्त अटी या अटींशी विसंगत असतील, त्या मर्यादेपर्यंत संबंधित सेवांच्या तुमच्या वापराच्या संदर्भात अतिरिक्त अटीच लागू होतील.

  • तुम्ही कोणत्याही सशुल्क सेवा किंवा डिजिटल वस्तू वापरल्यास, तुम्हाला Reddit इकॉन अटी यांनादेखील सहमती दर्शवावी लागेल .
  • तुम्ही कोणत्याही पूर्वावलोकन वैशिष्ट्यांचा वापर केल्यास, तुम्हाला Reddit पूर्वावलोकन अटीयांनादेखील सहमती दर्शवावी लागेल.
  • तुम्ही सेवांवर जाहिरात करत असल्यास, तुम्हाला Reddit जाहिरात प्लॅटफॉर्मच्या यांनादेखील सहमती द्यावी लागेल .
  • तुम्ही आमच्या कोणत्याही डेव्हलपर सेवा (आमच्या API सह) वापरल्यास, तुम्हाला Reddit डेव्हलपर अटी यांनादेखील सहमती दर्शवावी लागेल.
  • तुम्ही अतिरिक्त अटींच्या अधीन असलेल्या कोणत्याही Reddit प्रोग्राममध्ये सहभागी होत असल्यास, (उदा., कोणत्याही कमाई प्रोग्रामसाठी कमाईच्या अटी), तुम्हाला त्या अतिरिक्त अटींनादेखील दर्शवावी द्यावी लागेल.
17. समाप्ती

तुम्ही तुमचे खाते हटवून आणि सर्व सेवांचा वापर थांबवून, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कारणास्तव या अटी रद्द करू शकता. तुम्ही तुमचे खाते न हटवता सेवांचा वापर थांबवल्यास, दीर्घकाळ इनॅक्टिव्ह राहिल्यामुळे तुमचे खाते डीॲक्टिव्हेट केले जाऊ शकते.

लागू कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, आम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाशिवाय तुमचे खाते, मॉडरेटर स्टेटस किंवा सेवा ॲक्सेस करण्याची किंवा वापरण्याची क्षमता निलंबित किंवा समाप्त करू शकतो, ज्यामध्ये या अटींचे किंवा आमचे Reddit चे नियमयांचे उल्लंघन केल्याचा समावेश आहे .

या अटी किंवा तुमचे खाते समाप्त झाले तरीही, खालील विभाग लागू राहतील: 5 (तुमचा आशय), 7 (तुम्ही करू शकत नसलेल्या गोष्टी), 12 (नुकसानभरपाई), 13 (डिस्क्लेमर आणि दायित्वाची मर्यादा), 14 (प्रचलित कायदा आणि अधिकारक्षेत्र), 17 (समाप्ती) आणि 18 (संकीर्ण).

18. संकीर्ण

या अटी, गोपनीयता धोरण आणि या अटींमध्ये संदर्भाने स्पष्टपणे समाविष्ट केलेले इतर कोणतेही करार हे सेवांच्या तुमच्या ॲक्सेसबाबत आणि वापराबाबत आमच्या आणि तुमच्यामधील संपूर्ण करार दर्शवतात. या अटींमधील कोणताही अधिकार किंवा जबाबदारी आम्ही न वापरल्यास किंवा तिची अंमलबजावणी न केल्यास, तो अधिकार किंवा जबाबदारी आम्ही रद्द केली असे मानले जाणार नाही. या अटींमधील कोणताही भाग अवैध किंवा अंमलबजावणीयोग्य नसल्याचे आढळले, तर तो भाग शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात लागू केला जाईल आणि उर्वरित भाग पूर्णपणे प्रभावी राहतील. आमच्या संमतीशिवाय तुम्ही या नियमांर्गत असलेले तुमचे कोणतेही अधिकार किंवा जबाबदाऱ्या कोणालाही देऊ किंवा ट्रान्सफर करू शकत नाही. आम्ही या नियमांर्गत असलेले आमचे कोणतेही अधिकार आणि जबाबदाऱ्या कोणालाही ट्रान्सफर करू शकतो.

या अटींमध्ये शीर्षके केवळ संदर्भासाठी वापरली आहेत आणि त्यांचा अर्थ लावताना ती विचारात घेतली जाणार नाहीत. या अटींच्या उद्देशांसाठी: (a) “समाविष्ट,” “समाविष्ट आहे,” आणि “समाविष्ट करून” या शब्दांनंतर “कोणत्याही मर्यादेशिवाय” हे शब्द आले आहेत असे मानले जाईल; (b) “जसे की,” “उदाहरणार्थ,” “उदा.,” आणि त्या शब्दांचे कोणतेही साधित शब्द यांचा अर्थ ‘उदाहरण म्हणून’ असा असेल आणि या शब्दांनंतर येणाऱ्या बाबींना सर्वसमावेशक सूची मानले जाणार नाही; आणि (c) “किंवा” हा शब्द “आणि/किंवा” या समावेशक अर्थाने वापरला आहे आणि “किंवा,” “कोणतेही,” आणि “एकतर” या संज्ञा अनन्य नाहीत. एखाद्या पक्षाने भाषेचा मसुदा तयार केला असल्याच्या दाव्याच्या आधारे कोणत्याही पक्षाच्या विरोधात कोणतीही संदिग्धता समजली जाणार नाही.

या अटी तुमच्या आणि Reddit, Inc. यांच्यातील कायदेशीर बंधनकारक करार आहे. या अटींविषयी तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

Reddit, Inc.
303 2nd Street, Suite 500S
San Francisco, CA 94107
United States

तुम्ही EEA, युनायटेड किंगडम किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहत असल्यास, Reddit वापरकर्ता करार लागू होईल

नमस्कार, Reddit वापरकर्ते आणि इंटरनेटवरील लोकांनो! हा Reddit वापरकर्ता करार (“अटी”) वेबसाइट, मोबाइल ॲप्स, विजेट, APIs, ईमेल आणि इतर ऑनलाइन उत्पादने व सेवा (एकत्रितपणे, “सेवा”) यांच्या तुमच्या ॲक्सेससाठी आणि वापरासाठी लागू होतो. तुम्ही यूकेमध्ये राहत असाल, तर तुम्ही Reddit, Inc., 548 Market Street, #16093, San Francisco, CA 94104 USA यांच्याशी करार करत आहात. तुम्ही EEA किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहत असाल, तर तुमचा करार Reddit Netherlands B.V., Looiersgracht 43, 1016 VR Amsterdam, Netherlands या कंपनीसोबत आहे. "Reddit", "आम्ही" किंवा "आमचे" असे सर्व उल्लेख, तुमच्या निवासस्थानानुसार संबंधित कंपनीला लागू होतील.

लक्षात ठेवा, Reddit हे मनोरंजनासाठी असून ते तुमच्या करमणुकीचे ठिकाण म्हणून बनवले गेलेले आहे, तरीही आपण काही मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सेवांचा वापर करण्यासाठी, तुम्ही या अटी स्वीकारणे आवश्यक आहे, ज्या (a) तुम्ही खाते तयार करता तेव्हा तुम्हाला सादर केल्या जातात; आणि (b) तुम्ही सेवा वापरता तेव्हा सर्व वेळी उपलब्ध असतात. तुम्ही या अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही आमच्या सेवा ॲक्सेस करू किंवा वापरू शकत नाही.

1. सेवांचा तुमचा ॲक्सेस

13 वर्षांखालील कोणालाही सेवा वापरण्याची किंवा त्या ॲक्सेस करण्याची अनुमती नाही. आमच्या काही सेवांसाठी तुमचे वय जास्त असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, Reddit वर प्रौढांसाठीचा आशय पाहण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही सेवा ॲक्सेस करताना, कृपया सर्व सूचना आणि कोणत्याही अतिरिक्त अटी काळजीपूर्वक वाचा.

सेवांचा वापर करून, तुम्ही असे नमूद करता की:

  • तुमचे वय किमान 13 वर्षे आहे आणि सेवा ॲक्सेस करण्यासाठी आणि वापरण्यासाठीच्या तुमच्या निवासी देशाच्या कायद्यांनुसार आवश्यक असलेल्या किमान वयापेक्षा जास्त आहे;
  • तुम्ही Reddit सोबत कायदेशीररीत्या बंधनकारक करार करू शकता किंवा तुमचे वय 13 वर्षांपेक्षा जास्त असेल, पण तुमच्या अधिकारक्षेत्रातील कायदेशीर प्रौढत्वाच्या वयापेक्षा कमी असेल, तर तुमच्या कायदेशीर पालकांनी या अटींचे पुनरावलोकन केले असून ते त्यांच्याशी सहमत आहेत;
  • सर्व लागू कायद्यांनुसार तुम्हाला सेवा वापरण्यास प्रतिबंधित केलेले नाही; आणि
  • तुम्हाला सेवांमधून कायमस्वरूपी निलंबित किंवा काढून टाकण्यात आलेले नाही.

तुम्ही व्यवसाय किंवा सरकारी संस्था यांसारख्या अन्य कायदेशीर संस्थेच्या वतीने या अटी स्वीकारत असल्यास, तुम्ही असे घोषित करता की, त्या संस्थेला या अटींशी बांधील ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण कायदेशीर अधिकार आहे.

2. गोपनीयता

Reddit चे गोपनीयता धोरण तुम्ही आमच्या सेवा अ‍ॅक्सेस करताना किंवा त्यांचा वापर करताना आम्ही तुमच्याबद्दलची माहिती कशी आणि का गोळा करतो, वापरतो आणि शेअर करतो, हे यात स्पष्ट केले आहे. तुम्ही आमच्या सेवांचा वापर करता तेव्हा, गोपनीयता धोरण. नमूद केल्याप्रमाणे ही माहितीच्या गोळा करण्यास आणि वापरण्यास तुम्ही सहमती देत आहात, हे तुम्ही समजता.

3. तुमचा सेवांचा वापर

या अटींचे तुम्ही पूर्ण आणि सतत पालन करण्याच्या अधीन राहून, Reddit तुम्हाला खालील गोष्टींसाठी वैयक्तिक, ट्रान्सफर करता न येणारा, विशेष नसलेला, रद्द करण्यायोग्य, मर्यादित परवाना देते: (a) तुमच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली असलेल्या मोबाइल डिव्हाइसवर, कायदेशीर मार्केटप्लेसमधून मिळवलेल्या आमच्या सेवांशी संबंधित मोबाइल ॲप्लिकेशनची कॉपी इंस्टॉल करणे आणि वापरणे; आणि (b) सेवा ॲक्सेस करणे आणि त्यांचा वापर करणे. या अटींद्वारे तुम्हाला स्पष्टपणे न दिलेले सर्व अधिकार आम्ही राखून ठेवतो.

लागू कायद्यानुसार असे निर्बंध अस्वीकार्य असतील त्या मर्यादेव्यतिरिक्त आणि फक्त त्या मर्यादेपर्यंत, आमच्या लेखी संमतीशिवाय तुम्ही असे करू शकत नाही:

  • सेवा किंवा आशयाचा परवाना देणे, त्याची विक्री करणे, ट्रान्सफर करणे, असाइन करणे, होस्ट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांचा व्यावसायिक वापर करणे;
  • सेवा किंवा आशयाच्या कोणत्याही भागामध्ये बदल करणे, त्यापासून साधित कामे तयार करणे, तो डिसअसेंबल करणे, डीकंपाइल करणे किंवा रिव्हर्स इंजिनिअर करणे; किंवा
  • कोणत्याही अतिरिक्त अटींअंतर्गत (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) परवानगी असल्याशिवाय, समान किंवा स्पर्धात्मक वेबसाइट, उत्पादन किंवा सेवा तयार करण्याच्या उद्देशाने सेवा किंवा आशयाचा वापर करणे.

आम्ही अशी हमी देत ​​नाही की सेवा नेहमी उपलब्ध असतील किंवा त्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. आम्ही आमच्या सेवांमध्ये सतत सुधारणा करत असतो. याचा अर्थ असा की आम्ही वैशिष्ट्ये, उत्पादने किंवा कार्यक्षमता जोडू किंवा काढून टाकू शकतो; आम्ही तुम्हाला आधीच सूचित करण्याचा प्रयत्न करू, पण ते नेहमीच शक्य होणार नाही. तुम्हाला सूचना देऊन किंवा न देता, कोणत्याही वेळी सेवांमध्ये (पूर्ण किंवा अंशतः) बदल करण्याचा, त्या निलंबित करण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. सेवांच्या संदर्भात भविष्यात येणारी कोणतीही आवृत्ती, अपडेट किंवा कार्यक्षमतेमध्ये केलेली इतर कोणतीही भर ही या अटींच्या अधीन असेल; या अटी वेळोवेळी अपडेट केल्या जाऊ शकतात. तुम्ही हे मान्य करता की, सेवांमध्ये किंवा त्यांच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही बदल केल्यास, त्या निलंबित केल्यास किंवा बंद केल्यास, त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जबाबदार राहणार नाही. या परिच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू कायद्यानुसार तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही वैधानिक अधिकारांना प्रभावित करत नाही.

आम्ही सेवांवरील तुमचा अनुभव विविध घटकांच्या आधारावर पर्सनलाइझ करतो, ज्यामध्ये सेवांवरील तुमची ॲक्टिव्हिटी, तुम्ही सदस्यत्व घेतलेले समुदाय आणि तुमच्या सेटिंग्जमध्ये तुम्ही नमूद केलेल्या प्राधान्यांचा समावेश आहे. या आणि इतर घटकांच्या आधारे, आम्ही तुम्हाला काही शिफारशी करू शकतो, ज्यामुळे Reddit वरील तुमचा अनुभव अधिक सुसंबद्ध होईल. तुमच्यासाठी असलेल्या आशय शिफारशींबद्दल अधिक माहितीसाठी, तसेच काही पर्सनलायझेशन पर्यायांवर तुम्ही कशा प्रकारे नियंत्रण ठेवू शकता, याच्या वर्णनासाठी, कृपया आमचे मदत केंद्रपहा .

4. तुमचे Reddit खाते आणि खात्याची सुरक्षा

आमच्या सेवांची काही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुम्हाला Reddit खाते (“खाते”) तयार करणे गोपनीयता धोरण यामध्ये नमूद केल्यानुसार आम्हाला वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि तुमच्याबद्दलची काही इतर माहिती द्यावी लागू शकते.

तुमच्या खात्याशी संबंधित माहितीसाठी आणि तुमच्या खात्याशी संबंधित घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. तुम्ही तुमच्या खात्याची सुरक्षा राखली पाहिजे आणि कोणीतरी तुमच्या परवानगीशिवाय तुमचे खाते ॲक्सेस केल्याचे तुम्हाला आढळल्यास किंवा तसा संशय असल्यास, तुम्ही ताबडतोब Reddit ला कळवणे हे केले पाहिजे. तुम्ही फक्त तुमच्या खात्यासाठी वापरला जाणारा मजबूत पासवर्ड वापरणे आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे हे करण्याची आम्ही शिफारस करतो. तुम्ही तुमच्या खात्यात तुमचा फोन नंबर जोडला आणि नंतर तो बदलला किंवा डीॲक्टिव्हेट केला, तर तुमच्या खात्याची माहिती अपडेट केल्याची खात्री करा.

आमच्या पूर्व लेखी मंजुरीशिवाय तुम्ही कोणालाही तुमच्या खात्याचा परवाना देऊ शकणार नाही, ते विकू शकणार नाही किंवा ट्रान्सफर करू शकणार नाही.

5. तुमचा आशय

सेवांमध्ये माहिती, मजकूर, लिंक, ग्राफिक, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, स्ट्रीम, सॉफ्टवेअर, टूल किंवा इतर साहित्य (“आशय”) असू शकते, ज्यामध्ये तुमच्याद्वारे किंवा तुमच्या खात्याद्वारे सेवांवर तयार केलेला किंवा सादर केलेला आशय(“तुमचा आशय”) समाविष्ट आहे. आम्ही तुमच्या कोणत्याही आशयाच्या पूर्णतेची, सत्यतेची, अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि आम्ही त्याला स्पष्टपणे किंवा अप्रत्यक्षपणे मान्यता, समर्थन किंवा हमी देत नाही.

तुमचा आशय सेवांना सादर करून, तुम्ही हे दर्शवता आणि हमी देता की, या अटींमध्ये नमूद केलेले तुमच्या आशयाचे अधिकार देण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक अधिकार, शक्ती आणि अधिकरण आहे. तुमच्या आशयासाठी फक्त तुम्हीच जबाबदार असल्यामुळे, सर्व आवश्यक हक्कांशिवाय आशय पोस्ट किंवा शेअर केल्यास तुम्ही कायदेशीर जबाबदारीस पात्र ठरू शकता.

तुमच्या आशयावरील तुमचे कोणतेही मालकी हक्क तुमच्याकडेच राहतील, पण तुम्ही Reddit ला तो आशय वापरण्याचा खालील परवाना देता:

जेव्हा तुमचा आशय सेवांद्वारे तयार किंवा सादर केला जातो, तेव्हा तुम्ही आम्हाला तुमचा आशय आणि त्याशी संबंधित दिलेले कोणतेही नाव, वापरकर्ता नाव, आवाज किंवा जुळणी, आता ज्ञात असलेल्या किंवा नंतर विकसित होणाऱ्या सर्व मीडिया फॉरमॅट आणि चॅनलमध्ये, जगभरात कुठेही वापरण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, फेरबदल करण्यासाठी, अनुकूलित करण्यासाठी, त्यातून साधित कामे तयार करण्यासाठी, वितरित करण्यासाठी, संग्रहित करण्यासाठी, सादर करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी जागतिक, रॉयल्टी-मुक्त, कायमस्वरूपी, अपरिवर्तनीय, अनन्य नसलेला, ट्रान्सफर न करता येणारा आणि उप-परवानायोग्य परवाना प्रदान करता. या परवान्यामध्ये, Reddit सोबत भागीदारी करणाऱ्या इतर कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींद्वारे तुमचा आशय सिंडिकेशन, ब्रॉडकास्ट, वितरण किंवा प्रकाशनासाठी उपलब्ध करून देण्याचा अधिकार आम्हाला मिळतो. उदाहरणार्थ, आमचे सार्वजनिक आशय धोरण यामध्ये अधिक तपशीलवार वर्णन केल्यानुसार, AI आणि मशीन लर्निंग मॉडेलना प्रशिक्षित करण्यासाठी तुमचा आशय वापरण्याचा अधिकार या परवान्यामध्ये समाविष्ट आहे . तुम्ही हेदेखील मान्य करता की आम्ही तुमच्या आशयाशी संबंधित मेटाडेटा काढून टाकू शकतो आणि तुम्ही तुमच्या आशयासंदर्भात नैतिक हक्क किंवा श्रेयवादाचे कोणतेही दावे आणि प्रतिपादने रद्द करता आणि नंतर त्यावर कधीही दावे करणार नाही.

Reddit किंवा आमच्या सेवांबद्दल तुम्ही आम्हाला देत असलेल्या कोणत्याही कल्पना, सूचना आणि फीडबॅक पूर्णपणे ऐच्छिक आहेत आणि तुम्ही सहमत आहात की Reddit अशा कल्पना, सूचना आणि फीडबॅकचा वापर तुम्हाला कोणताही मोबदला न देता किंवा तुमच्यावर कोणतेही बंधन न घालता करू शकते.

तुमच्या आशयाची तपासणी करणे, संपादन करणे किंवा त्यावर देखरेख ठेवण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवत असलो, तरीही तो सेवांमध्ये सबमिट केला जातो, तेव्हा आम्ही त्याचे संपूर्णपणे पुनरावलोकन करूच असे नाही. तथापि, आम्ही आमच्या पूर्ण विवेकानुसार, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कारणास्तव, तुमचा आशय हटवू शकतो, कमाईसाठी अपात्र ठरवू शकतो किंवा काढून टाकू शकतो; यामध्ये या अटींचे, आमचे Reddit चे नियमकिंवा आमच्या इतर अटी आणि धोरणे यांचे उल्लंघन केल्यास किंवा तुम्ही अन्यथा आमच्यासाठी दायित्व निर्माण केल्यास किंवा निर्माण करण्याची शक्यता असल्यास, अशा कारणांचा समावेश होतो.

Reddit च्या आशय मॉडरेशनच्या पद्धतीबद्दल अधिक माहितीसाठी, ज्यामध्ये आम्ही आमचे Reddit चे नियमकसे लागू करतो आणि आशय मॉडरेशनच्या निर्णयांविरुद्ध अपील कसे करावे याचा समावेश आहे, कृपया आमचे मदत केंद्रभेट द्या.

6. तृतीय पक्ष आशय, जाहिराती आणि प्रसिद्धी

या सेवांमध्ये तृतीय पक्ष वेबसाइट, उत्पादने किंवा सेवांच्या लिंक असू शकतात, ज्या जाहिरातदार, आमचे सहयोगी, आमचे भागीदार किंवा इतर वापरकर्त्यांद्वारे पोस्ट केल्या जाऊ शकतात (“तृतीय पक्ष आशय”). तृतीय पक्ष आशय आमच्या नियंत्रणाखाली नाही आणि आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाच्या वेबसाइट, उत्पादने किंवा सेवांसाठी जबाबदार नाही. तृतीय पक्ष आशयाचा तुमचा वापर तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आहे आणि अशा तृतीय पक्ष आशयाच्या संबंधात कोणताही व्यवहार करण्यापूर्वी, तुम्हाला आवश्यक वाटेल ती कोणतीही चौकशी तुम्ही करावी.

सेवांमध्ये प्रायोजित तृतीय पक्ष आशय किंवा जाहिराती देखील असू शकतात. जाहिरातींचा प्रकार, व्याप्ती आणि लक्ष्यीकरण बदलू शकते, आणि तुम्ही हे मान्य करता व सहमत आहात की आम्ही सेवांवरील कोणत्याहीआशयाच्या किंवा माहितीच्या प्रदर्शनासंदर्भात, तुमच्या सामग्रीसह, जाहिराती ठेवू शकतो.

तुम्ही एखादी स्पर्धा किंवा स्वीपस्टेक्स (“प्रमोशन”) यासह एखादे प्रमोशन आयोजित करण्यासाठी सेवांचा वापर करण्याचे निवडल्यास, सर्व लागू कायदे आणि नियमांनुसार प्रमोशन आयोजित करण्याची जबाबदारी फक्त तुमची असेल. यामध्ये अधिकृत नियम, ऑफरच्या अटी, पात्रतेच्या आवश्यकता तयार करणे आणि प्रमोशन नियंत्रित करणारे लागू कायदे, अटी आणि नियमांचे (जसे की परवाने, नोंदणी, बंधपत्रे आणि नियामक मान्यता) पालन करणे यांचा समावेश आहे. तुमच्या प्रमोशनमध्ये हे नमूद करणे आवश्यक आहे की हे प्रमोशन Reddit द्वारे प्रायोजित, समर्थित किंवा त्याच्याशी संबंधित नाही आणि तुमच्या प्रमोशनच्या नियमांनुसार प्रत्येक प्रवेशकर्ता किंवा सहभागी व्यक्तीने प्रमोशनशी संबंधित कोणत्याही दायित्वातून Reddit ला मुक्त करणे आवश्यक आहे. तुम्ही हे मान्य करता आणि सहमत आहात की आम्ही तुमच्या प्रमोशनमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला मदत करणार नाही आणि तुम्ही तुमचे प्रमोशन स्वतःच्या जोखमीवर आयोजित करण्यास सहमत आहात.

7. तुम्हाला न करता येणाऱ्या गोष्टी

Reddit चा वापर करताना किंवा ते ॲक्सेस करताना, तुम्ही या अटी आणि सर्व लागू कायदे, नियम आणि अधिनियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कृपया Reddit चे नियम यांचे पुनरावलोकन करा, जे या संदर्भाद्वारे या अटींमध्ये समाविष्ट केले आहेत आणि त्यांचा भाग बनले आहेत आणि त्यामध्ये प्रतिबंधित आशय आणि वर्तनाबद्दलचे आमचे नियम आहेत.Reddit चे नियम यांमध्ये प्रतिबंधित असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त, तुम्ही खालीलपैकी कोणतेही कृत्य करू शकत नाही:

  • सेवांचा वापर अशा कोणत्याही प्रकारे (ऑटोमेटेड, बॉटच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही मार्गाने) करणे, ज्यामुळे सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो, त्या निकामी होऊ शकतात, विस्कळीत होऊ शकतात, त्यांच्यावर अतिभार पडू शकतो किंवा त्या कोणत्याही प्रकारे बाधित होऊ शकतात;
  • दुसऱ्या वापरकर्त्याच्या खात्यामध्ये किंवा सेवांच्या कोणत्याही अप्रकाशित भागांमध्ये, सेवांशी जोडलेल्या किंवा सेवांसोबत वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर सिस्टीम किंवा नेटवर्कसह, ॲक्सेस मिळवणे (किंवा ॲक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करणे);
  • सेवांमध्ये किंवा सेवांद्वारे कोणतेही व्हायरस, वर्म, दुर्भावनापूर्ण कोड किंवा सेवांमध्ये, त्याच्या सुरक्षेसंबंधित वैशिष्ट्यांसह, व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने असलेले इतर सॉफ्टवेअर अपलोड, प्रसारित किंवा वितरित करणे;
  • लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या बौद्धिक संपदा हक्कांचे किंवा इतर कोणत्याही मालकी हक्कांचे उल्लंघन करण्यासाठी सेवांचा वापर करणे;
  • या अटींमध्ये किंवा Reddit सोबतच्या स्वतंत्र करारामध्ये परवानगी दिल्याखेरीज, कोणत्याही मार्गाने (ऑटोमेटेड किंवा अन्यथा) सेवांमधून डेटा ॲक्सेस करणे, शोधणे किंवा गोळा करणे (आम्ही आमच्या robots.txt फाइलमध्ये नमूद केलेल्या पॅरामीटरनुसार सेवा क्रॉल करण्याची सशर्त परवानगी देतो, पण Reddit च्या पूर्व लेखी संमतीशिवाय सेवा स्क्रॅप करण्यास मनाई आहे); किंवा
  • सेवांचा वापर अशा कोणत्याही प्रकारे करणे, ज्याला आम्ही वाजवीपणे Reddit किंवा कोणत्याही पेमेंट सिस्टीमचा गैरवापर किंवा फसवणूक मानतो.

एखादा आशय किंवा कृती या अटींचे किंवा आमचे Reddit चे नियम यांचे उल्लंघन करत आहे, तुम्हाला असे वाटत असल्यास तुम्ही त्याची तक्रार करणे हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो. आम्ही सुरक्षा त्रुटींची जबाबदारीने तक्रार करण्यासही समर्थन देतो. सुरक्षा समस्येची तक्रार करण्यासाठी, कृपया security@reddit.com वर ईमेल पाठवा.

8. मॉडरेटर

Subreddit मॉडरेट करणे ही अनौपचारिक आणि ऐच्छिक भूमिका आहे, जी सेवेच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असू शकते. मॉडरेटरनी केलेल्या कृतींसाठी आम्ही जबाबदार नाही. या अटींचे उल्लंघन करण्याच्या समावेशासह, कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाशिवाय, कोणत्याही वेळी वापरकर्त्याची नियंत्रण करण्याची क्षमता रद्द किंवा मर्यादित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

तुम्ही Subreddit मॉडरेट करण्याचे ठरवल्यास:

  • तुम्ही मॉडरेटर आचारसंहिता याचे पालन करण्यास सहमती दर्शवता;
  • तुम्ही सहमत आहात की, तुम्ही नियंत्रित करत असलेल्या Subreddit शी संबंधित तक्रारी मिळाल्यावर, तुम्ही योग्य ती कृती कराल, ज्यामध्ये धोरणाचे उल्लंघन करणारा आशय काढून टाकणे आणि/किंवा पुनरावलोकनासाठी त्वरित Reddit कडे एस्कलेट करणे यांचा समावेश असू शकतो;
  • तुम्ही Reddit च्या वतीने काम करण्यास अधिकृत नाही आणि तुम्ही तसे अधिकृत असल्याचे दर्शवूही शकत नाही;
  • आमच्या लेखी मंजुरीशिवाय, तुम्ही Reddit च्या वतीने किंवा तुम्ही मॉडरेट करत असलेल्या कोणत्याही Subreddit च्या वतीने तिसऱ्या पक्षासोबत कोणताही करार करू शकत नाही;
  • तुम्ही तृतीय पक्षांकडून कोणत्याही स्वरूपातील भरपाई, मोबदला, भेटवस्तू किंवा उपकार मिळवून त्या बदल्यात मॉडरेशन कृती करू शकत नाही;
  • तुम्हाला Subreddit मॉडरेट केल्यामुळे अप्रकाशित माहिती उपलब्ध झाली, तर तुम्ही अशा माहितीचा वापर केवळ मॉडरेटर म्हणून तुमच्या कामगिरीच्या संदर्भातच कराल; आणि
  • तुम्ही मॉडरेट करत असलेल्या Subreddit साठी नियम तयार करून लागू करू शकता, परंतु असे नियम या अटी, Reddit चे नियम किंवा मॉडरेटर आचारसंहिता यांच्याशी विसंगत नसावेत.

एखाद्या मॉडरेटरची कोणतीही कृती किंवा निर्णय Reddit च्या किंवा Reddit समुदायाच्या हिताची नाही, असे Reddit ला स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार वाटल्यास, Reddit ती कृती किंवा निर्णय रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते, पण असे करणे त्यांच्यासाठी बंधनकारक नाही.

9. कॉपीराइट, ट्रेडमार्क, DMCA आणि काढून टाकणे

Reddit इतरांच्या बौद्धिक संपदेचा आदर करते आणि आमच्या सेवांच्या वापरकर्त्यांनीही तसेच करावे अशी अपेक्षा करते. आमच्याकडे हे धोरण आहे, ज्यामध्ये उल्लंघन करणारा कोणताही आशय सेवांमधून काढून टाकणे आणि योग्य परिस्थितीत, वारंवार उल्लंघन करणाऱ्या आमच्या सेवांच्या वापरकर्त्यांची सेवा समाप्त करणे समाविष्ट आहे. आमच्या सेवांवरील कोणतीही गोष्ट तुमच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली असलेल्या कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन करत आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आमचा कॉपीराइटची तक्रार करण्याचा फॉर्म किंवा ट्रेडमार्कची तक्रार करण्याचा फॉर्मभरून किंवा खालील पत्त्यावर संपर्क साधून Reddit च्या नियुक्त एजंटला सूचित करू शकता:

कॉपीराइट एजंट
Reddit, Inc.
548 मार्केट स्ट्रीट, #16093 ,
San Francisco, CA 94104
copyright@reddit.com

योग्य नोटिफिकेशनच्या आवश्यकतांसाठी 17 USC § 512(c)(3) पहा. तसेच, कृपया लक्षात घ्या की तुम्ही आमच्या सेवांवरील कोणतीही ॲक्टिव्हिटी किंवा साहित्य उल्लंघन करणारे आहे, अशी जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला Reddit ला काही खर्च आणि नुकसानभरपाई द्यावी लागू शकते.

कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क सूचनेला प्रतिसाद म्हणून आम्ही तुमचा आशय काढून टाकल्यास, आम्ही तुम्हाला सूचित करू. कॉपीराइट सूचनेतील चुकीमुळे किंवा चुकीच्या ओळखीमुळे तुमचा आशय चुकीने काढून टाकला गेल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही आमचा कॉपीराइट प्रतिसूचना फॉर्मयाद्वारे किंवा आमच्या कॉपीराइट एजंटकडे (संपर्क माहिती वर दिली आहे) प्रतिसूचना पाठवू शकता. योग्य प्रतिसूचनेच्या आवश्यकतांसाठी कृपया 17 USC § 512(g)(3) पहा .

10. सशुल्क सेवा

सेवांच्या अनेक पैलूंच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तथापि, काही सेवा, वैशिष्ट्ये आणि उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध असू शकतात (“सशुल्क सेवा”). या अटींव्यतिरिक्त, Reddit इकॉन अटी यादेखील सशुल्क सेवांना लागू होतात. सशुल्क सेवा खरेदी करून किंवा वापरून, तुम्ही इकॉन अटी आणि लागू असल्यास प्रीव्ह्यू अटी यांनादेखील सहमती दर्शवता.

11. बौद्धिक संपदा

या सेवांची मालकी Reddit कडे असून, त्यांचे संचालनही Reddit द्वारे केले जाते. Reddit ने पुरवलेले व्हिज्युअल इंटरफेस, ग्राफिक, डिझाइन, संकलन, माहिती, डेटा, कॉम्प्युटर कोड, उत्पादने, सेवा, ट्रेडमार्क आणि सेवांचे इतर सर्व घटक (“साहित्य”) हे बौद्धिक संपदा आणि इतर कायद्यांद्वारे संरक्षित आहेत. सेवांमध्ये समाविष्ट असलेले सर्व साहित्य हे Reddit किंवा त्याच्या तृतीय पक्ष परवानाधारकांची मालमत्ता आहे. तुम्ही हे मान्य करता आणि सहमत आहात की, साहित्य डाउनलोड करून किंवा सशुल्क सेवा खरेदी करून तुम्हाला कोणतेही मालकी अधिकार प्राप्त होणार नाहीत. Reddit ने स्पष्टपणे अधिकृत केल्याशिवाय आणि Reddit ची ब्रँड मार्गदर्शक तत्त्वे यांच्या अधीन राहून , तुम्ही साहित्याचा वापर करू शकत नाही. या अटींमध्ये स्पष्टपणे व्यक्त न केलेले साहित्यावरील सर्व अधिकार Reddit ने राखून ठेवले आहेत.

12. नुकसानभरपाई

कायद्याने प्रतिबंधित केलेल्या किंवा अन्यायकारक मानल्या गेलेल्या मर्यादेव्यतिरिक्त, तुम्ही Reddit, त्याचे संलग्नक, आणि त्यांचे संबंधित संचालक, अधिकारी, कर्मचारी, एजंट, कंत्राटदार, तृतीय पक्ष सेवा पुरवठादार आणि परवानाधारक ("Reddit संस्था") यांना कोणत्याही तृतीय पक्षाने केलेल्या कोणत्याही दाव्यापासून किंवा मागणीपासून, आणि खालील कारणांमुळे, त्यातून उद्भवलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही दायित्व, नुकसान, तोटा आणि खर्चापासून (खर्च आणि वकिलांच्या शुल्कासह) सुरक्षित ठेवण्यास, नुकसान भरपाई देण्यास आणि त्यांचे संरक्षण करण्यास सहमत आहात: (a) तुमचा सेवांचा वापर; (b) तुमचे या अटींचे उल्लंघन; (c) तुमचे लागू कायदे किंवा नियमांचे उल्लंघन; किंवा (d) तुमचा आशय. ज्या कोणत्याही बाबीसाठी तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे, त्या बाबीच्या बचावावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो आणि तुम्ही या दाव्यांच्या आमच्या बचावासाठी सहकार्य करण्यास सहमत आहात.

11. दायित्वाची मर्यादा

सेवांचा वापर करून, Reddit संस्थांचे दायित्व हे तुमच्या निवास देशात परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत मर्यादित आहे याला तुम्ही सहमती दर्शवता. दायित्व हे या प्रकारच्या करारासाठी सामान्य असलेल्या महत्त्वपूर्ण करारात्मक जबाबदाऱ्यांच्या उल्लंघनामुळे उद्भवणाऱ्या अपेक्षित नुकसानापुरतेच मर्यादित असेल. इतर कोणत्याही लागू असलेल्या देखरेखीसंबंधित कर्तव्याच्या किरकोळ उल्लंघनामुळे होणाऱ्या नुकसानासाठी Reddit जबाबदार नाही. मर्यादित न करता येणाऱ्या कोणत्याही वैधानिक दायित्वाला, आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा हेतुपुरस्सर केलेल्या गैरवर्तनामुळे झालेल्या मृत्यू किंवा शारीरिक दुखापतीच्या दायित्वाला किंवा आम्ही तुम्हाला विशेषतः वचन दिलेल्या एखाद्या गोष्टीसाठी आमची जबाबदारी वगळण्यासाठी दायित्वाची ही मर्यादा लागू होणार नाही.

14. या अटींमधील बदल

आम्ही वेळोवेळी या अटींमध्ये बदल करू शकतो. आम्ही बदल केल्यास, आम्ही सुधारित अटी प्रसिद्ध करू आणि वरील प्रभावी तारीख अपडेट करू. आमच्या वाजवी विवेकाधिकारानुसार हे बदल महत्त्वपूर्ण असतील, तर लागू होण्याच्या तारखेच्या किमान 30 दिवस आधी आम्ही तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित असलेल्या ॲड्रेसवर ईमेल पाठवून (तुम्ही पडताळणी केलेला ईमेल ॲड्रेस देण्याचा पर्याय निवडला असल्यास) किंवा आमच्या सेवांद्वारे अन्य प्रकारे सूचित करू. सुधारित अटी लागू होण्याच्या तारखेला किंवा त्यानंतर सेवा ॲक्सेस करणे किंवा वापरणे सुरू ठेवून, तुम्ही सुधारित अटींचे पालन करण्यास सहमती दर्शवता. तुम्ही सुधारित अटींशी सहमत नसल्यास, बदल लागू होण्यापूर्वी तुम्ही आमच्या सेवांचा वापर थांबवला पाहिजे.

15. अतिरिक्त वापरकर्ता नावे

आम्ही विविध प्रकारच्या सेवा देत असल्यामुळे, Reddit ने ऑफर केलेले एखादे विशिष्ट उत्पादन किंवा सेवा वापरण्यापूर्वी तुम्हाला अतिरिक्त अटी, धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियमांना (एकत्रितपणे, “अतिरिक्त अटी”) सहमती दर्शवण्यास सांगितले जाऊ शकते. सर्व अतिरिक्त अटी या संदर्भाद्वारे या अटींमध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि त्यांचा भाग बनवल्या आहेत आणि ज्या मर्यादेपर्यंत कोणत्याही अतिरिक्त अटी या अटींशी विसंगत असतील, त्या मर्यादेपर्यंत संबंधित सेवांच्या तुमच्या वापराच्या संदर्भात अतिरिक्त अटीच लागू होतील.

  • तुम्ही कोणत्याही सशुल्क सेवा किंवा डिजिटल वस्तू वापरल्यास, तुम्हाला Reddit इकॉन अटी यांनादेखील सहमती दर्शवावी लागेल .
  • तुम्ही कोणत्याही पूर्वावलोकन वैशिष्ट्यांचा वापर केल्यास, तुम्हाला Reddit पूर्वावलोकन अटीयांनादेखील सहमती दर्शवावी लागेल.
  • तुम्ही सेवांवर जाहिरात करत असल्यास, तुम्हाला Reddit जाहिरात प्लॅटफॉर्मच्या यांनादेखील सहमती द्यावी लागेल .
  • तुम्ही आमच्या कोणत्याही डेव्हलपर सेवा (आमच्या API सह) वापरल्यास, तुम्हाला Reddit डेव्हलपर अटी यांनादेखील सहमती दर्शवावी लागेल.
  • तुम्ही अतिरिक्त अटींच्या अधीन असलेल्या कोणत्याही Reddit प्रोग्राममध्ये सहभागी होत असल्यास, (उदा., कोणत्याही कमाई प्रोग्रामसाठी कमाईच्या अटी), तुम्हाला त्या अतिरिक्त अटींनादेखील दर्शवावी द्यावी लागेल.
16. समाप्ती

तुम्ही तुमचे खाते हटवून आणि सर्व सेवांचा वापर थांबवून, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कारणास्तव या अटी रद्द करू शकता. तुम्ही तुमचे खाते न हटवता सेवांचा वापर थांबवल्यास, दीर्घकाळ इनॅक्टिव्ह राहिल्यामुळे तुमचे खाते डीॲक्टिव्हेट केले जाऊ शकते.

लागू कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, आम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाशिवाय तुमचे खाते, मॉडरेटर स्टेटस किंवा सेवा ॲक्सेस करण्याची किंवा वापरण्याची क्षमता निलंबित किंवा समाप्त करू शकतो, ज्यामध्ये या अटींचे किंवा आमचे Reddit चे नियमयांचे उल्लंघन केल्याचा समावेश आहे .

या अटी किंवा तुमचे खाते समाप्त झाले तरीही, खालील विभाग लागू राहतील: 5 (तुमचा आशय), 7 (तुम्ही करू शकत नसलेल्या गोष्टी), 12 (नुकसानभरपाई), 13 (दायित्वाची मर्यादा), 16 (समाप्ती) आणि 17 (संकीर्ण).

10. संकीर्ण

या अटी, गोपनीयता धोरण आणि या अटींमध्ये संदर्भाने स्पष्टपणे समाविष्ट केलेले इतर कोणतेही करार हे सेवांच्या तुमच्या ॲक्सेसबाबत आणि वापराबाबत आमच्या आणि तुमच्यामधील संपूर्ण करार दर्शवतात. या अटींमधील तुमचा कोणताही अधिकार किंवा जबाबदारी आम्ही न वापरल्यास किंवा तिची अंमलबजावणी न केल्यास, तो अधिकार किंवा जबाबदारी आम्ही रद्द केली असे मानले जाणार नाही. या अटींमधील कोणताही भाग अवैध किंवा अंमलबजावणीयोग्य नसल्याचे आढळले, तर तो भाग शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात लागू केला जाईल आणि उर्वरित भाग पूर्णपणे प्रभावी राहतील. Reddit आपल्या पूर्ण विवेकाधिकाराने, 30 दिवसांची पूर्वसूचना देऊन, या अटींअंतर्गत असलेले कोणतेही अधिकार आणि जबाबदाऱ्या कोणत्याही निर्बंधाशिवाय हस्तांतरित करू शकते. कलम 16 नुसार, तुम्हाला कोणत्याही वेळी या अटी समाप्त करण्याचा अधिकार आहे आणि तो तसाच कायम राहील.

या अटींमध्ये शीर्षके केवळ संदर्भासाठी वापरली आहेत आणि त्यांचा अर्थ लावताना ती विचारात घेतली जाणार नाहीत. या अटींच्या उद्देशांसाठी: (a) “समाविष्ट,” “समाविष्ट आहे,” आणि “समाविष्ट करून” या शब्दांनंतर “कोणत्याही मर्यादेशिवाय” हे शब्द आले आहेत असे मानले जाईल; (b) “जसे की,” “उदाहरणार्थ,” “उदा.,” आणि त्या शब्दांचे कोणतेही साधित शब्द यांचा अर्थ ‘उदाहरण म्हणून’ असा असेल आणि या शब्दांनंतर येणाऱ्या बाबींना सर्वसमावेशक सूची मानले जाणार नाही; आणि (c) “किंवा” हा शब्द “आणि/किंवा” या समावेशक अर्थाने वापरला आहे आणि “किंवा,” “कोणतेही,” आणि “एकतर” या संज्ञा अनन्य नाहीत. एखाद्या पक्षाने भाषेचा मसुदा तयार केला असल्याच्या दाव्याच्या आधारे कोणत्याही पक्षाच्या विरोधात कोणतीही संदिग्धता समजली जाणार नाही.

या अटी तुमच्या आणि Reddit, नेदरलँड्स B.V. यांच्यातील कायदेशीर बंधनकारक करार आहे. या अटींविषयी तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.

Reddit Netherlands B.V.
Looiersgracht 43, 1016 VR Amsterdam
Netherlands

KVK क्रमांक: 83433880

डच VAT नोंदणी क्रमांक: NL862872662B01

Reddit, Inc.

548 Market Street, #16093,

San Francisco, CA 94104

USA

यूके व्हॅट नोंदणी क्रमांक: 431 7546 01

⌂ 换网址