
कमाईच्या अटी
- मराठी
- Bahasa Indonesia
- Bahasa Melayu - Malaysia
- Čeština – Česká republika
- Dansk - Danmark
- Deutsch – Deutschland
- English
- Español - España
- Español - México
- Farsi
- Français - France
- Hrvatski – Hrvatska
- Italiano - Italia
- Magyar – Magyarország
- Nederlands - Nederland
- Norwegian Bokmål
- Polski (Polska)
- Português - Brasil
- Português - Portugal
- Română - România
- Slovenčina - Slovensko
- Suomi – Suomi
- Svenska – Sverige
- Tagalog
- Tiếng Việt - Việt Nam
- Türkçe - Türkiye
- Ελληνικά - Ελλάδα
- Български – България
- Русский — Россия
- Српски – Србија
- Українська — Україна
- עברית
- اردو
- العربية
- हिंदी भारत
- বাংলা
- ગુજરાતી
- தமிழ்
- తెలుగు
- ಕನ್ನಡ
- ไทย
- 한국어 - 대한민국
- 中文 - 繁體
- 日本語 - 日本
- 简体中文
24 सप्टेंबर 2024 पासून लागू. शेवटचे सुधारित केलेले: 24 सप्टेंबर, 2024
स्वागत आहे! आमच्या एक किंवा अधिक Reddit कार्यक्रमांद्वारे पैसे कमावण्यात तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल आम्हाला आनंद आहे (प्रत्येकाला “कमाई कार्यक्रम” असे म्हटले जाते). खाली दिलेले अटी व नियम (“कमाईच्या अटी”) तुमच्या कमाई कार्यक्रमांमधील सहभागाला लागू होतात आणि त्याचे नियमन करतात, तसेच त्या तुमच्यात आणि Reddit मध्ये झालेला करार ठरतात. या कमाईच्या अटी आमच्या वापरकर्ता करार, इकॉन अटी आणि प्रीव्ह्यू अटी यांसोबत अतिरिक्त स्वरूपात लागू होतात (एकत्रितपणे, “Reddit अटी”), ज्यांना तुम्ही यापूर्वीच सहमती दर्शवली आहे, आणि त्यामध्ये Reddit अटींमध्ये परिभाषित केलेल्या काही अटींचा समावेश आहे. कृपया कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी आणि या अटींना सहमती दर्शवण्यापूर्वी या कमाईच्या अटी आणि Reddit अटी काळजीपूर्वक वाचा.
1. स्वीकृती
सेवांद्वारे कोणत्याही कमाई कार्यक्रमात नोंदणी करून, तुम्ही कमाईच्या अटींना बांधील राहण्यास सहमती दर्शवता. याव्यतिरिक्त, योगदान किंवा Devvit ॲप (प्रत्येकाची खाली परिभाषा केली आहे) करून किंवा रक्कम मिळवून (खाली परिभाषित केल्याप्रमाणे), तुम्ही कमाईच्या अटींना यापुढेही बांधील राहण्यास सहमती दर्शवता. तुम्ही कमाईच्या अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही.
काही कमाईदारांचे प्रतिनिधित्व व्यवस्थापन कंपनी, व्यवस्थापक, एजन्सी, एजंट, जनसंपर्क प्रतिनिधी किंवा इतर व्यक्ती किंवा संस्थेकडून केले जाऊ शकते. तुम्ही एखाद्या तृतीय पक्षाच्या (उदा., तुमचा नियोक्ता, तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेली व्यक्ती किंवा तुमची व्यवस्थापन कंपनी इ.) वतीने कमाई अटींना सहमती दर्शवत असल्यास, तुम्ही आम्हाला असे प्रतिनिधित्व आणि हमी देता, की तुम्ही त्या तृतीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी आहात आणि त्या तृतीय पक्षाला कमाई अटींनी बांधील करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तसेच, कमाई अटींमध्ये सर्वत्र वापरण्यात आलेला “तुम्ही” हा शब्द त्या तृतीय पक्षासाठीदेखील लागू होईल.
2.पात्र कमाईदार
कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती (ज्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता, खाते, ईमेल, कर, सरकारी ओळखपत्र आणि पेमेंटची माहिती यांचा समावेश असू शकतो) आणि लागू असलेल्या कमाई कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती (एकत्रितपणे, तुमची “कमाईदाराची माहिती”) द्यावी लागेल. तुम्ही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र आहात की नाही हे निर्धारित करण्यासाठी (“पात्र कमाईदार”) आणि कायद्याचे पालन करण्यासाठी आम्ही तुमची कमाईदाराची माहिती वापरतो.
तुम्ही कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र नाही, जर:
-
तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे किंवा बंधनकारक करार करण्यासाठी तुमच्या निवासाच्या देशाच्या कायद्यांनुसार आवश्यक असलेल्या किमान वयापेक्षा तुमचे वय कमी आहे;
-
तुम्ही किंवा तुमचा नियोक्ता असा व्यक्ती किंवा घटक आहात ज्याच्याशी आर्थिक किंवा व्यापारविषयक निर्बंध, प्रतिबंध, निर्यात निर्बंध यांनुसार व्यवहार करण्यास मनाई आहे किंवा ज्याचे नाव मनाई असलेल्या किंवा निर्बंधित पक्षांच्या कोणत्याही सूचीमध्ये नमूद केलेले आहे, किंवा तुम्ही अशा निर्बंधांच्या किंवा प्रतिबंधांच्या अधीन असलेल्या देशात राहत आहात (किंवा त्या देशाचे नागरिक आहात), किंवा लागू कायद्यांनुसार तुम्हाला कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यास किंवा सेवांचा वापर करण्यास अन्यथा प्रतिबंधित करण्यात आले आहे;
-
तुम्ही पदावर असलेले निवडून आलेले किंवा नियुक्त केलेले सरकारी अधिकारी आहात किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करता, आगामी निवडणुकीतील राजकीय उमेदवार आहात, राजकीय कृती समिती किंवा तत्सम राजकीय निधी उभारणी करणारी संस्था आहात, किंवा सरकारी संस्था किंवा विभाग आहात;
-
तुम्ही Reddit चा वापरकर्ता करार, इकॉन अटी, प्रीव्ह्यू अटी, कमाईच्या अटी यांचे, किंवा आमच्या विविध सेवा आणि Reddit कार्यक्रमांना (कोणत्याही कमाई कार्यक्रमासह) लागू असलेल्या इतर कोणत्याही धोरणांचे, अटी आणि नियमांचे उल्लंघन केले आहे किंवा त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहात;
-
तुम्ही Reddit कमाई धोरण यांमध्ये नमूद केलेल्या पात्र कमाईदारासाठीच्या कोणत्याही आवश्यकतांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यास; किंवा
-
तुम्ही आम्हाला कमाईदाराची माहिती देत नसल्यास किंवा तुम्ही दिलेल्या कमाईदाराच्या माहितीच्या आधारे, Reddit असे निर्धारित करते, की त्या माहितीमुळे तुम्ही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अपात्र ठरता.
कमाई कार्यक्रमात सहभागी होऊन, तुम्ही Reddit ला असे प्रतिपादन आणि हमी देता की, तुम्ही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र आहात आणि कमाई कार्यक्रमातील तुमच्या सहभागाला लागू असलेल्या कमाईच्या अटी आणि सर्व अतिरिक्त अटी, कायदे, नियम व विनियम यांचे अन्यथा पालन करण्यास पात्र आहात.
कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रता पूर्णपणे Reddit च्या निर्णयावर अवलंबून आहे आणि Reddit कमाई कार्यक्रमाच्या आवश्यकता कधीही बदलू शकते. Reddit स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा Reddit वर कोणतेही दायित्व न येता, कधीही, कोणत्याही कारणासाठी किंवा कोणतेही कारण नसतानाही, कमाई कार्यक्रमाच्या संदर्भातील सेवांचा ॲक्सेस ब्लॉक करणे, निलंबित करणे, मर्यादित करणे किंवा समाप्त करणे याचा अधिकारदेखील राखून ठेवते (लागू कायद्याच्या अधीन).
3. कमाई कार्यक्रम
3.1 अवलोकन
Reddit सध्या योगदानकर्ते, डेव्हलपर आणि क्रिएटरसाठी कमाई कार्यक्रम उपलब्ध करून देते. प्रत्येक कमाई कार्यक्रमासाठी कमाईची गणना कशी केली जाते (“कमाई”) आणि पात्र कमाईदाराला त्याची कमाई Reddit कडून पेमेंट म्हणून कधी आणि कोणत्या परिस्थितीत मिळू शकते (“रकमांच्या आवश्यकता”) यासाठी स्वतंत्र आवश्यकता आहेत, ज्यांचे वर्णन या कमाईच्या अटींमध्ये केले आहे.
कमाई कार्यक्रमासाठीच्या सर्व अतिरिक्त अटी, या संदर्भाद्वारे कमाईच्या अटींमध्ये समाविष्ट केल्या जातात आणि त्यांचा कमाईच्या अटींचा भाग म्हणून समावेश केला जातो. तसेच, कोणत्याही अतिरिक्त अटींचा कमाईच्या अटींशी विरोधाभास असल्यास, संबंधित कमाई कार्यक्रमातील तुमच्या सहभागाच्या संदर्भात अतिरिक्त अटी लागू होतील.
3.2 योगदानकर्ता कार्यक्रम
Reddit च्या सेवा तुम्हाला तुमच्या खात्यातील आशय (ज्यामध्ये माहिती, मजकूर, लिंक, ग्राफिक, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, स्ट्रीम, सॉफ्टवेअर, टूल किंवा इतर आशयाचा समावेश आहे) समुदायासोबत आणि इतर Reddit वापरकर्त्यांसोबत शेअर करण्याची परवानगी देतात (एकत्रितपणे, तुमची “योगदाने”). इतर Reddit वापरकर्त्यांना तुमच्या योगदानांना अपव्होट करून आणि सेवांद्वारे त्यांना ॲवॉर्ड देऊन ॲवॉर्ड द्यायचा असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला कर्मा आणि/किंवा गोल्ड मिळू शकते.
आमच्या योगदानकर्ता कार्यक्रमाचा भाग म्हणून, तुम्ही पात्र कमाईदार असल्यास, Reddit तुम्हाला कमाईच्या अटी आणि आमचे कमाई धोरण यांनुसार तुमच्या योगदानांसाठी मोबदला देऊ शकते (तुमची “योगदानकर्त्याची कमाई”). तथापि, फक्त तुमच्या खात्यावरून दिलेली योगदाने (तुमच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही पर्यायी खात्यावरून केलेली योगदाने नाहीत) जी पोस्ट करताना आणि रक्कम देताना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे, कमाईच्या अटींचे आणि आमच्या कमाई धोरण यांचे पालन करतात, तीच या कमाई कार्यक्रमाअंतर्गत योगदानकर्त्याच्या कमाईसाठी पात्र असतील (“पात्र योगदाने”). समुदायासाठी तुमच्या पात्र योगदानांच्या गुणवत्तेच्या आधारे तुमची योगदानकर्त्याची कमाई निश्चित केली जाईल. ही गुणवत्ता तुम्हाला प्रथम गोल्ड मिळाल्याच्या दिवसापासून आणि मागील 12 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही मिळवलेल्या कर्माच्या प्रमाणानुसार, येथे वर्णन केल्याप्रमाणे, तसेच मागील महिन्यात पात्र योगदानांमधून तुम्हाला मिळालेल्या गोल्डच्या प्रमाणानुसार मोजली जाईल (“तुमची योगदानकर्ता पातळी”). तुम्ही . येथे वर्णन केलेल्या काही किमान मर्यादा पूर्ण करत नाही, तोपर्यंत Reddit तुम्हाला रक्कम देण्याची प्रक्रिया (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) सुरू करणार नाही ("किमान योगदानकर्ता पातळी"). तुम्ही योगदानकर्त्याच्या कमाईसाठी सध्याच्या रक्कम देण्याच्या दराबद्दल (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) येथे अधिक जाणून घेऊ शकता.
पात्र योगदानांमधून मिळालेले कोणतेही गोल्ड तुम्ही किमान योगदानकर्ता पातळी पूर्ण करेपर्यंत पुढे जमा होत राहील. तथापि, तुमचे खाते 12 महिन्यांच्या कालावधीसाठी निष्क्रिय राहिल्यास, तुमच्या खात्याशी संबंधित कोणतीही योगदानकर्ता कमाई तुम्ही गमवाल.
3.3 डेव्हलपर कार्यक्रम
Reddit चे डेव्हलपर प्लॅटफॉर्म (किंवा “Devvit”) तुम्हाला समुदायाला आणि इतर Reddit वापरकर्त्यांना Devvit ॲप्स (आमच्या डेव्हलपरच्या अटी यांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) उपलब्ध करून देण्याची सुविधा देते. तुम्ही पात्र कमाईदार असाल आणि तुमचे Devvit ॲप तसेच Devvit वस्तू आमच्या डेव्हलपरच्या अटी, Devvit मार्गदर्शक तत्त्वे, कमाईच्या अटी आणि कमाई धोरण यांनुसार कमाई करण्यासाठी पात्र असतील (“पात्र Devvit ॲप” आणि “पात्र Devvit वस्तू”), तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकण्याची शक्यता आहे: 1) इतर Reddit वापरकर्त्यांना गोल्ड वापरून तुमच्या पात्र Devvit वस्तू मिळवण्याची सुविधा देणे; आणि 2) आमच्या डेव्हलपर कार्यक्रमाचा भाग म्हणून पैसे कमावणे.
Devvit ॲप्स Reddit च्या डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेली असल्यामुळे, Reddit वापरकर्त्यांना गोल्ड वापरून पात्र Devvit ॲपमधून पात्र Devvit वस्तू मिळवता याव्यात यासाठी काही अतिरिक्त काम करणे आवश्यक आहे. Reddit हे Devvit आणि इतर सेवांद्वारे काही कमाईची टूल उपलब्ध करून देते, ज्यामुळे Reddit वापरकर्त्यांना गोल्ड वापरून तुमच्या पात्र Devvit ॲपमधून पात्र Devvit वस्तू मिळवता येतात (एकत्रितपणे, “Devvit कमाई सेवा”). Devvit कमाई सेवा मिळवण्यासाठी, तुमच्या वतीने Devvit आणि आमच्या सेवांद्वारे Reddit वापरकर्त्यांकडून गोल्ड गोळा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही Reddit ला तुमचा एजंट म्हणून नियुक्ती करता. Reddit वेळोवेळी तुमच्या पात्र Devvit ॲप आणि पात्र Devvit वस्तूंबद्दल माहिती मागू शकते आणि तुम्ही ती माहिती Reddit ला द्याल, यालाही तुम्ही सहमती दर्शवता.
Reddit वापरकर्ते पात्र Devvit वस्तू मिळवण्यासाठी गोल्ड वापरत असताना, सध्याच्या रकमेच्या दरानुसार तुमच्या पात्र Devvit ॲप्समधून पात्र Devvit वस्तू मिळवण्यासाठी Reddit वापरकर्त्यांनी वापरलेल्या गोल्डइतकी रक्कम कमाई म्हणून (“डेव्हलपर कमाई”) मिळवण्याचा तुम्हाला हक्क आहे. आमच्या सध्याच्या रकमेच्या दरांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आमचे मदत केंद्र पहा.
तुमच्या Devvit वस्तू पात्र Devvit वस्तू होण्यासाठी, तुमच्या Devvit ॲपसाठी वापराच्या अटी असणे आवश्यक आहे आणि तुमच्या वापराच्या अटींमध्ये किंवा अन्यथा तुमच्या Devvit ॲपमध्ये तुमच्या Devvit वस्तूंचे संपूर्ण आणि अचूक वर्णन करणे आवश्यक आहे. या वर्णनात किमान पुढील गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे: गोल्डमधील किंमत, Devvit वस्तूंचे वर्णन, Devvit वस्तूंवरील कोणत्याही मर्यादा आणि तुम्ही Devvit वस्तूंवर घातलेल्या कोणत्याही पात्रता आवश्यकता किंवा अटी. तुमच्या अटींची पूर्तता करणाऱ्या Reddit वापरकर्त्यांना तुमच्या Devvit वस्तू पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे.
तुमचे Devvit ॲप आणि Devvit वस्तू आमच्या डेव्हलपरच्या अटी, Devvit मार्गदर्शक तत्त्वे, कमाईच्या अटी, कमाई धोरण आणि इतर Reddit अटी तसेच लागू असलेल्या सर्व कायद्यांचे पालन करतात, याचीही तुम्ही खात्री करणे आवश्यक आहे. तुमचे Devvit ॲप किंवा Devvit वस्तू आमच्या डेव्हलपरच्या अटी, Devvit मार्गदर्शक तत्त्वे, कमाईच्या अटी, कमाई धोरण किंवा इतर कोणत्याही Reddit अटी किंवा लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आम्ही आमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार ठरवल्यास, तुमच्या Devvit वस्तू काढून टाकण्याचा, तुम्हाला देय असलेल्या रकमांचा (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) भरणा रोखून ठेवण्याचा आणि तुमचे खाते निलंबित करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा अधिकार Reddit राखून ठेवते.
Reddit च्या इकॉन अटी आणि प्रीव्ह्यू अटी (आमच्या परतावा धोरणासह) तुमच्या Devvit वस्तूंना लागू होतात. तुमच्या Devvit वस्तू मिळवण्यासाठी गोल्ड वापरणाऱ्या Reddit वापरकर्त्यांना थेट तुमच्याशी संपर्क साधून वाद सोडवता यावा यासाठी तुम्ही संपर्काची एक पद्धत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि असा वाद सोडवण्याची जबाबदारी तुमची असेल (Reddit ची नाही). असा वाद सोडवण्यात तुम्ही असमर्थ असल्यास आणि Reddit ला असे वाटत असेल, की तुम्ही Reddit वापरकर्त्यांना वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या Devvit वस्तू पुरवलेल्या नाहीत, तर तुमच्या वतीने आम्ही वापरकर्त्यांना थेट गोल्डचा परतावा देऊ शकतो आणि त्यानुसार तुमची डेव्हलपर कमाई कमी करू शकतो. वाद कसे हाताळावेत याबाबत अधिक मार्गदर्शनासाठी आमची Devvit मार्गदर्शक तत्त्वे यांना भेट द्या.
3.4 क्रिएटर कार्यक्रम
Reddit चे क्रिएटर पोर्टल (आमच्या क्रिएटर अटी यांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) तुम्हाला सेवांद्वारे इतर Reddit वापरकर्त्यांना कलेक्टिबल अवतारांची विक्री करण्यासाठी विनंती सबमिट करण्याची सुविधा देते. तुम्ही पात्र कमाईदार असल्यास आणि आमच्या क्रिएटर अटी यांनुसार कलेक्टिबल अवतारांची विक्री करत असल्यास, तुम्हाला क्रिएटर कमाई मिळण्याचा हक्क असू शकतो (आमच्या क्रिएटर अटी यांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे). कृपया क्रिएटर कार्यक्रमाविषयीच्या अधिक माहितीसाठी आमच्या क्रिएटर अटी यांचे पुनरावलोकन करा.
4. रकमेशी संबंधित अटी
4.1 रक्कम देण्याची वेळ आणि रक्कम देण्याचा दर
तुम्ही पात्र कमाईदार असल्यास आणि लागू असलेल्या रक्कम देण्याच्या आवश्यकतांची पूर्तता केली असल्यास, तुम्ही लागू असलेल्या कमाई कार्यक्रमांअंतर्गत तुमच्या कमाईसाठी Reddit कडून रक्कम मिळवली आहे (प्रत्येकास “रक्कम” असे म्हटले जाईल). रकमा मासिक आधारावर दिल्या जातात, ज्याची सुरुवात तुम्ही रकमांच्या आवश्यकतांची पूर्तता केलेल्या महिन्याच्या शेवटी होते आणि साधारणपणे त्या महिन्याच्या समाप्तीनंतर 45 दिवसांच्या आत रकमा दिल्या जातात. उदाहरणार्थ, तुम्ही 18 ऑक्टोबर रोजी रकमांच्या आवश्यकतांची पूर्तता केल्यास, Reddit साधारणपणे तुम्हाला 31 ऑक्टोबरनंतर 45 दिवसांच्या आत पेमेंट देईल.
Reddit च्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, खालील दोन्ही अटी पूर्ण झाल्याचे Reddit ने ठरवल्यासच तुम्हाला रक्कम दिली जाईल: 1) तुम्ही, तुमचे खाते आणि त्या रकमेशी संबंधित तुमची योगदाने, Devvit वस्तू आणि/किंवा कलेक्टिबल अवतार, लागू असलेल्या कमाई कार्यक्रमांतर्गत कमाईसाठी पात्र आहेत; आणि 2) तुम्ही कमाईच्या अटी आणि कमाई धोरण तसेच लागू असलेल्या इतर कोणत्याही Reddit अटींचे पालन करून, तुमच्या कमाईशी संबंधित लागू असलेल्या रक्कम मिळण्याच्या आवश्यकतांची पूर्तता केली आहे.
तुम्ही गोल्ड मिळवता अशा कमाई कार्यक्रमात सहभागी असल्यास, रक्कम मिळवून, तुम्हाला पात्र योगदानांसाठी किंवा पात्र Devvit वस्तूंसाठी मिळालेला कोणताही गोल्ड, त्या कमाई कार्यक्रमासाठी Reddit ने त्या वेळी निश्चित केलेल्या वास्तविक पैशांमध्ये रक्कम देण्याच्या दराने (“रक्कम देण्याचा दर”) परत घेण्याचा पर्याय तुम्ही निवडत आहात. गोल्ड रिडीम केल्यानंतर, लागू असलेल्या रक्कम देण्याच्या दराचा वापर करून Reddit तुम्हाला वास्तविक पैसे देताना तुम्ही कमावलेले गोल्ड कमी करेल आणि कमाईच्या अटींमध्ये किंवा त्या कमाई कार्यक्रमासाठीच्या कोणत्याही अतिरिक्त अटींमध्ये नमूद केलेल्या लागू शुल्कांनुसार देय रक्कमदेखील कमी करेल. तुम्ही कमाईच्या अटी, कमाई धोरण किंवा Reddit च्या इतर अटींचे उल्लंघन केले आहे किंवा कराल, असे आम्हाला वाजवी कारणांवरून वाटत असल्यास, रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास नकार देण्याचा अधिकार Reddit राखून ठेवते. Reddit कोणत्याही कमाई कार्यक्रमाच्या संदर्भात कधीही तुम्हाला किती कमाई मिळण्याची अपेक्षा करता येईल, याबाबत कोणतेही प्रतिनिधित्व, हमी किंवा आश्वासन देत नाही आणि तुमच्या अपेक्षांवर आधारित तुम्ही केलेल्या कोणत्याही कृतींसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
लागू असलेल्या रकमेच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत आमच्याशी संपर्क साधून तुम्ही कोणत्याही रकमेच्या अचूकतेबाबतचा वाद Reddit ला कळवला नाही, तर तुम्ही त्या रकमेची अचूकता स्वीकारली आहे, असे मानले जाईल.
4.2 पेमेंट भागीदार ऑनबोर्डिंग आणि शुल्के
रक्कम मिळवण्यासाठी, तुम्ही Reddit ने निवडलेल्या पेमेंट भागीदाराकडे नोंदणी करण्यास सहमती दर्शवता, जो Reddit स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार बदलू शकते. तुम्ही Reddit ने निवडलेल्या पेमेंट पुरवठादारांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पेमेंट पुरवठादाराचा वापर करू शकत नाही. Reddit कडून तुम्हाला देय असलेली कोणतीही रक्कम, आमच्या पेमेंट भागीदारामार्फत दिली जाईल.
पेमेंट भागीदारामार्फत रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कमाईदार माहिती किंवा इतर माहिती तुम्ही आमच्या पेमेंट भागीदाराला आणि Reddit ला द्याल, उदा. तुमच्या मालकीच्या आणि नियमन केलेल्या वित्तीय संस्थेतील बँक खात्याची माहिती आणि IRS फॉर्म W-9 किंवा W-8BEN (किंवा आमचा पेमेंट भागीदार आणि Reddit स्वीकारत असलेले पर्यायी कर फॉर्म).
तुम्ही आमच्या पेमेंट भागीदाराला आणि Reddit ला आवश्यक असलेली सर्व माहिती न दिल्यास, तुम्हाला देय असलेल्या रकमा कदाचित मिळणार नाहीत. तुम्ही ही माहिती देता न आल्यामुळे तुम्हाला रकमा न मिळाल्यास, त्यातून किंवा त्याच्याशी संबंधित उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी, विलंबासाठी, हानीसाठी, खर्चासाठी किंवा दायित्वांसाठी Reddit जबाबदार राहणार नाही.
Reddit कोणत्याही पेमेंट भागीदाराचे संचालन करत नाही, मालकी घेत नाही किंवा नियंत्रण करत नाही आणि कोणत्याही पेमेंट भागीदाराच्या सेवांचा तुमचा वापर त्या पेमेंट भागीदाराच्या अटी आणि गोपनीयता धोरणांच्या अधीन आहे, हे तुम्ही स्वीकारता आणि त्याला सहमती दर्शवता. कोणत्याही पेमेंट भागीदारामुळे, इतर कोणत्याही तृतीय पक्षामुळे, अपरिहार्य परिस्थितीमुळे किंवा आमच्या पेमेंट भागीदाराकडे वेळेवर किंवा योग्य प्रकारे खाते सेट न केल्यामुळे किंवा अन्यथा कोणत्याही रकमेसाठी विनंती केलेली माहिती वेळेवर किंवा योग्य प्रकारे न दिल्यामुळे झालेल्या कोणत्याही विलंबासाठी, अडथळ्यासाठी, नुकसानीसाठी किंवा उत्तरदायित्वासाठी आम्ही जबाबदार नाही, याला तुम्ही सहमती देता.
आमचे पेमेंट भागीदार कार्यक्रमाशी संबंधित कोणत्याही रकमेवर व्यवहार शुल्के आकारू शकतात. ही शुल्के आमच्या पेमेंट भागीदारांद्वारे आकारले जाते आमच्याकडून नाही आणि निवडलेल्या पेमेंट पद्धतीनुसार ते बदलते. आमचे पेमेंट भागीदार तुमच्या कोणत्याही पेमेंटशी संबंधित व्यवहार शुल्के आकारत असल्यास, Reddit ला तुमच्या पेमेंटच्या रकमेतून ती व्यवहार शुल्के वजा करण्याचा अधिकार राखून ठेवते.
4.3 रकमेचे चलन
Reddit तुम्हाला सर्व रकमा देताना पूर्वनिर्धारितपणे यू.एस. डॉलरचा वापर करेल. लागू कायद्यानुसार किंवा इतर कारणांमुळे (उदा. परकीय चलनाचे प्रतिबंधात्मक विनिमय दर) Reddit आणि आमचे पेमेंट भागीदार काही विशिष्ट देशांना, संस्थांना किंवा व्यक्तींना रक्कम पाठवू शकणार नाहीत. तुम्ही यू.एस. डॉलर नसलेल्या, पण आमच्याकडून सपोर्ट असलेल्या चलनात कोणतेही पेमेंट मिळवण्याचा पर्याय निवडल्यास, Reddit किंवा आमचा पेमेंट भागीदार ठरवेल अशा विनिमय दराने तुम्हाला देय असलेल्या रकमा Reddit रूपांतर करेल. या रूपांतरासाठी शुल्क आणि आकारणी लागू होऊ शकते आणि ती तुमच्या पेमेंटच्या रकमेतून वजा करण्याचा अधिकार Reddit राखून ठेवते.
4.4 Reddit अधिकार
Reddit ला तुम्हाला दिलेल्या रकमांची परतवसुली करण्याचा किंवा कोणत्याही कमाई कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही कमाईच्या रकमेतून खालीलपैकी रक्कम वजा करण्याचा किंवा तिच्याशी समायोजन करण्याचा अधिकार राखून ठेवतो 1) कोणत्याही कारणास्तव Reddit कडून तुम्हाला देण्यात आलेल्या अतिरिक्त रकमांची रक्कम, 2) Reddit कडून दिलेल्या किंवा देण्यात येणार असलेल्या रकमेशी संबंधित तुमच्या योगदानांबाबत, Devvit द्वारे उपलब्ध करून दिलेल्या वस्तूंबाबत किंवा कलेक्टिबल अवतारांबाबत करण्यात आलेला कोणताही दावा, वाद, परताव्याची मागणी किंवा व्यवहार रद्द करण्याची विनंती आणि 3) लागू असलेल्या कमाई कार्यक्रमासाठी कमाईच्या अटी किंवा कोणत्याही अतिरिक्त अटींनुसार Reddit किंवा त्याच्या देयक भागीदारांना देय असलेल्या शुल्काची कमी भरलेली कोणतीही रक्कम. Reddit त्या रकमेवर तुम्हाला कोणतेही व्याज देत नाही आणि तुम्हाला ती रक्कम आम्हाला पाठवण्यास सांगू शकते.
याव्यतिरिक्त, आमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, कोणत्याही कमाई कार्यक्रमामध्ये किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही फसवणूक, पैशांचे शोधन किंवा कायदा किंवा नियम किंवा कमाईच्या अटींचे इतर कोणतेही उल्लंघन होत असल्याचे आम्हाला वाटत असल्यास, आमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार त्या उल्लंघनाशी संबंधित असल्याचे आम्हाला वाटणारी कोणतीही पेमेंट रोखून ठेवण्याचा, त्यांना विलंब करण्याचा किंवा त्यांची परतफेड मागण्याचा अधिकार आम्हाला आहे, आणि त्या समस्या आमच्या वाजवी समाधानानुसार सोडवल्या जाईपर्यंत तुम्ही हे स्वीकारता आणि त्याला सहमती दर्शवता.
4.5 कर
तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही कमाईमुळे लागू होणारे सर्व कर भरण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हाला दिलेल्या कोणत्याही कमाईमधून आम्हाला कायद्यानुसार वजा करणे किंवा रोखून ठेवणे बंधनकारक असलेले कोणतेही कर आम्ही वजा किंवा रोखून ठेवू शकतो, याला तुम्ही सहमती दर्शवता. कमाई कार्यक्रमासाठीच्या अतिरिक्त अटींमध्ये अन्यथा नमूद केलेले नसल्यास, Reddit तुम्हाला देय असलेल्या सर्व कमाईला तुम्ही आम्हाला दिलेल्या सेवांसाठीचे पेमेंट मानते आणि, लागू असल्यास, कायद्यानुसार आवश्यक असलेली कोणतीही माहिती अहवालाच्या स्वरूपात सादर करेल. कमाई कार्यक्रमाशी संबंधित माहिती अहवाल किंवा करासंबंधीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, आम्ही मागितलेली कोणतीही अतिरिक्त माहिती आम्हाला देण्यास आणि त्यासाठी सहकार्य करण्यास तुम्ही सहमती दर्शवता.
4.6 प्रतिनिधित्व केलेले कमाईदार
तुम्ही कमाईदाराच्या वतीने या कमाईच्या अटींमध्ये प्रवेश करणारी व्यवस्थापन कंपनी, एजन्सी किंवा तत्सम व्यक्ती किंवा संस्था असल्यास, तुमच्या आणि कमाईदारामधील कोणत्याही कराराच्या अटी पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार असाल आणि Reddit त्यासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही, यामध्ये कोणत्याही पेमेंट व्यवस्थेचाही समावेश आहे (कमाईदार आणि त्याचा व्यवस्थापक, एजंट किंवा इतर प्रतिनिधी यांच्यातील असा करार, “व्यवस्थापन करार”). याव्यतिरिक्त, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने व्यवस्थापित केलेले किंवा प्रतिनिधित्व केलेले कमाईदार असल्यास, लागू असलेल्या कोणत्याही व्यवस्थापन कराराच्या अटी पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार असाल आणि Reddit त्यासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही, यामध्ये कोणत्याही पेमेंट व्यवस्थेचाही समावेश आहे.
5. फेरबदल करणे किंवा बंद करणे
कमाईच्या अटी आणि कमाई धोरण अपडेट करून, Reddit कधीही आणि कोणत्याही कारणास्तव कोणत्याही कमाई कार्यक्रमात फेरबदल करण्याचा, त्यामध्ये सुधारणा करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा, कमाई कार्यक्रमाच्या आवश्यकता, धोरणे आणि मर्यादा जोडण्याचा, काढून टाकण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा, तसेच रक्कम देण्याचा दर आणि लागू असलेली कमाई कार्यक्रमाची शुल्के बदलण्याचा अधिकार राखून ठेवते. फक्त आज आम्ही कोणताही कमाई कार्यक्रम देत आहोत, म्हणून भविष्यातही तो सुरू ठेवण्याचे कोणतेही बंधन Reddit वर नाही; तसेच, भविष्यात या कमाईचे प्रत्यक्ष पैशात रूपांतर करता येईल, याचीही आम्ही हमी देत नाही. तुमच्या कमाईची वैधता तपासण्यासाठी तुमची योगदाने, Devvit वस्तू, Devvit ॲप्स आणि कलेक्टिबल अवतारांचे (एकत्रितपणे, “कमाईची योगदाने”) तसेच तुमच्या खात्यावरील इतर ॲक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. तसेच, तुम्ही कमाईच्या अटी, कमाई धोरण किंवा इतर Reddit अटींचे (त्यामागील उद्देशासह) उल्लंघन केले आहे किंवा तुमची कमाईची योगदाने कमाई कार्यक्रमांतर्गत कमाईसाठी पात्र ठरत नाहीत, असे आम्हाला वाटत असल्यास, तुमची कमाई परत घेण्याचा, ती ॲडजस्ट करण्याचा किंवा इतर रकमांशी ती ॲडजस्ट करण्याचा अधिकारही आम्ही राखून ठेवतो.
6. तुमचे प्रतिनिधित्व आणि हमी
तुम्ही पुढील गोष्टींसाठी प्रतिनिधित्व करता, हमी देता, स्वीकारता आणि सहमती देता:
-
तुम्ही कमाईच्या अटी आणि कमाई धोरण या अंतर्गत Reddit च्या पात्रता निकषांनुसार, तुम्ही ज्या कोणत्याही कमाई कार्यक्रमासाठी अर्ज करता त्यात सहभागी होण्यासाठी पात्र आहात आणि कमाईच्या अटींना सहमती दर्शवण्यापूर्वी तुम्ही कमाईच्या अटी आणि कमाई धोरण याचे परिणाम वाचले आणि समजून घेतले आहेत;
-
1) तुम्ही तुमच्या कमाईसाठीच्या योगदानांचे एकमेव आणि विशेष मालक आहात किंवा तुमची कमाईसाठीची योगदाने वापरण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेले हक्क आणि परवानग्या आहेत, 2) तुमची कमाईसाठीची योगदाने कोणत्याही तृतीय पक्षाच्या हक्कांचे (बौद्धिक संपदा हक्कांसह) उल्लंघन करत नाहीत, त्यांचा गैरवापर करत नाहीत किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांचे उल्लंघन करत नाहीत, 3) तुम्ही तुमच्या कमाईसाठीच्या योगदानांसंबंधी असे कोणतेही हक्क किंवा परवाने दिलेले नाहीत, जे कमाईच्या अटी, Reddit च्या अटी किंवा त्याअंतर्गत तुम्ही दिलेल्या परवान्यांशी विसंगत ठरतील, 4) तुम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता तुमच्या कमाईसाठीच्या योगदानांमधील हक्क मिळवले आहेत आणि कमाईच्या अटी व त्याअंतर्गत तुम्ही दिलेल्या परवान्यांनुसार तसेच Reddit च्या अटींनुसार Reddit संस्थांकडून तुमच्या कमाईसाठीच्या योगदानांचा वापर केल्यामुळे ज्यांचे उल्लंघन होऊ शकते अशा कोणत्याही लागू मान्यतासंबंधी अटी किंवा प्रवेशाच्या अटी तुम्हाला लागू नाहीत, आणि 5) तुमच्या कमाईसाठीच्या योगदानांमध्ये आमची परवानगी न घेता वापरलेली Reddit ची कोणतीही बौद्धिक संपदा किंवा त्यांच्या परवानगीशिवाय वापरलेली तृतीय पक्षांची बौद्धिक संपदा (उदाहरणार्थ, प्रसिद्ध व्यक्तींची नावे) समाविष्ट नाही;
-
1) तुमची कमाईसाठीची योगदाने कोणत्याही संघटनेच्या, कामगार संघटनेच्या, सामूहिक वाटाघाटीच्या किंवा तत्सम कराराच्या कक्षेत येत नाहीत आणि येण्यासाठी अभिप्रेतही नाहीत, तसेच कमाईच्या अटींनुसार Reddit कडून तुम्हाला केलेल्या कोणत्याही पेमेंटशी किंवा कमाई कार्यक्रमातील तुमच्या सहभागाशी अन्यथा संबंधित, Reddit कडून तुम्हाला, कोणत्याही तृतीय पक्षाला, संघटनेला, कामगार संघटनेला, व्यवस्थापनाला किंवा प्रतिनिधीला, किंवा कोणत्याही सामूहिक वाटाघाटीच्या करारानुसार, कोणतीही उर्वरित किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पेमेंट बाकी राहणार नाही, 2) कमाई कार्यक्रमाच्या संदर्भात मिळवलेल्या कोणत्याही पेमेंटशी किंवा तुम्हाला केलेल्या कोणत्याही पेमेंटशी संबंधित, कोणत्याही तृतीय पक्षाला (कोणत्याही व्यवस्थापन कंपनीसह, व्यवस्थापक, प्रतिनिधी, वकील, प्रतिनिधी किंवा सेवा पुरवठादार यांच्यासह) देय असलेल्या किंवा त्यांच्या संदर्भातील कोणत्याही शुल्क, कमिशन, खर्च, व्यय किंवा कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसाठी Reddit जबाबदार नाही आणि तुम्हाला केलेल्या पेमेंटमधून Reddit कोणतीही कपात करणार नाही, आणि 3) कायद्याने किंवा कोणत्याही कामगार संघटनेने आवश्यक केलेल्या सामाजिक सुरक्षा, निवृत्ती लाभ, बेरोजगारी विमा, वार्षिकी किंवा निवृत्तीवेतन किंवा कल्याण निधीच्या पेमेंटसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही योगदान, पेमेंट, कर किंवा कपातीसाठी, किंवा कोणत्याही रोखून ठेवलेल्या रकमेसाठी किंवा करांसाठी (खरेदीच्या संदर्भात Reddit द्वारे वसूल केलेल्या कोणत्याही विक्रीकराव्यतिरिक्त) Reddit जबाबदार नाही; आणि
-
तुमची कमाईसाठीची योगदाने, सेवांद्वारे ती उपलब्ध करून देणे आणि कमाई कार्यक्रमातील तुमचा सहभाग हे सर्व लागू असलेल्या कायदे, नियम आणि विनियमांचे तसेच Reddit चे नियमयांचे आणि कमाई धोरण याचे, तसेच कमाईच्या अटी आणि Reddit च्या अटींचे पालन करतात आणि करत राहतील.
काही विशिष्ट परिस्थितींमध्ये Reddit तुम्हाला अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे देण्यास सांगू शकते; उदाहरणार्थ, आम्हाला एखाद्या सरकारी प्राधिकरणाकडून विनंती मिळाल्यास, लागू असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार किंवा विनियमांनुसार आवश्यक असल्यास किंवा कमाईच्या अटींच्या संभाव्य उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी. Reddit स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार तुमचे खाते बंद करण्याचा आणि Reddit कडून विनंती केलेल्या माहितीवर व कागदपत्रांवर प्रक्रिया होईपर्यंत सेवा ॲक्सेस करण्याची तुमची क्षमता ब्लॉक करण्याचा अधिकार राखून ठेवते. आमच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून तुम्ही संपूर्ण आणि अचूक माहिती न दिल्यास, Reddit तुम्हाला सेवांचा ॲक्सेस रिस्टोअर करण्यास नकार देऊ शकते.
7. उत्तरदायित्वाची मर्यादा
कमाई कार्यक्रमात सहभागी होऊन, कोणत्याही Reddit संस्थांचे उत्तरदायित्व लागू असलेल्या कायद्यानुसार परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत मर्यादित असेल याला तुम्ही सहमती दर्शवता.
Reddit च्या संस्था कमाईच्या अटींमधून उद्भवणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही अनुषंगिक, अप्रत्यक्ष, विशेष, दंडात्मक, परिणामी किंवा तत्सम हानी किंवा दायित्वांसाठी जबाबदार राहणार नाहीत, मग असे दावे कराराच्या आधारे, अपकृत्याच्या आधारे (निष्काळजीपणासह), दिवाणी दायित्वाच्या आधारे, कायद्याच्या तरतुदीच्या आधारे, कठोर दायित्वाच्या आधारे, हमींच्या उल्लंघनाच्या आधारे किंवा दायित्वाच्या इतर कोणत्याही सिद्धांताच्या आधारे असो; तसेच, अशा हानीची शक्यता Reddit च्या कोणत्याही संस्थांना कळवण्यात आली असो, त्यांना तिची माहिती असो किंवा त्यांना तिची शक्यता माहीत असणे अपेक्षित असो, तरीही त्या संस्थांवर असे दायित्व राहणार नाही; आणि कमाईच्या अटींच्या मूलभूत उद्देशाची पूर्तता न होणे किंवा त्या अटींअंतर्गत उपलब्ध असलेला कोणताही मर्यादित उपाय अपयशी ठरणे, यामुळेही वरील दायित्वात कोणताही बदल होणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उत्तरदायित्वाच्या सिद्धांताअंतर्गत, कोणत्याही कमाई कार्यक्रमातून उद्भवणारे किंवा त्याच्याशी संबंधित Reddit संस्थांचे एकूण उत्तरदायित्व, उत्तरदायित्वाच्या दाव्याला जन्म देणाऱ्या घटनेच्या तात्काळ आधीच्या १२ महिन्यांसाठी कमाईच्या अटींशी संबंधित Reddit कडून तुम्हाला देय असलेल्या रकमांपेक्षा अधिक असणार नाही.
8. नुकसानभरपाई
खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे किंवा त्यासंदर्भात तृतीय पक्षाकडून करण्यात आलेल्या कोणत्याही दाव्यांमुळे, खटल्यांमुळे किंवा कायदेशीर कारवाईच्या कारणांमुळे (“दावे”) Reddit च्या कोणत्याही संस्थेला येणाऱ्या सर्व खर्चांची, दायित्वांची आणि इतर खर्चांची (वकिलांच्या शुल्कासह) तुम्ही भरपाई कराल, Reddit च्या संबंधित संस्थांचा बचाव कराल आणि त्यांना कोणत्याही नुकसानीपासून किंवा दायित्वापासून मुक्त व सुरक्षित ठेवाल याला तुम्ही सहमती दर्शवता: 1) कमाईसाठी तुमच्याकडून केलेले योगदान; 2) कमाईच्या अटींचे तुमच्याकडून झालेले उल्लंघन; 3) Reddit ने Reddit च्या अटींनुसार आमच्या अधिकारांचा वापर केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे किंवा संस्थेचे कोणतेही बौद्धिक संपदा हक्क किंवा इतर वैयक्तिक अथवा मालकी हक्क यांचे झालेले उल्लंघन किंवा अन्य प्रकारचे उल्लंघन; 4) तुमच्या खात्यावर देण्यात आलेल्या रकमांशी संबंधित लागू असलेले कोणतेही कर भरण्यात तुमच्याकडून झालेले अपयश किंवा Reddit ला अथवा आमच्या देयक भागीदाराला योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला कर फॉर्म सादर करण्यात तुमच्याकडून झालेले अपयश; किंवा 5) तुम्ही प्रतिनिधित्व केलेला कमाईदार असल्यास किंवा एखाद्या कमाईदाराचे प्रतिनिधित्व करत असल्यास, व्यवस्थापन कराराअंतर्गत उद्भवलेला कोणताही वाद.
Reddit ला पुढील अधिकार असतील: 1) कोणत्याही Reddit संस्थेविरुद्ध केलेल्या कोणत्याही दाव्यांविरुद्ध बचाव करण्यासाठी नियुक्त केलेल्या कोणत्याही कायदेशीर सल्लागारास मान्यता देणे; आणि 2) Reddit शी संबंधित बाबींशी निगडित कोणत्याही दाव्यांच्या बचावाचे नियंत्रण ठेवणे आणि त्यात सहभागी होणे. Reddit च्या कोणत्याही दाव्यांच्या बचावासाठी Reddit सोबत सहकार्य करण्यास आणि Reddit ची पूर्वलिखित संमती घेतल्याशिवाय कोणताही दावा निकाली काढण्यास किंवा त्याबाबत तडजोड करण्यास तुम्ही सहमती दर्शवता.
9. कालावधी आणि समाप्ती
तुमचे खाते हटवून आणि सेवांचा वापर थांबवून तुम्ही कमाईच्या अटी कधीही आणि कोणत्याही कारणासाठी समाप्त करू शकता. तथापि, तुम्ही 12 महिन्यांच्या कालावधीसाठी सेवांचा वापर करणे थांबवल्यास, दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यामुळे तुमच्या खात्याशी संबंधित कोणतीही कमाई शिल्लक राहणार नाही.
लागू कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, आम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणासाठी किंवा कोणतेही कारण नसतानाही, कमाईच्या अटी समाप्त करू शकतो, तुमचे खाते निलंबित किंवा समाप्त करू शकतो किंवा तुम्हाला रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास नकार देऊ शकतो. यामध्ये कमाईच्या अटी कमाई धोरण किंवा Reddit च्या इतर अटींचे उल्लंघन केल्याचाही समावेश आहे.
तथापि, कमाईच्या अटी समाप्त केल्यामुळे, समाप्तीपूर्वी कमाईच्या अटींच्या कोणत्याही उल्लंघनाशी संबंधित किंवा कमाईच्या अटींनुसार उद्भवलेल्या कोणत्याही उत्तरदायित्वापासून Reddit किंवा तुम्हाला सूट मिळणार नाही (समाप्तीपूर्वी उद्भवलेल्या कोणत्याही उत्तरदायित्वाच्या संदर्भात). कमाईच्या अटी समाप्त झाल्यानंतरही पुढील विभाग लागू राहतील: “उत्तरदायित्वाची मर्यादा,” “नुकसानभरपाई,” “मुदत आणि समाप्ती,” आणि “इतर अटी.”
10. इतर अटी
10.1 कमाईदाराची माहिती
तुमची कमाईदार माहिती आमच्या गोपनीयता धोरण यानुसार वापरली जाईल आणि कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी वापरली जाईल. कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी, कायद्याचे पालन करण्यासाठी आणि आमच्या गोपनीयता धोरण यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, आम्ही तुमची कमाईदार माहिती तृतीय पक्ष पेमेंट आणि अनुपालन सेवा पुरवठादारांसोबत शेअर करू शकतो. अशा उद्देशांसाठी तुम्ही Reddit ला तुमची कमाईदार माहिती गोळा करण्याची, वापरण्याची आणि शेअर करण्याची संमती देता. तुमच्या कमाईदार माहितीमध्ये कोणतेही बदल झाल्यास, तुम्ही आम्हाला त्या बदलांची माहिती देणे आणि तुमची कमाईदार माहिती नेहमी अचूक, पूर्ण आणि अप-टू-डेट ठेवणे आवश्यक आहे.
10.2 गोपनीयता
तुम्ही गोपनीय माहिती (खाली परिभाषित केल्याप्रमाणे) गोपनीय ठेवण्यास आणि उघड केलेल्या गोपनीय माहितीचे अनधिकृत वापर, प्रसार किंवा प्रकाशन रोखण्यासाठी, तुमच्या समान स्वरूपाच्या स्वतःच्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही ज्या स्तराची काळजी घेता, त्याच स्तराची काळजी घेऊन, पण किमान वाजवी काळजी घेऊन, त्या गोपनीय माहितीचे संरक्षण करण्यास सहमती दर्शवता. “गोपनीय माहिती” मध्ये Reddit ने तुम्हाला लेखी स्वरूपात उघड केलेली, उघड करण्याच्या वेळी गोपनीय म्हणून खूण केलेली कोणतीही माहिती किंवा माहितीचे स्वरूप किंवा ती उघड करण्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करता, अन्यथा वाजवीपणे गोपनीय म्हणून समजली जाईल अशी कोणतीही माहिती समाविष्ट आहे. गोपनीय माहिती मध्ये पुढीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट नाही: 1) तुमच्या कोणत्याही चुकीमुळे सार्वजनिक ज्ञान झालेली किंवा होणारी माहिती; 2) गोपनीयतेचे कोणतेही दायित्व नसलेल्या तृतीय पक्षाकडून तुम्हाला कायदेशीररीत्या मिळालेली माहिती; 3) कायद्याच्या अंमलबजावणीमुळे उघड केलेली माहिती; किंवा 4) Reddit ची पूर्वलिखित मान्यता घेऊन उघड केलेली माहिती. Reddit कडून तुम्हाला उघड केलेल्या गोपनीय माहितीमधील सर्व बौद्धिक संपदा अधिकार Reddit कडेच राहतील.
10.3 लागू कायदा आणि कार्यक्षेत्र
कमाई कार्यक्रमातील तुमचा सहभाग आनंददायी व्हावा असे आम्हाला वाटते, त्यामुळे तुम्हाला कोणतीही समस्या किंवा वाद असल्यास, तो आमच्यासमोर मांडून अनौपचारिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्यास तुम्ही सहमती दर्शवता. तुम्ही फीडबॅक आणि प्रश्नांसाठी येथे आमच्याशी संपर्क साधू शकता.
लागू असलेल्या कायद्यानुसार परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, कमाईच्या अटींमधून उद्भवणारे किंवा कोणत्याही कमाई कार्यक्रमाशी संबंधित असलेले कोणतेही दावे कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्यांनुसार नियंत्रित केले जातील आणि त्याच्या कायद्यांच्या विवादांच्या नियमांचा विचार केला जाणार नाही.
कमाईच्या अटींशी किंवा कोणत्याही कमाई कार्यक्रमाशी संबंधित सर्व वाद फक्त कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थित फेडरल किंवा राज्य न्यायालयांमध्येच दाखल केले जातील आणि तुम्ही व Reddit या न्यायालयांना वैयक्तिक अधिकारक्षेत्रासाठी विशेषतः संमती देता.
10.4 ईमेल आणि इतर सूचना
कमाईच्या अटींना सहमती दर्शवून आणि कोणत्याही कमाई कार्यक्रमात सहभागी होऊन, तुम्ही तुमच्या खात्यावर किंवा तुमच्याकडून किंवा तुमच्या वतीने Reddit ला दिलेल्या कोणत्याही ईमेल ॲड्रेसवर आमच्याकडून किंवा कोणत्याही कमाई कार्यक्रमाशी संबंधित संभाषणे मिळवण्यास सहमती दर्शवता. Reddit संस्थांकडून मिळणाऱ्या संभाषणांमध्ये तुमच्या रकमांशी किंवा कोणत्याही कमाई कार्यक्रमातील सहभागाशी संबंधित ऑपरेशनल संभाषणे, तुमच्या रकमांमध्ये विनंती केलेल्या बदलांशी किंवा कोणत्याही कमाई कार्यक्रमातील बदलांशी संबंधित अपडेट, आमच्याकडून किंवा आमच्या तृतीय पक्ष भागीदारांकडून चालवल्या जाणाऱ्या मार्केटिंग किंवा प्रचाराशी संबंधित संभाषणे, तसेच Reddit आणि उद्योगातील घडामोडींशी संबंधित बातम्यांचा समावेश असू शकतो. तुम्ही Reddit ला दिलेला ईमेल ॲड्रेस बदलल्यास किंवा निष्क्रिय केल्यास, तुमच्या खात्याची माहिती अपडेट करण्यास तुम्ही सहमती दर्शवता.
तुम्हाला आमच्या प्रचारात्मक ईमेलची निवड रद्द करायची असल्यास, तुम्ही प्रचारात्मक ईमेलमध्येच असलेला सदस्यत्व रद्द करा हा पर्याय फॉलो करून आमच्या प्रचारात्मक ईमेल सूचीमधून सदस्यत्व रद्द करू शकता.
कोणत्याही कमाई कार्यक्रमाच्या संदर्भात केलेल्या किंवा देणे आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सर्व सूचना किंवा संभाषणे लेखी स्वरूपात असतील आणि सेवा वापरून तुमच्या खात्यावर किंवा तुमच्या खात्याशी संबंधित ईमेल ॲड्रेसवर पाठवले जातील.
10.5 कमाईच्या अटींमधील बदल
आम्ही वेळोवेळी कमाईच्या अटींमध्ये बदल करू शकतो. आम्ही बदल केल्यास, सुधारित कमाईच्या अटी पोस्ट करू. आमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार हे बदल महत्त्वपूर्ण असल्यास, तुमच्या खात्याशी संबंधित असलेल्या ॲड्रेसवर ईमेल पाठवून किंवा आमच्या सेवांद्वारे तुम्हाला इतर प्रकारे सूचना देऊनही आम्ही तुम्हाला त्याबाबत कळवू शकतो. कमाई कार्यक्रमात सहभागी होणे पुढे सुरू ठेवून किंवा कमाईच्या अटींमध्ये सुधारणा केल्यानंतर रक्कम मिळवून, तुम्ही सुधारित कमाईच्या अटींना बांधील राहण्यास सहमती दर्शवता. तुम्ही सुधारित कमाईच्या अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही कमाई कार्यक्रमात सहभागी होणे आणि रक्कम मिळवणे थांबवणे आवश्यक आहे.
कमाईच्या अटींमध्ये बदल केला जाऊ शकतो आणि कोणताही कमाई कार्यक्रम कधीही, कोणत्याही कारणास्तव किंवा कोणतेही कारण नसतानाही, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, पूर्वसूचना न देता आणि Reddit वर कोणतीही जबाबदारी न येता रद्द केला जाऊ शकतो (लागू कायद्याच्या अधीन), हे तुम्ही स्वीकारता आणि समजून घेता. कृपया कमाईच्या अटींमध्ये झालेले कोणत्याही बदलाचे पुनरावलोकन करा; तसे करणे ही तुमची जबाबदारी आहे.
10.6 संकीर्ण
Reddit हे कमाईच्या अटी अंतर्गत असलेले कोणतेही हक्क आणि दायित्वे स्वच्छेने असाइन करू शकते. Reddit ची संमती घेतल्याशिवाय तुम्ही कमाईच्या अटींनुसार असलेले तुमचे कोणतेही हक्क किंवा दायित्वे असाइन किंवा हस्तांतरित करू शकत नाही.
कमाई कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, तुम्हाला कमाईच्या अटींचे पुनरावलोकन करण्याची, त्यावर विचार करण्याची आणि त्यांचा सखोल विचार करण्याची पुरेशी संधी मिळाली आहे, तसेच तुम्हाला कमाईच्या अटी पूर्णपणे समजल्या आहेत आणि तुम्ही कमाईच्या अटींना स्वेच्छेने सहमती दर्शवत आहात, हे तुम्ही स्वीकारता आणि त्याला सहमती दर्शवता. कमाईच्या अटींमध्ये प्रवेश करणे योग्य आहे की नाही याबाबत, तुम्हाला स्वतःच्या पसंतीचे वकिलांकडून स्वतंत्र कायदेशीर सल्ला मिळाला आहे किंवा असा स्वतंत्र कायदेशीर सल्ला घेण्याची संधी मिळाली आहे, हेदेखील तुम्ही स्वीकारता आणि त्याला सहमती दर्शवता.
कमाई कार्यक्रमातील तुमचा सहभाग आणि कमाईच्या अटी तुमच्यात आणि Reddit मध्ये एजन्सी, भागीदारी किंवा संयुक्त उपक्रम निर्माण करत नाहीत. कमाईच्या अटींनुसार, उत्पन्न करातून कपात, बेरोजगारी भरपाई, कामगार भरपाई, सामाजिक सुरक्षा किंवा फेडरल विमा योगदान कायद्याशी संबंधित कायद्यांसह, कोणत्याही संघीय, राज्य किंवा स्थानिक कायद्याच्या उद्देशांसाठी तुम्हाला Reddit चा कर्मचारी मानले जाणार नाही.
कमाईच्या अटींमधील शीर्षके फक्त संदर्भासाठी वापरली आहेत आणि त्यांचा अर्थ लावताना त्यांचा विचार केला जाणार नाही. कमाईच्या अटींच्या उद्देशांसाठी: 1) “समाविष्ट करणे”, “समाविष्ट करतो” आणि “समाविष्ट करत आहे” या शब्दांनंतर “कोणत्याही मर्यादेशिवाय” हे शब्द आलेले आहेत, असे मानले जाईल; 2) “यांसारखे”, “उदाहरणार्थ”, “उदा.” आणि या शब्दांपासून बनवलेले कोणतेही शब्द यांचा अर्थ उदाहरण म्हणून असा घेतला जाईल आणि या शब्दांनंतर नमूद केलेल्या बाबींची सूची ही संपूर्ण किंवा सर्वसमावेशक सूची आहे, असे मानले जाणार नाही; आणि 3) “किंवा” हा शब्द “आणि/किंवा” या समावेशक अर्थाने वापरला आहे आणि “किंवा”, “कोणतेही” आणि “दोन्हीपैकी कोणतेही एक” या संज्ञांचा वापर वगळण्याच्या अर्थाने केलेला नाही. एखाद्या पक्षाने भाषेचा मसुदा तयार केला असल्याच्या दाव्याच्या आधारे कोणत्याही पक्षाच्या विरोधात कोणतीही संदिग्धता समजली जाणार नाही.
कमाईच्या अटींमधील कोणतीही तरतूद किंवा कमाईच्या अटींमधील कोणत्याही तरतुदीचा वापर कायद्याच्या विरुद्ध, अवैध किंवा अंमलबजावणीयोग्य नसल्याचे ठरवले गेल्यास, त्या तरतुदीला शक्य तितक्या मोठ्या मर्यादेपर्यंत प्रभावी केले जाईल आणि कमाईच्या अटींमधील उर्वरित तरतुदी पूर्णपणे लागू आणि प्रभावी राहतील.
तुमच्याकडून किंवा Reddit कडून कधीही, दुसऱ्या पक्षाने कमाईच्या अटींमधील कोणत्याही अटीचे किंवा तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल सूचना न देणे किंवा त्यांचे पालन करण्याची मागणी न करणे, त्या अटी किंवा तरतुदीच्या किंवा इतर कोणत्याही अटी किंवा तरतुदीच्या त्यानंतरच्या उल्लंघनाकडे किंवा चुकीकडे दुर्लक्ष केल्याचे मानले जाणार नाही.
कमाईच्या अटी (यामध्ये वापरकर्ता करार, इकॉन अटीआणि प्रीव्ह्यू अटी यांचा समावेश आहे, जे या संदर्भाद्वारे कमाईच्या अटींमध्ये समाविष्ट केलेले आणि त्यांचा भाग बनवलेले आहेत) तसेच कमाईच्या अटींमध्ये संदर्भाद्वारे स्पष्टपणे समाविष्ट केलेले इतर कोणतेही करार हे तुमच्या आणि Reddit मधील कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करार आहेत आणि त्यामध्ये कमाई कार्यक्रमाच्या विषयाशी संबंधित पक्षांमधील संपूर्ण करार समाविष्ट आहे. तसेच, या विषयाशी संबंधित पक्षांमधील यापूर्वीचे सर्व मौखिक किंवा लेखी संभाषणे, निवेदने, समजुती आणि करार यांची जागा हे करार घेतात. कोणत्याही कमाईच्या अटींचा इतर Reddit अटींशी विरोधाभास असल्यास, कोणत्याही कमाई कार्यक्रमाच्या संदर्भात कमाईच्या अटी लागू होतील.
तुम्हाला कमाईच्या अटींबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.