
मॉडरेटर आचारसंहिता
- मराठी
- Bahasa Indonesia
- Bahasa Melayu - Malaysia
- Čeština – Česká republika
- Dansk - Danmark
- Deutsch – Deutschland
- English
- Español - España
- Español - México
- Farsi
- Français - France
- Hrvatski – Hrvatska
- Italiano - Italia
- Magyar – Magyarország
- Nederlands - Nederland
- Norwegian Bokmål
- Polski (Polska)
- Português - Brasil
- Português - Portugal
- Română - România
- Slovenčina - Slovensko
- Suomi – Suomi
- Svenska – Sverige
- Tagalog
- Tiếng Việt - Việt Nam
- Türkçe - Türkiye
- Ελληνικά - Ελλάδα
- Български – България
- Русский — Россия
- Српски – Србија
- Українська — Україна
- עברית
- اردو
- العربية
- हिंदी भारत
- বাংলা
- ગુજરાતી
- தமிழ்
- తెలుగు
- ಕನ್ನಡ
- ไทย
- 한국어 - 대한민국
- 中文 - 繁體
- 日本語 - 日本
- 简体中文
5 जून 2025 पासून लागू.
Reddit जगभरातील प्रत्येकापर्यंत समुदाय, आपलेपणा आणि सक्षमीकरण पोहोचवण्यासाठी बांधील आहे. मॉडरेटर हे घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात: Reddit वापरकर्त्यांसाठी मनोरंजक आणि सहभागी करून घेणारी जागा निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमची सर्जनशीलता, निर्णयक्षमता आणि आवड यांचा वापर करून आघाडीवर राहून काम करता. मॉडरेटर आचारसंहितेचा उद्देश मॉडरेटरकडून आमच्या असलेल्या अपेक्षा स्पष्ट करणे, तुमचे समुदाय निर्माण करण्यासाठी आणि त्यांची वाढ व जपणूक करण्यासाठी Subreddit चे नियम आणि मानदंड विकसित करण्यात तुम्हाला मदत करणे, तसेच तुम्हाला अधिक सहजपणे निर्णय घेण्यास सक्षम करणे हा आहे.
मॉडरेटर म्हणून सकारात्मक समुदाय अनुभव निर्माण करण्यात तुमची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही मॉडरेट करण्यामध्ये नवीन असल्यास किंवा अनेक वर्षांपासून मॉडरेटर म्हणून काम करत असल्यास, तुम्हाला सुरक्षित आणि आवश्यक मदत मिळत आहे याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
मॉडरेटरनी Reddit चे नियम पाळावेत आणि Reddit च्या वापरकर्ता करार यांचे (विशेषतः कलम 8 चे) पालन करावे, तसेच त्यांच्या समुदायांमध्ये नियमांचे उल्लंघन करणारा आशय काढून टाकण्यासाठी आणि त्याची तक्रार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशीही आमची अपेक्षा आहे.
लक्षात ठेवा, तुमच्या Subreddit ला आणि मॉडरेटर टीमला वैयक्तिक मॉडरेटरच्या कृतींसाठी जबाबदार धरले जाऊ शकते. हे लक्षात घेता, मॉडरेटर आचारसंहिता समजून घेण्यासाठी आणि तिचे पालन करण्यासाठी तुमच्या सहकारी मॉडरेटरसोबत सतत सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला कळवणे हे करण्यास अजिबात संकोच करू नका.
TL;DR: तुम्ही खालील तत्त्वांचे पालन केल्यास, आम्ही तुमच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही त्यांचे पालन न केल्यास, कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
नियम 1: स्थिर समुदाय निर्माण करणे आणि त्याची देखभाल करणे
समुदायाचे नियम, संकेत आणि अपेक्षा आमच्या संकेतस्थळाच्या धोरणांशी सुसंगत ठेवून ते निश्चित करून, मॉडरेटरकडून Reddit चे नियम पाळले जाणे अपेक्षित आहे. मॉडरेटर म्हणून तुमच्या भूमिकेचा अर्थ असा आहे, की तुम्ही फक्त आमच्या अटी आणि Reddit च्या नियमांचे पालन करत नाही, तर त्यांचे पालन करणाऱ्या समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठीही सक्रियपणे प्रयत्न करता. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही नियमांचे उल्लंघन करणारा आशय किंवा वर्तन कधीही तयार करू नये, त्याला मंजुरी देऊ नये, ते सुरू करू नये किंवा त्याला प्रोत्साहन देऊ नये. तुमच्या Subreddit मधील आशय हा Reddit च्या नियमांच्या अधीन आहे, पण तो त्यापुरताच मर्यादित नाही:
- पोस्ट
- टिप्पण्या
- फ्लेअर
- नियम
- Wiki पेज
- शैली
- मॉडरेटर मेल
- बॉट, ऑटोमेशन आणि/किंवा ॲप्स
- इतर मॉडरेटर टूल
नियम 2: योग्य आणि वाजवी अपेक्षा निश्चित करणे
तुमच्या समुदायात प्रवेश करणाऱ्या वापरकर्त्यांना ते नेमके कशात सामील होत आहेत हे माहीत असले पाहिजे आणि त्यांना आढळणाऱ्या गोष्टींमुळे आश्चर्य वाटू नये. Reddit वापरकर्त्यांमध्ये स्थिर आणि सक्रिय सहभाग निर्माण करण्यासाठी तुमचा समुदाय कशाबद्दल आहे आणि तुमचे नियम काय आहेत याबाबत पारदर्शक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मॉडरेटर पुढील गोष्टी करून लोकांना Reddit वर सातत्यपूर्ण आणि अपेक्षित अनुभव मिळेल याची खात्री करू शकतात:
- तुमच्या समुदायाद्वारे चर्चा केल्या जाणाऱ्या विषयाचे(यांचे) स्पष्ट आणि संक्षिप्त वर्णन देणे.
- तुमच्या समुदायाचा आणि सह मॉडरेटचा आदर करणे. तुमचा समुदाय कालांतराने विकसित होऊ शकतो, पण तो स्थिर आणि वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी आमची अपेक्षा आहे.
- आशय आणि समुदायांना अचूकपणे लेबल लावणे, विशेषतः प्रौढ/18+ प्रेक्षकांसाठी राखीव असलेल्या आशयसाठी (उदा. लैंगिकदृष्ट्या स्पष्ट).
- तुमच्या समुदायातील सदस्यांकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा स्पष्टपणे नमूद करणारे नियम तयार करणे.
- तुमच्या समुदायाचा विषय एखाद्या ब्रँडशी किंवा संस्थेशी संबंधित असल्यास आणि त्या कंपनीचा तुमच्या समुदायाशी अधिकृत संबंध नसल्यास, तुमचा समुदाय “अनधिकृत” असल्याचे स्पष्टपणे नमूद करणे.
- तुमच्या समुदायाचा विषय एखाद्या ब्रँडशी किंवा कंपनीशी संबंधित असल्यास आणि तुमच्या समुदायाचा त्या कंपनीशी अधिकृत संबंध असल्यास, तुमचा समुदाय “अधिकृत” असल्याचे स्पष्टपणे नमूद करणे.
नियम 3: तुमच्या शेजाऱ्यांचा आदर करणे
आम्ही Reddit वरील इतर Subreddit चा समावेश असलेल्या Reddit संबंधी चर्चांना अनुमती देत असलो, तरीही तुमच्या समुदायाचा वापर इतर समुदायांमध्ये हस्तक्षेप करण्याकरिता निर्देश देण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि/किंवा Reddit वापरकर्त्यांना छळाचे लक्ष्य बनवण्यासाठी केला जाऊ नये. मॉडरेटर म्हणून, तुम्ही Reddit वरील समुदायांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्यांच्या कामकाजात अडथळा आणू शकत नाही. तसेच, तुमच्या समुदायातील सदस्यांना असे करण्यासाठी तुम्ही मदत करू शकत नाही, त्यांना प्रोत्साहन देऊ शकत नाही, त्यासाठी समन्वय साधू शकत नाही किंवा त्यांना असे करण्यास सक्षम करू शकत नाही.
हस्तक्षेपामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- लक्ष्यित छळ किंवा गैरवर्तनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इतर समुदायांचा आणि/किंवा त्या समुदायांमधील आशयाचा किंवा वापरकर्त्यांचा उल्लेख करणे.
- Reddit प्लॅटफॉर्मवर कुठेही वापरकर्त्यांना आमच्या Reddit नियमांचे उल्लंघन करण्यास सक्षम करणे किंवा त्यांना तसे करण्यास प्रोत्साहित करणे.
- तुमच्या समुदायातील वापरकर्त्यांना इतर समुदायांमध्ये त्यांच्या नियमांच्या स्पष्टपणे विरोधात असलेला आशय पोस्ट किंवा रिपोस्ट करण्यास सक्षम करणे किंवा प्रोत्साहित करणे.
- इतर समुदायांमध्ये वापरकर्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, हे दाखवणारा आशय तयार करण्यास परवानगी देणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे, ज्याचा उद्देश नकारात्मक प्रतिक्रिया भडकवणे हा आहे.
नियम 4: सक्रिय आणि सहभागी राहणे
तुमचा समुदाय मोठा असो किंवा लहान, समुदाय सक्रियपणे आणि सातत्याने मॉडरेट करणे महत्त्वाचे आहे. यामुळे समस्यांचे निराकरण होत असल्याची खात्री होईल आणि परिणामी Reddit वापरकर्त्यांना सुरक्षित वाटेल. सक्रिय आणि सहभागी असणे म्हणजे:
- तुमच्याकडे तुमचा समुदाय प्रभावीपणे आणि सातत्याने व्यवस्थापित करण्यासाठी पुरेसे मॉडरेटर आहेत. यामध्ये मॉडरेटर क्यू आणि मॉडरेटर मेलमधील आशयाचे नियमितपणे निरीक्षण करणे आणि त्यावर आवश्यक ती कारवाई करणे तसेच, शक्य असल्यास, पोस्ट, टिप्पण्या आणि व्होट करून तुमच्या समुदायाशी सक्रियपणे संवाद साधणे यांचा समावेश होतो.
- समुदायात काहीही योगदान न देता बसून राहण्याला प्रोत्साहन दिले जात नाही.
नियम 5: सचोटीने मॉडरेट करणे
वापरकर्त्यांना समुदायांमधील आशय अस्सल असण्याची अपेक्षा असते आणि मॉडरेटर समुदायाच्या तसेच संपूर्ण साइटव्यापी असलेल्या नियमांच्या आधारे आशयाबाबत निर्णय घेतात, असा त्यांचा विश्वास असतो.
तो विश्वास कायम ठेवण्यासाठी, तृतीय पक्षांकडून किंवा त्यांच्या वतीने मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याच्या, बदल्यात मिळणाऱ्या लाभाच्या, भेटवस्तूच्या किंवा मदतीच्या बदल्यात मॉडरेटरना मॉडरेशनची कारवाई (मॉडरेटर टूल, बॉट आणि इतर सेवांचा वापर करून केलेल्या कारवाईसह) करण्यास मनाई आहे.
मॉडरेटरच्या काही कृतींच्या उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे, पण त्या त्यापुरत्याच मर्यादित नाहीत:
- वापरकर्त्यांवर बंदी घालणे किंवा त्यांच्यावरील बंदी उठवणे
- मंजुरी दिलेला वापरकर्ता असा दर्जा देणे
- आशयाला मंजुरी देणे किंवा तो काढून टाकणे
- साइडबार, विजेट, Wiki किंवा इतर शैलीतील संपादने
- फ्लेअर देणे
- मंजुरी मिळालेला सबमिटर असा दर्जा देणे किंवा Subreddit मध्ये पोस्ट करण्यासाठी ॲक्सेस देणे
- समुदायामध्ये “जाहिरात जागा” तयार करणे, जसे की शुल्काच्या बदल्यात पोस्ट पिन करण्याची सुविधा देणे किंवा तृतीय पक्षासाठी जाहिरात करण्याकरिता Subreddit ची शैली वापरण्याची सुविधा देणे
- मॉडरेटरना आमंत्रणे पाठवणे किंवा Subreddit ची मालकी ट्रान्सफर करणे
मोबदल्याच्या काही उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे, पण ते त्यापुरते मर्यादित नाहीत:
- आर्थिक वस्तू आणि/किंवा सेवा (उदा. रोख रक्कम, NFTs, स्टॉक, गिफ्ट कार्ड)
- Reddit वर खरेदी करता येण्यायोग्य वस्तू आणि/किंवा सेवा (उदा. Premium, गोल्ड, कलेक्टिबल अवतार)
- भौतिक वस्तू आणि/किंवा सेवा (उदा. व्यापारी माल, प्रायोजित सहली, विनंती केलेले आयटम)
- विचाराधीन बाबी आणि/किंवा विशेष लाभ (उदा. एखाद्या कंपनीकडून विशेष उल्लेख, प्रोत्साहनाच्या बदल्यात विशेष वागणूक देण्याची आश्वासने)
- वैयक्तिक सेवा किंवा आशयाचा ॲक्से (उदा. सदस्यत्वे, विशेष आशय)
तृतीय पक्षांसोबतचे कार्यक्रम आणि सहभाग, एखाद्या ब्रँड किंवा कंपनीकडून तुमच्या Subreddit मध्ये केलेली ॲक्टिव्हिटी किंवा एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी Subreddit सुरू करणे आणि/किंवा त्याची देखभाल करणे यांना अनुमती आहे, जोपर्यंत त्याबदल्यात कोणताही मोबदला मिळत नाही.
मॉडरेटर आचारसंहिता: अंमलबजावणी
निर्बंधात्मक उपाययोजना करण्याची वेळ येऊ नये यासाठी, समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न करू. बहुतेक प्रकरणांमध्ये, सुधारात्मक उपाययोजना करण्याऐवजी चर्चेद्वारे समस्या सोडवणे आणि परस्पर समजूत निर्माण करणे आम्हाला शक्य होते.
एखाद्या ॲडमिनने तुम्हाला मॉडरेटर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे कळवण्यासाठी संपर्क साधल्यास, तुम्ही सहकार्य करून त्वरित प्रतिसाद दिल्यास, ही समस्या सोडवण्यात मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, समुदायाचे नियम अपडेट करणे, सक्रियपणे मॉडरेशन करणे आणि अधिक मॉडरेटर जोडणे यांसारख्या उपायांद्वारे अनेक समस्या सहजपणे सोडवता येऊ शकतात. तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आवश्यक स्पष्टता मिळवू शकता.
शैक्षणिक पद्धतीने केलेल्या प्रयत्नांद्वारे समस्या सोडवता येत नसल्याचे आम्हाला आढळल्यास किंवा मॉडरेटरनी सहकार्य करण्यास अथवा आचारसंहितेचे पालन करण्यास नकार दिल्यास, आम्ही पुढील अंमलबजावणीच्या कारवायांचा विचार करू शकतो:
- चेतावण्या जारी करणे
- नियमांचे उल्लंघन करणारा आशय आणि Subreddit ची शैली काढून टाकणे
- समुदायामधून मॉडरेटरना काढून टाकणे
- 18+ टॅग, स्पॅम फिल्टर किंवा इतर आशय नियंत्रणांसारख्या Subreddit सेटिंग्ज किंवा टूलच्या ॲक्सेसमध्ये बदल करणे
- नवीन मॉडरेटर शोधणे किंवा समुदाय इतरांकडून स्वीकारला जाण्याची अनुमती देणे
- मॉडरेटरला अतिरिक्त मॉडरेटर टीममध्ये सामील होण्यास किंवा नवीन Subreddit तयार करण्यास प्रतिबंध करणे
- खात्यांचे विशेषाधिकार काढून टाकणे किंवा त्यांच्यावर निर्बंध घालणे
- तात्पुरते किंवा कायमस्वरूपी खाते निलंबन
- समुदायांवर बंदी घालणे
मॉडरेटर स्रोत
समुदाय मॉडरेट करणे आव्हानात्मक असू शकते, हे आम्हाला समजते. खालील स्रोत तुम्हाला मजबूत आणि स्थिर समुदाय तयार करण्यात मोठी मदत करू शकतात:
- Reddit चे मॉडरेटर मदत केंद्र
- मॉडरेटरसाठी समुदाय
- मॉडरेटरसाठी कार्यक्रम आणि उपक्रम
- r/ModSupport: मॉडरेटरना Reddit ॲडमिनसोबत, प्रामुख्याने मॉडरेटर टूलशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी संपर्काचे अधिकृत माध्यम उपलब्ध करून देणारा अधिकृत समुदाय.
- समुदायासाठी Reddit
मॉडरेटर आचारसंहिता याबाबत तक्रार करण्यासाठी, कृपया हा फॉर्म वापरा.