व्यवसायाच्या वाढीसाठी खास तुमच्यासाठी तयार API संचासह वापरा

वापरण्यास सोपे डिझाइन एडिटर, 335M+ स्टॉक काँटेंट लायब्ररी आणि AI-आधारित टूल्सचा अतिशय कामाचा संच या सर्वांना विनासायास इंटीग्रेट करून तुमच्या वापरकर्त्यांना सर्जनशील व्हिज्युअल्स तयार करण्यासाठी मदत करा.

API संचावरील तांत्रिक दस्तऐवजीकरणासाठी, येथे क्लिक करा.

व्यवसायांसाठी खास तयार API उपाय

कस्टम, इंटीग्रेट होण्यासाठी तयार अशा वैशिष्ट्यांच्या एका सर्जनशील संचासह तुमच्या व्यवसायाला ऑटोमेट करून वाढवा.

  • व्हाइट-लेबल करण्याचा पर्याय. संपूर्ण वैशिष्ट्ये किंवा संपूर्ण उत्पादनाचे ब्रँडिंग पुन्हा करा आणि त्याला तुमच्या ब्रँड ओळखीप्रमाणे करून स्पर्धेमध्ये पुढे व्हा.
  • कस्टमाइझ करण्यासारखे आणि सोयीस्कर. आधीपासून तयार पर्यायांपैकी निवडा किंवा वैशिष्ट्यांचा असा अनोखा संच निर्माण करा जो तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांसाठी योग्य असेल. फक्त तुम्हाला पाहिजे असलेल्या वस्तूंसाठीच पैसे द्या.
  • संपूर्णपणे सुरक्षित. आमच्या संपूर्णपणे सुरक्षित आणि नियमांचे पालन करणाऱ्या तंत्रज्ञानासह संपूर्ण आत्मविश्वासाने व्यवसाय स्केल करा आणि ब्रँडमधील विश्वास निर्माण करा.
VistaCreate यांचे डिझाइन एडिटर

VistaCreate यांचे डिझाइन एडिटर

चित्तवेधक काँटेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी हे संपूर्ण एडिटर किंवा एखादे विशिष्ट डिझाइन, व्हिडिओ किंवा इमेज एडिट करण्याी वैशिष्ट्ये तुमच्या व्यवसायात इंटीग्रेट करा.

  • 80+ फॉरमॅटमध्ये 200K+ टेम्पलेट. प्रिंट आणि डिजिटल मीडिया दोन्हीसाठी तुमच्या ग्राहकांना आधीपासून तयार केलेल्या सर्जनशील कल्पनांची एक संपूर्ण मालिका द्या. या टेम्पलेट्सना इंटीग्रेट करणे अगदी सोपे आहे आणि तुमचे खास काँटेंट तुमच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करणेही तेवढेच सोपे आहे.
  • व्हाइट लेबल करण्याचा पर्याय. तुमच्या दृष्टिकोनाप्रमाणे करण्यासाठी या वैशिष्ट्याचे ब्रँडिंग पुन्हा करा ज्याने तुमच्या वापरकर्त्यांचा डिझाइन अनुभव आरामशीर आणि सतत एकसारखा असेल.
  • पाहिजे तशी सर्जनशीलता. स्टॅटिक आणि ॲनिमेटेड मीडिया प्रोजेक्टमध्ये एडिटिंगचे काम सोपे करा, तसेच कस्टम टेम्पलेट तयार करण्याचे कामही सोपे आणि जलद करा.
अधिक जाणून घ्या

DepositPhotos ची स्टॉक काँटेंट लायब्ररी

तुमच्या वेबसाइट किंवा ॲपसाठी ट्रेंडिंग, लायसन्स असलेले, विना-रॉयल्टी काँटेंट वापरून तुमचे उत्पन्न वाढवा आणि वापरकर्ता अनुभव अधिक चांगला करा.

  • 335+ फोटो, व्हेक्टर, इलस्ट्रेशन, व्हिडिओ आणि म्युझिक फाइल्स. डिजिटल आणि प्रिंट दोन्ही प्रकारच्या वापरासाठी उच्च-गुणवत्तेचे विशाल काँटेंट एक्सप्लोर करा.
  • ॲडव्हांस शोध इंजिन. आमच्या स्मार्ट, AI-संचालित फिल्टर्सचा मोठा संच वापरून लायब्ररीमध्ये नेव्हिगेट करा. फाइलचा प्रकार, ओरिएंटेशन, मोसम, लोकांची संख्या, दृष्टिकोन, लोकेशन आणि अशा अनेक गोष्टींवरून शोध घ्या.
  • व्हाइट लेबल करण्याचा पर्याय. लायब्ररीला तुमच्या प्लॅटफॉर्मसोबत व्हाइट-लेबल अटींप्रमाणे इंटीग्रेट करा, यामुळे तुमच्या ग्राहकांना लक्षावधी मूळ फाइल्स मिळू शकतील.
अधिक जाणून घ्या
DepositPhotos ची स्टॉक काँटेंट लायब्ररी
AI Image Generator

AI Image Generator

संपूर्णपणे लायसन्स असलेले आणि व्यावसायिकदृष्ट्या सुरक्षित टेक्स्ट-टू-इमेज जनरेशन वापरून बाजारापेठेत निराळे काम करत असताना सर्जनशीलता वाढवा.

  • व्यावसायिकदृष्ट्या सुरक्षित. ब्रँडचे लोगो, कॉपीराइट असलेल्या वस्तू किंवा अशा प्रकारच्या इतर गोष्टी जनरेट केलेल्या इमेजमध्ये कधीही नसतील, त्यामुळे तुमचे प्रमोशनल कॅम्पेन सुरक्षित असेल.
  • फक्त तुमच्यासाठी लायसन्स. तुमच्या खास प्रॉम्प्टवरून तयार केलेल्या इमेज आमच्या स्टॉक लायब्ररीमध्ये घेतल्या जाणार नाहीत किंवा इतर वापरकर्त्यांना दिल्या जाणार नाहीत हे लक्षात घ्या आणि संपूर्ण आत्मविश्वासाने इमेज जनरेट करा.
  • सोयीस्कर आणि अष्टपैलू. सोशल मीडियावरील जाहिराती, सर्जनशील जाहिरात मोहिमा, प्रिंटेड साहित्य आणि अशा अनेक गोष्टींसाठी जनरेट केलेल्या इमेज डाउनलोड करून वापरा.
अधिक जाणून घ्या

इमेज आणि व्हिडिओसाठी बॅकग्राउंड रिमूव्हर

ऑटोमॅटिक, AI-आधारित पार्श्वभूमी काढून टाकण्याच्या टूलचा संपूर्ण फायदा घ्या आणि तुमच्या ग्राहकांना व्यवस्थितपणे, कमी खर्चात काँटेंट कस्टमायझेशन करून द्या.

  • लगेच आणि सोपे इंटीग्रेशन. हे इंटीग्रेशनसाठी तयार वैशिष्ट्य वापरून तुमच्या प्लॅटफॉर्मवरून विक्री आणि वापरकर्त्यांची प्रतिबद्धता वाढवा.
  • 100% ऑटोमॅटिक. फक्त काही सेकंदातच परिपूर्ण इमेज आणि व्हिडिओ मिळवा, यामध्ये मदत करेल आमचे असे प्रगत तंत्रज्ञान जे फारच लवकर पार्श्वभूमी ओळखून काढू शकते.
  • AI-संचालित. या टूलमुळे तुमच्या वापरकर्त्यांना नेहमीच अगदी पाहिजे तसे आणि उच्च-गुणवत्तेचे परिणाम मिळतील. याचे संचालन ॲडव्हांस आणि नेहमी सुधारत राहणारे न्यूरल नेटवर्क करतात.
अधिक जाणून घ्या
इमेज आणि व्हिडिओसाठी बॅकग्राउंड रिमूव्हर
AI Features

AI-संचालित वैशिष्ट्ये

एका AI-आधारित वैशिष्ट्याच्या सहाय्याने तुमचा सर्जनशील वर्कफ्लो अधिक चांगला करा, यामध्ये खूप कामाचे, तयार टूल आधीपासून आहेत.

  • फोटोमधील ऑब्जेक्ट बदलणे किंवा काढण्यासाठी टूल. कुठल्याही इमेजमधील पाहिजे नसलेले ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू किंवा लोक काढा, बदला किंवा त्यांची जागा बदला आणि डिफॉल्ट पार्श्वभूमी त्या ठिकाणी लावा.
  • पार्श्वभूमी एक्सटेंडर. इमेजची गुणवत्ता वाढवण्यासाठी, पॉलिश केलेले आणि परिपूर्ण व्हिज्युअल्स देण्यासाठी विनासायास पार्श्वभूमी एक्सटेंड करा.
  • इमेज अपस्केलर. गुणवत्ता न गमावता इमेजला मूळ आकाराच्या दुप्पट अपस्केल करून प्रिंट करण्यासाठी आणि वेबवर वापरण्यासाठी इमेज तयार करा.
अधिक जाणून घ्या

आमच्या API उपायासोबत तुमच्या व्यवसायाची भरभराट करा

तुमच्या गरजांसाठी कस्टमाइझ करता येण्यासारखे.तुमच्या गरजांसाठी कस्टमाइझ करता येण्यासारखे.तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांसाठी आणि व्हिजनसाठी योग्य अशी वैशिष्ट्ये निवडून फक्त त्यांच्यासाठीच पैसे द्या.
व्यवसायासाठी योग्यव्यवसायासाठी योग्यव्यवसायातील आव्हाने प्रभावीपणे हाताळा आणि आजच्या अतिशय वेगवान बाजारात यशस्वी होण्यासाठी इंटीग्रेशनसाठी तयार असा उपाय वापरा.
कायदेशीर आणि सुरक्षितकायदेशीर आणि सुरक्षितसुरक्षित, कायदेशीर उपाय वापरून विश्वास वाढवा, जे कॉपीराइट आणि गोपनीयतेच्या समस्यांपासून तुम्हाला लांब ठेवतात.

कस्टम आणि ताकदवान API उपाय वापरून तुमच्या व्यवसायाची व्हिजन साकार करा.

आमचा व्हाइट-लेबल उपाय वापरून तुमच्या व्यवसायाच्या गरजा तंतोतंत पूर्ण करणाऱ्या आणि तुमची ब्रँड ओळख दर्शवणाऱ्या वैशिष्ट्यांच्या संचाची विनंती करा.

खालील फॉर्म भरून सुरुवात करा.

DepositPhotos कडून आमचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संवाद करतील.
⌂ 换网址